शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरातील अंबाबाई भक्तनिवासाचे काम दोन वर्षांपासून रडतखडत सुरु, ठेकेदारास चारवेळा नोटीस

By इंदुमती सूर्यवंशी | Updated: February 27, 2023 19:56 IST

नोटिसीला अजून ठेकेदाराने उत्तर दिलेले नाही

इंदूमती गणेशकोल्हापूर : पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्यावतीने कपिलतीर्थ मार्केटच्यासमोर सुरू असलेल्या भक्तनिवास व पार्किंगचे काम गेल्या दोन वर्षांपासून रखडले आहे. इमारत उभारण्यासाठी ठेकेदाराला दिलेली मुदत जानेवारीत संपली असून सध्या पहिल्या मजल्याच्या स्लॅबची बांधणी सुरू आहे. संथगतीने सुरू असलेल्या कामाबद्दल समितीने यापूर्वी चारवेळा ठेकेदाराला नोटीस दिली आहे. मागील महिन्यात दिलेल्या नोटिशीत काम का वेळेत झाले नाही व दंडात्मक कारवाई का करू नये अशी विचारणा केली आहे. सध्याचा कामाचा वेग पाहता अजून किती वर्षे हे भक्तनिवास असेच रेंगाळणार अशी विचारणा भाविकांतून होत आहे.देवस्थान समितीच्या २०१०-११ मधील कार्यकारिणीने महालक्ष्मी बँकेची कपिलतीर्थ मार्केटसमोरील ३ हजार १५८ चौरस फूट जागा विकत घेतली. येथे दोन मजले महापालिकेचे पार्किंग, एक मजला देवस्थानचे पार्किंग आणि वरच्या चार मजल्यांवर भक्तनिवास उभारण्यात येणार आहे. याचा ठेका शाहुपुरीतील पॅराडाईज डेव्हलपर्स यांना मिळाला असून ४ जानेवारी २०२१ रोजी त्यांना वर्क ऑर्डर देण्यात आली.

काम पूर्ण करण्यासाठी दिलेली २ वर्षांची मुदत जानेवारी २०२३ मध्ये संपली. दोन वर्षांनंतरही येथील कामाची स्थिती जैसे थे आहे. वर्षभरापूर्वी म्हणजे नोव्हेंबर २०२१ मध्ये येथे बेसमेंटच्या फ्लोअरचा स्लॅब सुरू होता. २०२२ हे पूर्ण वर्ष संपल्यानंतर आता पहिल्या मजल्याच्या स्लॅबची बांधणी सुरू आहे. दोन वर्षांत फक्त बेसमेंटचे स्लॅब पूर्ण झाले असून यावरून हे काम किती कासवगतीने सुरू आहे याची कल्पना येते.कोरोनाची सुरुवात मार्च २०२० मध्ये झाल्यानंतर ही दोन वर्षे कोरोनात गेली, त्यामुळे २०२१ मध्ये काम होऊ शकले नाही हे कारण रास्त आहे. कारण त्या काळात सगळी कामे ठप्प होती. मात्र २०२२ साली कोरोनाचे सावट नसतानाही कामाची गती वाढवली नाही.

देवस्थानचे हे भक्तनिवास आणि महापालिकेच्यावतीने सरस्वती टॉकीज येथे उभारण्यात येत असलेले पार्किंग व भक्तनिवासाचे काम एकाच काळात सुरू झाले. महापालिकेची इमारत उभी राहिली आहे, इथे मात्र पहिला मजला तयार झालेला नाही.

काम पूर्ण करायचे आहे की नाही?याबाबत समितीने दिलेल्या माहितीनुसार मुदत संपल्यानंतरही ठेकेदाराने मुदतवाढीचा प्रस्ताव दिला नाही. त्यामुळे ९ जानेवारीला नोटीस काढण्यात आली. यात दिलेल्या मुदतीत काम पूर्ण का झाले नाही, तसेच काम मुदतीत न झाल्याने नियमानुसार दंडात्मक कारवाई का करण्यात येऊ नये अशी विचारणा करण्यात आली आहे. या नोटिसीला अजून ठेकेदाराने उत्तर दिलेले नाही. मुदतवाढही मागितलेली नाही याचा अर्थ त्यांना काम करायचे नाही का? नसेल त्यांनी तसे देवस्थानला स्पष्ट करणे गरजेचे आहे. भाविकांची गैरसोय होत असताना काम रखडविण्याऐवजी दुसरा ठेकेदार नेमता आला असता.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMahalaxmi Temple Kolhapurमहालक्ष्मी मंदिर कोल्हापूर