शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: उभारले पिलर, पण ठरेना जागेचा दर; सात वर्षांपासून बावड्यातील राजाराम पुलाचे काम रखडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2023 18:05 IST

नाबार्डकडून १७ कोटींचा निधी झाला होता मंजूर

कोल्हापूर : दोन शेतकऱ्यांना ५० गुंठे जमिनीसाठी बाजारभावानुसार दर हवा आहे, तो द्यायला प्रशासन तयार नसल्याने राजाराम बंधाऱ्याला समांतर पुलाचे काम गेल्या सात वर्षांपासून रखडलेले आहे. वडणगेच्या बाजूची पाच गुंठ्याची रक्कम अदा केली असली तरी उर्वरित पाच गुंठ्याची आणि कसबा बावड्याकडील बाजूची ४५ गुंठ्यासाठी बाजारभावाने केलेली मागणी मान्य नसल्याने हे काम बंद आहे.कसबा बावड्याहून वडणगेकडे जाणाऱ्या राजाराम बंधाऱ्याला समांतर पूल बांधण्यात येत आहे. ७.५ मीटर रुंद आणि १९२ मीटर लांब असलेल्या या पुलाच्या कामाची २४ महिन्यांची मुदत जानेवारी २०१९ मध्ये संपली. यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात भूसंपादनासंदर्भात अनेक बैठका झाल्या, परंतु यातून तोडगा निघालेला नाही.सामाजिक प्रभाव मूल्यांकन अहवाल आल्यानंतर विशेष भूसंपादन अधिकाऱ्यांमार्फत सक्तीचे भूसंपादन होणार आहे. मात्र तोपर्यंत या कामाचे घोंगडे भिजतच राहणार आहे. डिसेंबर २०२२ पर्यंत ही प्रक्रिया पूर्ण होणे अपेक्षित होते, मात्र अद्याप अहवाल आला नसल्यामुळे पुढील कार्यवाही झालेली नाही. या पुलाच्या दोन्ही बाजूला असणाऱ्या जोड रस्त्यांसाठी दोन्हीकडच्या बाजूच्या शेतकऱ्यांच्या जमिनीचे संपादन होणे बाकी होते. यापैकी वडणगेच्या बाजूला २५० मीटर जोड रस्त्यासाठी वडणगे परिसरातील शेतकऱ्यांच्या बाजूच्या जमिनीच्या संपादनाची प्रक्रिया आता मार्गी लागली आहे. येथील शेतकरी विजय निवृत्ती रणदिवे यांना पाच गुंठ्यासाठी ३ लाख ४६ हजार मिळालेले आहेत. मात्र पुलालगतच्या पाच गुंठ्याच्या जागेसाठी त्यांनी बाजारभावाने केलेली मागणी सरकारला मान्य नाही. त्यामुळे वडणगेच्या बाजूचे भूसंपादन रखडलेले आहे. कसबा बावड्याच्या बाजूला १८५ मीटर भूसंपादन बाकी आहे. या बाजूचे शेतकरी जयदीप विलास जामदार यांनी त्यांच्या ४५ गुंठे जागेचा दर बाजारभावाने मागणी केली आहे. यासाठी चर्चेच्या फेऱ्या सुरू आहेत. या शेतकऱ्यांच्या जमिनीबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. त्यामुळे या शेतकऱ्यांना जोपर्यंत भरपाई दिली जात नाही, तोपर्यंत या कामाला प्रारंभ होणार नाही. एकूण सातपैकी डिसेंबरअखेर या पुलाचे सहा पिलर उभारले आहेत. जमीन ताब्यात मिळताच काम सुरू करण्यात येईल, अशी माहिती या बांधकामाचे कंत्राटदार राहुल पटेल यांनी सांगितले.

बावडा-वडणगे परिसरातील नागरिकांची सोयदरवर्षीच्या पूरस्थितीत कोल्हापूर शहराला जोडणारा कसबा बावडा येथील राजाराम बंधारा रस्ता पाण्याखाली जातो. याठिकाणी या काळात १८ फूट पाणीपातळी वाढते. दोन महिने या काळात या मार्गावर होणारी बावडा-वडणगे रस्त्यावरील वाहतूक ठप्प होते. हा पूल झाल्यास कसबा बावड्याहून वडणगे मार्गे रत्नागिरी महामार्गाकडे आणि वडणगे परिसरातून बावडा मार्गे औद्योगिक वसाहतीकडे कामासाठी ये-जा करणाऱ्या तसेच परिसरातील २० ते २५ गावांचा संपर्क तुटतो. यामुळे दोन महिने वाहनधारकांची मोठी सोय होणार आहे. पावसाळ्यात हा मार्ग बंद राहिल्याने सर्वांनाच लांबचा पल्ला टाकून यावे लागते.

नाबार्डकडून १७ कोटींचा निधी झाला होता मंजूरया पुलास पर्यायी आणि समांतर पुलासाठी नाबार्डकडून २०१७ मध्ये १७ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला होता. परंतु हे काम भूसंपादनामुळे रखडलेले आहे.

जमिनीचे दर सव्वाचार पट अधिककाम सुरू केले तेव्हा २०१७ मध्ये या जमिनींचे दर कमी होते. परंतु त्यावेळीही संबंधित दोन्ही शेतकऱ्यांनी त्यांच्या जागा हस्तांतरित करण्यास विरोध केला होता. आता या कामासाठी विशेष भूसंपादन अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. परंतु शेतकऱ्यांनी सव्वाचार पट दराने जमिनीचे मूल्यांकन केले आहे. ऑक्टोबर महिन्याअखेर भूसंपादनाचा हा विषय मार्गी लावण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. सध्या पुलाच्या कामासाठी वाढीव निधीची तरतूदही नाबार्डकडून करण्यात आली आहे.

या जमिनी संपादित करण्यापूर्वी आमच्यापैकी कोणाशीही प्रशासनाने चर्चा केली नव्हती. बाजारभावाच्या दुपटीने दर देण्याचा नियम असताना संबंधित अधिकारी ग्रामीण दराने रक्कम देण्याची भाषा करत आहेत. यासंदर्भात कोणतीही नोटीस दिलेली नाही. -जयदीप जामदार, शेतकरी, कसबा बावडा 

गेल्या चार वर्षांपासून अधिकाऱ्यांकडून चर्चा थांबलेली आहे. बाजारभावाने दर मागण्याचा आमचा हक्कही डावलला जातो आहे. शेतीची किंमत आणि व्यवसायासाठीचा दर यांची सांगड घातली जात नाही. -विजय रणदिवे, शेतकरी, वडणगे. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूर