शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: 'अन्नधान्य वितरण'चा मनस्ताप, नागरिकांचे हेलपाटे

By इंदुमती सूर्यवंशी | Updated: January 7, 2025 16:34 IST

सर्व्हरचा ताप, मनुष्यबळाचा अभाव

इंदुमती गणेशकोल्हापूर : येथील मुख्य प्रशासकीय इमारतीत असलेल्या शहर अन्नधान्य वितरण कार्यालयातील काम तीन महिने थांब अशी स्थिती आहे. गेले दाेन महिने आरसीएमएस आणि आधार सर्व्हरने मान टाकली आहे. कार्यालयात अन्नधान्य वितरण अधिकारी धरून मोजून चार जण, नागरिकांचे येणारे अर्ज महिन्याला २ हजार, मदतनिसांवर भार त्यामुळे कोणताही अर्ज किमान दोन-तीन महिन्यांआधी निकालीच निघत नाही असाच या कार्यालयाचा अनुभव आहे. त्याचा नागरिकांना कमालीचा मनस्ताप होत आहे. हेलपाटे मारून त्यांचा जीव मेटाकुटीस येत आहे. ही परिस्थिती सुधारायची असेल तर हे कार्यालय स्वतंत्र करून मनुष्यबळ वाढविण्याची गरज आहे.

या कार्यालयात लोकांना फारच हेलपाटे मारावे लागत असल्याची माहिती ‘लोकमत’ला समजली होती. म्हणून प्रत्यक्ष कार्यालयास भेट देऊन नेमकी वस्तुस्थिती समजून घेतली. सन २०११ च्या जनगणनेनुसार कोल्हापूर शहराची लोकसंख्या साडे चार लाख होती. आता १४ वर्षांनंतर ती साडे सहा ते सात लाखांवर गेली आहे. शासनाने महसूल अंतर्गत अन्नधान्य वितरण कार्यालयाला दिलेले मनुष्यबळ ४ लाख लोकसंख्येचे आहे. लोकसंख्येच्या तुलनेत कर्मचाऱ्यांची संख्या वाढायला हवी होती. प्रत्यक्षात २०२२ च्या आकृतीबंधात आहे हे मनुष्यबळदेखील कमी केले आहे. एक अर्ज निकाली लागायला किमान २ ते ३ महिने लागतात.

ऑनलाइन कारभार कमी, त्रासच जास्तधान्यवाटपात पारदर्शीपणा आणण्यासाठी सर्व कामकाज ऑनलाइन आणले ही बाब चांगली असली तरी त्यात काम कमी आणि त्रासच जास्त आहे. आरसीएमएस ही यंत्रणा गेले दोन महिने बंद-चालू होत आहे. ती सुरू झाली तोपर्यंत आधार लींकिंग सर्व्हर बंद पडला आहे. हे दोन्ही सर्व्हर एकाचवेळी सुरू राहतील त्याचवेळी ऑनलाइन काम करता येते. सोमवारी आरसीएमएसमध्ये सुरू होते; पण, आधार बंद पडली होती.

सध्याचे मनुष्यबळ

  • प्रभारी अन्नधान्य वितरण अधिकारी
  • एक पुरवठा निरीक्षक (हेच सध्या गोदामाचे काम बघतात.)
  • दोन क्लार्क
  • चार जण येथे मदतनीस म्हणून काम करतात.
  • एक महिला उमेदवार आहे.

या कार्यालयातील एका एजंट कम मदतनीस कर्मचाऱ्याच्या विरोधात अनेक तक्रारी आहेत. त्याच्या विरोधात कारवाईचा बडगा उगारला की वरून फोन येतो. किंवा संघटनांना हाताशी धरून आंदोलनाचा स्टंट केला जातो. आणखी एका व्यक्तीबाबत अशाच अनेक तक्रारी होत्या त्याला काढून टाकण्यात आले आहे. मूळ पोस्टिंग करमणूक विभागाची असलेले प्रभारी अन्नधान्य वितरण अधिकारी म्हणून नितीन धापसे पाटील यांनी कार्यभार स्वीकारल्यानंतर येथील एजंटगिरी रोखण्याचा आणि कारभारात सुधारणा करण्याचा प्रयत्न केला असला तरी त्यांना अद्याप पूर्ण यश मिळालेले नाही.

मदतनिसांची मदतयेथे काम करीत असलेल्या दोन जणांना तुम्ही कर्मचारी किंवा एजंट आहात का, असे विचारले असता ते म्हणाले, आम्ही दोन्हीही नाही. मदतनीस म्हणून काम करतो. मिळतील तेवढे मानधन, रक्कम घेतो.

धान्यासाठी सर्वाधिक अर्जया कार्यालयाकडे नवीन रेशन कार्ड काढणे, नाव कमी - जास्त करणे, पत्ता बदलणे यासह विविध दुरुस्त्या असे विविध प्रकारचे अर्ज येतात. पण, सर्वाधिक अर्ज हे धान्य सुरू करण्याचे व ऑनलाइन शिधापत्रिका करून १२ अंकी नंबरसाठीचे येतात. या अर्जावर आरोग्य सुविधा मिळत असल्याने १२ अंकीसाठीच्या अर्जांमध्ये मोठी वाढ झाली आहे.

शिधापत्रिकांच्या कामात सर्व्हरचा मोठा अडथळा होत आहे. अर्ज आल्यापासून तीन दिवसांत शिधापत्रिका द्यायची योजना आहे. मनुष्यबळाची मोठी कमतरता आहे. तुलनेने येणाऱ्या अर्जांची संख्या फार मोठी आहे. त्यामुळे यंत्रणा कमी पडते. प्रत्यक्ष फिल्डवर जाऊन काम करण्यात मर्यादा येतात. - नितीन धापसे पाटील, शहर अन्न धान्य वितरण अधिकारी

टॅग्स :kolhapurकोल्हापूरFood and Drug administrationअन्न व औषध प्रशासन विभाग