शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत द्वेष्टा...! डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर पहिला वार; ६ भारतीय ऑईल कंपन्यांवर निर्बंध लादले...
2
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
3
जुनी मैत्रिण ४ वर्षांनी पुन्हा भेटली, एकांतात भेटायला बोलावलं; बंद खोलीत तिला कायमचं संपवलं, मग... 
4
Video - क्रूरतेचा कळस! 'ती' जीव वाचवण्यासाठी हाता-पाया पडली पण 'तो' अमानुषपणे मारत राहिला
5
Video - पावसाचे थैमान! पुरामध्ये ३० तास अडकली शाळेची बस, १०० जणांना वाचवण्यात यश
6
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
7
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
8
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
9
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
10
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
11
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
12
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
13
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
14
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
15
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
16
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
17
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
18
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
19
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
20
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती

अपघातातील जखमी कुत्र्याची कवटी शस्त्रक्रियेने जोडली, कोल्हापुरात पहिलाच प्रयोग 

By संदीप आडनाईक | Updated: May 31, 2024 12:57 IST

संदीप आडनाईक कोल्हापूर : एका अपघातात चारचाकी वाहनाच्या धडकेत डोक्याच्या कवटीला इजा झाल्याने अधू झालेल्या कुत्र्यावर जरगनगर कोल्हापूर येथील ...

संदीप आडनाईककोल्हापूर : एका अपघातात चारचाकी वाहनाच्या धडकेत डोक्याच्या कवटीला इजा झाल्याने अधू झालेल्या कुत्र्यावर जरगनगर कोल्हापूर येथील पशु शल्यचिकित्सक डॉ. संतोष वाळवेकर यांनी यशस्वी शस्त्रक्रिया केली. या उपचारामुळे हा कुत्रा पूर्ववत झाला असून त्याची हालचालही पूर्वीप्रमाणेच सुरू आहे. इम्प्लांटद्वारे तुटलेली कवटी जोडण्याची यशस्वी शस्त्रक्रिया कोल्हापुरात प्रथमच झालेली आहे.

करनूर (ता. कागल)च्या प्रणव पाटील यांच्या मालकीच्या या कुत्र्यास गेल्या महिन्यात चारचाकीने जोरदार धडक दिली. त्यात त्याच्या कवटीचे तसेच नाकाच्या हाडांचे दोन मोठे आणि आठ छोटे तुकडे झाले. या तुटलेल्या हाडांचे तुकडे या कुत्र्याच्या मेंदूत घुसल्याने मेंदू आणि नाकातून मोठा रक्तस्राव झाला. त्यामुळे मेंदूवरील नियंत्रण सुटल्याने त्याच्या शरीराची हालचाल अनियंत्रित झाली. मागील पायाने अधू झालेल्या आणि प्राण जाण्याच्या अवस्थेत असताना या कुत्र्यावर जरगनगर येथील पशु शल्यचिकित्सक डॉ. संतोष वाळवेकर यांनी पुढील उपचार केले.त्यांनी या कुत्र्याच्या मेंदूत घुसलेल्या हाडांचे तुकडे व्यवस्थित बाहेर काढण्यात यश मिळविले. त्यानंतर या चार हाडांच्या तुकड्यांना बोन प्लेट् इम्प्लांट आणि एसएस वायरद्वारे जोडण्याची यशस्वी शस्त्रक्रिया केली. त्यानंतर या कुत्र्याच्या मेंदूवरील दाब कमी करून शरीराची हालचाल नियंत्रित करण्यात त्यांना यश आले. हळूहळू त्याचे मागील अधू पायही सुरळीत झाले आणि हा कुत्रा आता हिंडू फिरू लागला आहे.

अपघातामुळे अधू झालेल्या माझ्या कुत्र्याच्या मेंदूवरील ताबा सुटला होता. मरणासन्न अवस्थेतील या कुत्र्यावर डॉ. वाळवेकर यांनी केलेल्या उपचारामुळे तो पूर्ववत होऊन चालू, फिरू आणि खाऊ लागला आहे. -प्रणव पाटील, कुत्रा मालक, करनूर, ता. कागल.प्राण्यांवर तुटलेल्या मणक्याच्या, जबड्यांच्या आव्हानात्मक शस्त्रक्रिया यशस्वीपणे केल्या आहेत. अपघातात अधू झालेल्या प्राण्यांना फिजिओथेरपी आणि उपचाराद्वारे पूर्ववतही केले आहे.  -डॉ. संतोष भिकाजी वाळवेकर, पशु शल्यचिकित्सक.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरdogकुत्रा