शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

बाजार समित्यांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा, कोल्हापुरातील 'या' तीन बाजार समितीवरील स्थगिती उठली

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2023 14:18 IST

कोल्हापूर : संचालक मंडळाची मुदत संपलेल्या बाजार समित्यांची निवडणूक प्रक्रिया ३० एप्रिल २०२३ पूर्वी पूर्ण करण्याचे आदेश उच्च न्यायालयाच्या ...

कोल्हापूर : संचालक मंडळाची मुदत संपलेल्या बाजार समित्यांची निवडणूक प्रक्रिया ३० एप्रिल २०२३ पूर्वी पूर्ण करण्याचे आदेश उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी दिले. त्यामुळे जिल्ह्यातील ‘कोल्हापूर’, ‘गडहिंग्लज’ व ‘जयसिंगपूर’ बाजार समित्यांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला आहे.राज्यातील बाजार समित्यांच्या निवडणुका गेली सव्वादोन वर्षे विविध कारणाने लांबणीवर टाकल्या होत्या. ऑक्टोबर महिन्यात सहकारी निवडणूक प्राधिकरणाने निवडणुकीची प्रक्रिया सुरू केली होती. त्यानुसार प्रारूप व अंतिम याद्या झाल्या होत्या. मात्र, तोपर्यंत राज्यातील ग्रामपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्याने ही प्रक्रिया थांबवली होती. त्यातच ग्रामपंचायतींच्या नवीन सदस्यांचा समावेश मतदार यादीत करण्याबाबत याचिका दाखल झाल्या होत्या. राज्यातील विविध न्यायालयांतील याचिका एकत्रित करत नागपूर खंडपीठाकडे सुनावणीसाठी दिल्या होत्या. गुरुवारी त्यावर सुनावणी होऊन ३० एप्रिलपर्यंत निवडणुका पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे ‘कोल्हापूर‘, ‘गडहिंग्लज’ व ‘जयसिंगपूर‘ बाजार समित्यांची प्रक्रिया सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.ग्रामपंचायत नवीन सदस्यांबाबत संभ्रमावस्थाग्रामपंचायतीच्या निवडून आलेल्या नवीन सदस्यांची नावे मतदार यादीत समाविष्ट करण्याची मागणी याचिकाकर्त्यांनी न्यायालयाकडे केली होती. मात्र, आजच्या आदेशात याबाबत स्पष्टता नसल्याने याबाबत संभ्रमावस्था आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर