शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

वारणा रेठरेत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भानामती, गावात उडाली खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2022 13:58 IST

बकर्‍याची प्रतिमा तयार करुन त्याला लाकडी पाय जोडून पाठीवर हिरव्या रंगाचे फडके टाकून पाठीत लाकडी खुटी मारली आहे. तसेच त्याच्या गळ्यात हिरव्या बांगड्या अडकविल्या आहेत.

अनिल पाटीलसरुड : विज्ञान व तंत्रज्ञानाने जग २१ व्या शतकात प्रगतीकडे वाटचाल करत असताना अद्यापही समाजात अंधश्रध्देचे समूळ उच्चाटन झालेले दिसत नाही. निवडणुका आल्या की गावा-गावात भानामती प्रकार अचूनही समोर येतात. असाच काहीसा प्रकार शाहूवाडीतील वारणा रेठरे येथील सेवा संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर समोर आला आहे. या भानामतीच्या प्रकारामुळे गावात एकच खळबळ उडाली आहे.शाहूवाडीच्या माजी सभापती लतादेवी पाटील व माजी पंचायत समितीचे सदस्य जालींदर पाटील यांच्या राहत्या घरासमोर करणी व भानामतीचा प्रकार घडल्याचे आज, गुरुवार सकाळी उघडकीस आले. गावातील विठ्ठल विकास सेवा संस्थेच्या निवडणुकीतुनच हा प्रकार घडल्याची परिसरात चर्चा रंगली आहे.वारणा रेठरे येथील विठ्ठल विकास सेवा संस्थेसाठी येत्या, शनिवार (दि.४) मतदान होणार आहे. या निवडणुकीत जालींदर पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस युतीचे नवलाई भराडी विठ्ठलाईदेवी पॅनेल विरोधात जनसुराज्य - काँग्रेस युतीचे नवलाई भराडी विठ्ठलाईदेवी परिवर्तन पॅनेल अशा दोन आघाड्यांमध्ये चुरशीची लढत होत आहे.दरम्यान काल, बुधवारी मध्यरात्री  जालींदर पाटील यांच्या घराशेजारी अज्ञातांनी करणी, भानामतीचा हा प्रकार केला आहे. यामध्ये बकर्‍याची प्रतिमा तयार करुन त्याला लाकडी पाय जोडले आहेत. या प्रतिमेच्या पाठीवर हिरव्या रंगाचे फडके टाकुन पाठीत लाकडी खुटी मारली आहे. तसेच त्याच्या गळ्यात हिरव्या बांगड्या अडकविल्या आहेत. या प्रतिमेवर हळद, कुंकु टाकून शेजारी अगरबत्ती, कापूर जाळण्यात आला आहे.भानामतीचा हा भयानक प्रकार आज, गुरुवारी सकाळी जालींदर पाटील यांच्या निदर्शनास आला. ही बातमी गावात पसरताच पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेतली व सदर घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला. सेवा संस्था निवडणुकीतुनच हा प्रकार घडला असल्याची चर्चा गावात सुरु होती.

आमच्या सत्ताधारी पॅनेलचा पराभव व्हावा या हेतूनेच विकृत प्रवृत्तीच्या लोकांकडून हे कृत्य करण्यात आले आहे. सेवा संस्थेची निवडणूक ही लोकशाही मार्गाने होत असताना या निवडणूकीच्या तोंडावर अंधश्रध्देचा आधार घेऊन  ग्रामस्थांच्या मध्ये भिती निर्माण करण्याचा  हा प्रकार  निषर्धाह आहे. - जालींदर पाटील - रेठरेकर माजी पं. स. सदस्य

टॅग्स :kolhapurकोल्हापूरElectionनिवडणूक