शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
2
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
3
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
4
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
5
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
6
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
7
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
8
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
9
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
10
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
11
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
12
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
13
भयंकर! बॉयफ्रेंडसाठी नवऱ्यासह मुलाला सोडलं, 'त्याने'च तिला संपवलं, अंगावर काटा आणणारी घटना
14
बंपर गिफ्ट...! या मल्टीबॅगर कंपनीनं १-२ नव्हे, वाटले तब्बल 24 बोनस शेअर, लोकांना केलं मालामाल; दिलाय 6100% हून अधिक परतावा
15
"विवाहित महिलांनी घरात...", विजयाच्या नशेत केरळच्या सीपीएम नेत्याचं वादग्रस्त विधान; उडाला गोंधळ
16
महालक्ष्मी रेसकोर्सवर साकारणार भव्यदिव्य सेंट्रल पार्क; आराखड्याचे महापालिकेकडून सादरीकरण
17
"मतदार याद्यांमधले घोळ आम्हीही दाखवले, पण..."; महापालिका निवडणुकांच्या घोषणेवर CMचे विधान
18
रेखा झुनझुनवालांकडे या कंपनीचे तब्बल ५ कोटींहून अधिक शेअर; ₹३०० पार जाणार स्टॉक, एक्सपर्ट्सचा दावा
19
Photo: 'या' वर्षातील बेस्ट बजेट स्मार्टफोन, किंमत १५ हजारांपेक्षा कमी, यादीत मोठे ब्रँड्स
Daily Top 2Weekly Top 5

शरीरातील ‘आनंददायी मूलद्रव्य’चाचणी कमी खर्चात होणार, शिवाजी विद्यापीठातील संशोधनाला मिळालं पेटंट

By संतोष.मिठारी | Updated: November 29, 2022 17:17 IST

मानसिक विकारांचे प्रभावी निदान होणार

कोल्हापूर : येथील शिवाजी विद्यापीठाच्या रसायनशास्त्रज्ञांनी मानवी शरीरातील ‘आनंददायी मूलद्रव्य’ असलेल्या सेरोटोनिन या मूलद्रव्यासाठी नॅनो-संयुगांच्या सहाय्याने सेन्सिंग पद्धत विकसित केली आहे. त्यासाठी त्यांना भारतीय पेटंट मिळाले आहे. विद्यापीठाच्या रसायनशास्त्र अधिविभागातील डॉ. सागर डेळेकर आणि संशोधक विद्यार्थी डॉ. साजिद मुल्लाणी यांनी ही कामगिरी केली.डॉ. डेळेकर यांचे या वर्षातील हे सलग दुसरे भारतीय पेटंट आहे. या संशोधनात रसायनशास्त्राच्या क्षेत्रामधील हे एक महत्त्वपूर्ण संशोधन असून मानवाच्या विविध मनोविकारांचे निदान आणि उपचारांमध्ये दूरगामी परिणाम करण्याची क्षमता त्यात आहे. डॉ. डेळेकर, मुल्लाणी यांचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, प्रभारी कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांनी अभिनंदन केले.मानसिक विकारांचे प्रभावी निदान होणारसेरोटोनिनच्या असंतुलनामुळे माणसाला ताण-तणाव, नैराश्य, चिंता, निद्रेच्या समस्या, पचनाच्या समस्या, आत्मघाती वर्तन, वेड लागणे, आघातानंतरची तणावपूर्ण विकृती, स्किझोफ्रेनिया (मानसिक विकार), फोबिया (भीती) यासारख्या विविध मनोकायिक समस्यांना सामोरे जावे लागते. बिघडलेल्या मानसिक संतुलनाचे जर प्राथमिक अवस्थेत योग्य निदान झाल्यास त्याची मानसिक परिस्थिती नियंत्रणात आणता येऊ शकते.

या निदानासाठी आजघडीला अत्यंत महागड्या वैद्यकीय तपासण्या कराव्या लागतात. त्यांना पर्याय म्हणून या संशोधनांतर्गत विविध नॅनोसंमिश्रांचा वापर करून अत्यंत सुलभ व कमी खर्चिक सेरोटोनिन चाचणी पद्धती विकसित करण्यात यश आले आहे. या संशोधनामुळे विविध मानसिक विकारांचे अधिक चांगले आणि प्रभावी निदान करता येईल, त्याचप्रमाणे योग्य उपचार करण्यास मदत होईल, असे डॉ. डेळेकर यांनी सांगितले.

या संशोधन प्रकल्पावर डॉ. डेळेकर, मुल्लाणी हे सन २०१८पासून काम करीत आहेत. त्यांच्या परिश्रमाचे फलित म्हणजे हे पेटंट आहे. अनेक लोक मनोकायिक आजारांना बळी पडत आहेत. या संशोधनामुळे अशा रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे. भविष्यात वैद्यकीय उपचारांमध्ये या पद्धतीचे समावेशन शक्य आहे. - डॉ. दिगंबर शिर्के, कुलगुरू

टॅग्स :kolhapurकोल्हापूरShivaji Universityशिवाजी विद्यापीठ