शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

गुन्हा करून नाही सुटणार; ही ‘व्हॅन’ जागेवर पुरावे देणार !; राज्य शासनाकडून पोलिस दलास २५९ व्हॅन दिल्या जाणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2025 18:45 IST

गुन्हे सिद्धतेचे प्रमाण वाढणार

कोल्हापूर : सात वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त वर्षांच्या शिक्षेची तरतूद असलेल्या गुन्ह्यांसाठी फॉरेन्सिक पुराव्यांचा वापर अनिवार्य आहे. यासाठी राज्य शासनाकडून पोलिस दलास २५९ मोबाइल फॉरेन्सिक व्हॅन दिल्या जाणार आहेत. या व्हॅनमध्ये रासायनिक विश्लेषण करणारी उपकरणे, डीएनए-रक्त नमुन्यांसाठी विशेष किट्स आणि डिजिटल पुरावे जमा करण्याची साधने उपलब्ध असतील. त्यामुळे खून, बलात्कारासारख्या गंभीर गुन्ह्यांत तक्रारदार, साक्षीदार फितूर झाल्यामुळे किंवा सबळ पुराव्यांअभावी आरोपी सुटणार नाहीत.काय आहे फॉरेन्सिक व्हॅनअनेक गंभीर गुन्ह्यात सबळ पुरावे उपलब्ध नसल्याने किंवा फिर्यादी, साक्षीदार फितूर झाल्यामुळे आरोपी निर्दोष सुटतात. गुन्हे सिद्धतेचे प्रमाण वाढविण्यासाठी सक्षम पुरावे गरजेचे असतात. यासाठी राज्य सरकारने मोबाइल फॉरेन्सिक व्हॅन पोलिसांना देण्याचा निर्णय घेतला आहे. ही व्हॅन गुन्हा घडलेल्या ठिकाणी जाऊन पुरावे जमवणार तसेच त्याचे रासायनिक विश्लेषण करून आरोपींच्या विरोधातील सबळ पुरावे पोलिसांना देणार आहे.

सध्या एक व्हॅन उपलब्धराज्य सरकारने घोषणा करण्यापूर्वीच कोल्हापूर जिल्हा पोलिस दलाकडे एक फॉरेन्सिक व्हॅन कार्यरत होती. तत्कालीन पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी फॉरेन्सिक व्हॅन तयार करवून घेतली होती. आता नवीन योजनेंतर्गत एक व्हॅन जिल्हा पोलिस दलास मिळण्याची शक्यता आहे.व्हॅनमध्ये असलेल्या सुविधामोबाइल फॉरेन्सिक व्हॅनमध्ये पुरावे जमा करण्यासाठी डिजिटल साधने आणि उपकरणे असतील. रक्ताचे नमुने घेणे, त्यांचे रासायनिक विश्लेषण करणे, यासाठी लागणाऱ्या आवश्यक कीट व्हॅनमध्ये असतील. हे सर्व काम पाहण्यासाठी फॉरेन्सिक तज्ज्ञांचे पथकही व्हॅनसोबत असेल. प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन काम करण्याच्या पद्धतीमुळे तपास गतिमान होणार आहे. तसेच गुन्हे सिद्धतेचे प्रमाण वाढविण्यास मदत होणार आहे.

आता गुन्हेगारांची खैर नाहीफॉरेन्सिक व्हॅनमुळे गुन्हेगारांच्या विरोधातील सक्षम पुरावे मिळविण्यास मदत होणार आहे. काही फिर्यादी आणि साक्षीदार न्यायालयात फितूर झाले तरी पुरावे उपलब्ध असल्याने गुन्हेगारांना शिक्षेपर्यंत पोहोचविता येणार आहे.

पुरावे जमा करण्याच्या पारंपरिक पद्धतीतील मर्यादा लक्षात घेऊन सरकारने पोलिसांना मोबाइल फॉरेन्सिक व्हॅन देण्याचा निर्णय घेतला आहे. लवकरच यातील व्हॅन उपलब्ध होईल. यामुळे न्यायालयात गुन्हे सिद्ध होऊन आरोपींना शिक्षेपर्यंत पोहोचविण्याचे प्रमाण वाढेल. - रवींद्र कळमकर - पोलिस निरीक्षक, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा