शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्याची शताब्दी वर्षाकडे वाटचाल, देशातील पहिले स्मारक

By संदीप आडनाईक | Updated: April 12, 2025 11:58 IST

लोकवर्गणीतून एक लाख ४० हजार ७०० रुपये जमा झाले होते

संदीप आडनाईककोल्हापूर : देशातील पहिले स्मारक असलेल्या कोल्हापुरातील ऐतिहासिक दसरा चौकातील राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या भव्य पूर्णाकृती पुतळ्यास शनिवार, दि. १२ एप्रिल २०२४ रोजी ९८ वर्षे पूर्ण होत आहेत. हे स्मारक येत्या दोन वर्षांत शताब्दी वर्षात पदार्पण करत असून, शताब्दी वर्षाकडे वाटचाल करत आहे. हा पुतळा आणि ऐतिहासिक दसरा चौक कोल्हापूरच्या जनतेची प्रेरणा आणि स्वाभिमानाच्या खुणा अजूनही जपतो आहे.दसरा चौकातील या पुतळ्यासमोर दरवर्षी जयंतीनिमित्ताने शाहूप्रेमी, तसेच सर्व मंत्री जेव्हा जेव्हा कोल्हापुरात येतात, तेव्हा तेव्हा नतमस्तक होतात. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा जन्म २६ जून १८७४ रोजी कसबा बावडा येथील लक्ष्मीविलास पॅलेस येथे झाला आणि ६ मे १९२२ रोजी त्यांचे देहावसान झाले. त्यांचे देशातील पहिले प्रत्यक्ष स्मारक त्यांचे थोरले चिरंजीव राजाराम महाराज यांनी या पुतळ्याच्या रूपातून उभारले. या पुतळ्यासाठी लोकवर्गणीतून एक लाख ४० हजार ७०० रुपये जमा झाले होते.मुंबईचे शिल्पकार गणपतराव म्हात्रे यांनी हा ब्राँझचा पुतळा मुंबईत तयार केला. त्यासाठी ७५ हजारांवर खर्च झाला. या पुतळ्याची उंची साडेआठ फूट असून, मस्तकावर मंदील आणि अंगात मराठेशाहीचा पायघोळ अंगरखा आहे. उजव्या हातात तलवार असून, दुसरा हात झग्यामध्ये आहे. हा पुतळा रेल्वेने मुंबईतून कोल्हापुरात आणि रेल्वे स्थानकापासून दसरा चौकापर्यंत वाजत-गाजत मिरवणुकीने आणला. तत्कालीन मुंबई प्रांताचे गव्हर्नर लेस्ली विल्सन यांनी त्याचे अनावरण केले होते.जन्मदिनांकाचा होता वाद

  • शाहू महाराजांच्या जन्मदिनांकाचा वादही पूर्वी गाजला होता. पुतळ्याचे अनावरण झाले, तेव्हा शिलालेखावर जुलै असा उल्लेख आहे. मात्र, महाराजांचा जन्मदिवस २६ जून १८७४ असल्याचे अनेक पुरावे इतिहासकारांनी मान्य केले आहेत.
  • या पुतळ्यावरील शिलालेखातील मजकुरामध्ये कै. छत्रपती तिसरे श्री शाहू महाराज (एल.एल.डी.जी.सी.एस.आय.) यांचा हा पुतळा कोल्हापूर राज्यातील कृतज्ञ प्रजाजनाने त्यांच्या स्मरणार्थ तयार करून नेक नामदार सर लेस्ली उईल्सन मुंबईचे गव्हर्नर यांच्या हस्ते ता. १२ एप्रिल, १९२७ दिवशी या ठिकाणी उघडला. जन्म : २६ जुलै १८७४ व मृत्यू : ६ मे १९२२ असा मराठी आणि समोरील बाजूस इंग्रजीत उल्लेख आहे.
टॅग्स :kolhapurकोल्हापूर