शहरं
Join us  
Trending Stories
1
काळाचा घाला! बाराबंकीमध्ये भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, ८ जखमी, कारचा चक्काचूर
2
आजचे राशीभविष्य,०४ नोव्हेंबर २०२५: वडीलधाऱ्यांकडून लाभ, दुपार नंतर प्रतिकूलतेशी तोंड द्यावे लागेल
3
ठाण्यातील दोस्ती कम्पाउंडमधील ८ इमारतींचे पाडकाम सुरू; दीड हजार रहिवाशांचा आक्रोश
4
इंडिया मेरिटाईम वीक-२०२५: ‘जेएनपीए’चे जागतिक स्तरावरील १९ कंपन्यांशी २ लाख काेटींचे करार
5
पाळीव प्राण्यांना सन्मानाने ‘शेवटचा निरोप’; विशेष अंत्यविधी केंद्रांच्या उभारणीलाही सुरुवात
6
अलिबाग-रोहा मार्गावर पूल कोसळला; वाहतूक पूर्ण ठप्प; राेजच्या प्रवाशांचे हाल
7
मुंब्रा दुर्घटना: रेल्वेच्या २ अभियंत्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा; ४ महिन्यांनंतर कारवाई
8
रोहित आर्याप्रकरणी अहवाल सादर करा! मानवाधिकार आयोगाकडून पोलिसांना ८ आठवड्यांची मुदत
9
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
10
मतदारांची दुबार नावे शोधा, त्यांचे दुबार मतदान रोखा! निवडणूक आयोगाने दिले स्पष्ट आदेश
11
STचा पुढचा पल्ला वीजनिर्मितीचा; सौरऊर्जा प्रकल्पातून वर्षाला ३०० मेगावॅट निर्मितीचे लक्ष्य
12
मुंबई अपहरण प्रकरण: रोहित आर्याचे एन्काउंटर; माजी मंत्री केसरकर यांची हाेणार चौकशी
13
मुख्य अधिष्ठाता डॉ. बारोट यांची उचलबांगडी; हलगर्जी भोवली, वैद्यकीय अधिकाऱ्याला कारणे दाखवा
14
आवडत्या बांधकाम व्यावसायिकांसाठी ५ हजार कोटींचा पीएपी घोटाळा: वर्षा गायकवाड
15
डॉक्टर संपाचा रुग्णसेवेवर परिणाम नाही; राज्यभर ओपीडीत रुग्णांची नेहमीप्रमाणेच तपासणी
16
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
17
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
18
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
19
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
20
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर

लंडनमधून आणली जाणारी वाघनखे शिवाजी महाराज यांची नव्हेतच, इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांचा दावा

By पोपट केशव पवार | Updated: July 8, 2024 19:39 IST

राज्य सरकार शिवप्रेमींची दिशाभूल करत असल्याचा आरोप

कोल्हापूर : लंडन येथील व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियम येथे असणारी वाघनखे छत्रपती शिवाजी महाराज यांचीच आहेत असा कोणताही पुरावा आमच्याकडे नसल्याची कबुली खुद्द व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियमने दिली आहे. मात्र, जी वस्तू छत्रपती शिवाजी महाराजांची नाही, ती महाराजांचीच आहे असे भासवून राज्य सरकार शिवप्रेमींची दिशाभूल करत असल्याचा आरोप इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केला.सावंत म्हणाले, व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियम येथील विविध वाघ नखांपैकी एक वाघनख तीन वर्षांसाठी भाडेतत्त्वावर आणण्याचा सामंजस्य करार ३ ऑक्टोबर २०२३ रोजी महाराष्ट्र शासन व व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझिअम यांच्यात झाला. यावेळी सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवर व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ही वाघनखे छत्रपती शिवाजी महाराजांची असल्याचा दावा केला. यासंदर्भात मी व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियम यांच्याकडून माहिती मागवली असता, त्यांनी १९ जून २०२४ रोजी पत्र पाठवून ही वाघनखे छत्रपती शिवाजी महाराजांची आहेत असा कोणताही पुरावा म्युझियमकडे नसल्याचे सांगितले.याची माहिती राज्य शासनाच्या प्रतिनिधींनीही दिल्याचे म्युझियमने सांगितले; पण राज्य सरकारने ही माहिती जनतेपासून लपवून ठेवली. या वाघनखांची प्रतिकृती महाराष्ट्रात विविध ठिकाणी प्रदर्शित करण्यासाठी कोट्यवधी रुपयांच्या निधीची उधळपट्टी केली जात आहे. मात्र, ही वाघनखे शिवाजी महाराज यांची नाहीत. म्युझियममधील वाघनखे ही मूळ वाघनखांची प्रतिकृती असू शकते. मूळ वाघनखे ही सातारच्या छत्रपतींकडे कायम राहिली असल्याचे पुरावे सांगतात, असेही सावंत म्हणाले.वाघनखे सातारच्या छत्रपतींकडेचछत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली वाघनखे ही मराठ्यांच्या शौर्याचे प्रतीक आहेत. ही वाघनखे सातारच्या छत्रपतींकडे कायम राहिली असल्याचे पुरावे सांगतात. महाराष्ट्राची अस्मिता या वाघनखांशी जोडली असल्याने लंडनमधील वाघनखांच्या प्रतिकृतीला छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे असल्याचे सांगून दिशाभूल केली जात आहे. पेशव्यांच्या कैदेतून सुटून सातारा राज्याची पुनर्स्थापना करणारे छत्रपती प्रतापसिंह महाराजांच्या विश्वासार्हतेलाच तडा पोहोचवण्याचा प्रयत्न होतोय की काय, अशी शंका सावंत यांनी उपस्थित केली.सरकार उदासीनही वाघनखे छत्रपती शिवाजी महाराज यांची नाहीत याचे ठोस पुरावे मी राज्य सरकारला दिले होते. सांस्कृतिक कार्यमंत्री, सांस्कृतिक कार्य विभाग सचिव आणि महाराष्ट्र राज्य पुरातत्त्व संचालनालयाचे तत्कालीन संचालक तेजस गर्गे यांना वारंवार पत्रव्यवहारातून सादर केले आहेत. मुख्यमंत्र्यांनाही पत्र पाठवून याची माहिती दिली; पण या गंभीर विषयाबाबत सरकारची उदासीनता असल्याचे ते म्हणाले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरhistoryइतिहासShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराज