शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

पन्हाळगडावरील ऐतिहासिक तलावाची भिंत ढासळली

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2022 19:20 IST

गेल्या दोन वर्षात तीन वेळा तलावाच्या भिंती कोसळल्या आहेत.

पन्हाळा : पन्हाळा  येथील प्रवेशद्वारावर असणाऱ्या सादोबा तलावाच्या भिंतीचा काही भाग आज पुन्हा ढासळला.  पन्हाळा येथील सादोबा तलाव ऐतिहासिक तळे असून या तळ्याचे बांधकाम आदिलशहाच्या काळात करण्यात आले असल्याची नोंद आहे. या तळ्याच्या संवर्धनासाठी अनेक वर्षांपासून प्रयत्न सुरू आहेत. मात्र नगरपालिका प्रशासनाने याकडे पूर्ण दुर्लक्ष केले आहे.सादोबा तळ्याच्यावरील भागात मुस्लिम समाजाची दफनभूमी आहे. त्याचबरोबर काही भागात लोकवस्तीदेखील आहे. गेल्या तीन दिवसांत पडलेल्या मुसळधार पावसामुळे तळ्याच्या मोटवण नावाच्या भिंतीचा पुढील भाग ढासळला असून ढासळलेला भाग तळ्याच्या मुख्य भिंतीचा आधार होता. आधाराची ही भिंत ढासळल्याने मुख्य भिंती चा भरावदेखील खाली येण्याची शक्यता आहे.गेल्या दोन वर्षात तीन वेळा तलावाच्या भिंती कोसळल्या आहेत. त्यांची डागडुजी केलेली नाही. तसेच तलावाच्या बाजूने जाण्याच्या रस्त्यावरदेखील भिंतीना तडे गेले आहेत. याबाबत देखील पालिकेने पूर्ण दुर्लक्ष केले आहे. अनेकवेळा तेथील नागरिकांनी नगरपरिषद, पदाधिकारी, अधिकारी यांना तळ्याच्या भिंती दुरुस्ती करावी अशी विनंती केली आहे. मात्र याकडे दुर्लक्ष करण्यात आले.राज्य शासनाने सरोवर संवर्धनासाठी पालिकाना निधी दिला होता. या निधीचे काय झाले? असा सवाल नागरिक विचारत आहेत. सादोबा तलावाच्या संरक्षक भिंती तातडीने बांधकाम न केल्यास पूर्ण तलाव लवकरच मुजुन जाइल अशी शंका नागरिकांनी व्यक्त केली आहे. तलावात महिला कपडे धुण्यासाठी जातात. भिंती ढासळत असल्याने तलावात जाणे धोक्याचे झाले आहे. ऐतिहासिक तलाव दुरुस्तीसाठी शासनाने त्वरीत उपाययोजना करावी अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर