शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
2
स्कुबा डायव्हिंग करताना ५२ वर्षीय प्रसिद्ध गायकाचा मृत्यू, चाहत्यांना मोठा धक्का
3
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
4
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
5
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
6
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
7
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
8
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...
9
'सकाळी उठतात, डोळे चोळत काहीही पोस्ट करतात...', कंगना राणौतचा राहुल गांधींवर पलटवार
10
तुम्हालाही छोट्या छोट्या गोष्टींचा राग येतो, आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट अटॅकचे ठराल बळी
11
तुमचा मारुती, ह्युंदाई, टाटावर विश्वास पण डीलर्सचा? या कंपन्या त्यात नाहीच...
12
महायुती सरकारमध्ये सहकारी होण्याचा निर्णय का घेतला? पक्षाच्या चिंतन शिबिरात दादांनी स्पष्टच सांगितलं!
13
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
14
Gold Silver Price 19 September: सोन्याच्या दरात घसरण, पण चांदीच्या किमतीत जोरदार उसळी; कॅरेटनुसार पाहा सोन्याचे नवे दर
15
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा
16
‘मोहरा’ मध्ये सुनिल शेट्टीसोबत रोमान्स करणारी ही अभिनेत्री आता दिसते अशी, ओळखणंही झालं कठीण
17
अनिल अंबानी यांना दणका; येस बँक कर्ज घोटाळा प्रकरणात CBI कडून चार्जशीट दाखल
18
सेकंड हँड कारच्या किंमती धडाधड घसरल्या...; स्पिनी, कार्स २४ सारखे २ लाखांपर्यंत डिस्काऊंट देऊ लागले...
19
"मोदी-फडणवीसांच्या आईवर बोलले गेले, तेव्हा शरद पवारांनी फोन केला नाही, मी माफी कशासाठी मागू"
20
सरकारी नोकरी मिळवण्याचा गोल्डन चान्स; इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये भरती

'वर्क ऑर्डर' दिलेल्या कामाचा पत्ता लागेना, कोल्हापूर महापालिकेचा सावळागोंधळ

By भीमगोंड देसाई | Updated: December 6, 2023 14:08 IST

प्रशासकांनी सूचना दिल्या तरी कोणत्या ठेकेदारांना नोटीस देणार?

भीमगोंडा देसाई कोल्हापूर : शासनाच्या विविध योजनांतून एप्रिल २०२३ पासून शहरात एकूण २४२ कोटींच्या विकास कामांना मंजुरी मिळाली आहे. मात्र यातील कोणती कामे कोणत्या टप्प्यात आहेत, वर्क ऑर्डर देऊनही किती कामे सुरू झालेली नाहीत, याचा पत्ताच महापालिका नगरविकास प्रशासनास अजून लागलेला नाही. असा गलथान कारभार असेल तर प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांनी दिलेल्या सूचनेनुसार कामे सुरू न केलेल्या कोणत्या ठेकेदारांना नोटीस देणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. अशा कारभारामुळेच शहरातील विकास कामांचा बोजवारा उडत असल्याच्या तक्रारी आहेत.सुवर्ण जयंती, नगरोत्थान, लोकशाही आण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजना, पर्यटन विकास, अल्पसंख्याक बहुल नागरी क्षेत्रात विकास अशा विविध योजनांतून विकास कामे मंजूर आहेत. यातून शहरातील रस्ते, गटर्स, पॅसेज काँक्रीट, सभागृह, ओपन जीम, क्रीडांगण विकास अशी २४२ कोटींची कामे मंजूर आहेत. यांना वर्क ऑर्डरही देण्यात आली आहे. मात्र प्रत्यक्षात किती कामे सुरू झालेली आहेत, सुरू झालेली कामे कोणत्या टप्प्यात आहेत, वर्क ऑर्डर देऊनही किती कामांना सुरुवात झालेली नाही, याची नेमकी माहिती महापालिकेतील नगरविकास विभागाकडे नाही. परिणामी या कामांवर कोणाचे नियंत्रण आहे की नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

शहरातील रस्त्यांची कामे अजूनही सुरू झालेली नाहीत. कामे मंजूर आहेत, मात्र प्रत्यक्षात कामाला सुरुवात न झाल्याने वाहनधारकांना खड्डे पडलेल्या रस्त्यावरून प्रवास करावा लागत आहे. मंजूर कामांचा ठेका घेतलेल्या ठेकेदारास काम सुरू करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. मात्र तो आदेश गुंडाळून ठेवून प्रत्यक्ष कामाला सुरुवात झालेली नाही, असे दोन दिवसांपूर्वी झालेल्या आढावा बैठकीत प्रशासक मंजुलक्ष्मी यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे संबंधित ठेकेदारांना नोटीस काढण्याच्या सूचना दिल्या आहेत. नोटीस देण्यास किती ठेकेदार पात्र आहेत, याची एकत्रित माहिती महापालिका नगरविकास विभागाकडे नसल्याचे समोर आले आहे.

२० ते २५ ठेकेदारकामांची निविदा ऑनलाईन प्रसिद्ध केली जाते. मात्र महापालिकेची कामे करणारे माजी नगरसेवकांच्या जवळचे ठरावीकच ठेकेदार आहेत. त्यांच्याकडे ऑनलाईन निविदा मॅनेज करून आपल्यालाच ठेका मिळवण्याचे कौशल्य आहे. यामुळे त्यांनीच मंजूर २४२ कोटींचीही कामे घेतली आहेत. प्रशासकांनी त्यांना नोटीस काढायचे आदेश दिले तरी अधिकाऱ्यांचे अर्थपूर्ण साटेलोटे असल्याने ते धाडस करीत नाहीत, अशाही तक्रारी आहेत.

नेत्याचा एक पीए आणि काही माजी नगरसेवकसत्तेतील एका नेत्याचा पीए आणि ठेकेदाराशी मधुर संबंध असलेले तीन ते चार माजी नगरसेवक महापालिकेच्या जबाबदार अधिकाऱ्यांना वारंवार चिकटून बसत आहेत. ते अधिकाऱ्यांसमोर असले तर शिपाई अभ्यागतांना कक्षात प्रवेश देत नाहीत. यामुळे बाहेर अभ्यागतांना तासन्तास ताटकळत राहावे लागत आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर