शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
2
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
3
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
4
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
5
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
6
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
7
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
8
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
9
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
10
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?
11
"मी झोपले होते, अचानक जोरदार स्फोट झाला, डोळे उघडले तेव्हा..."; अकोल्याची ऐश्वर्या कशी बचावली?
12
इराणवरील हल्ल्यानंतर इस्रायलचा मोठा निर्णय! जगभरातील दूतावास बंद केले; आता बदल्याची भीती
13
'जे धाडसी होत होते ते मारले गेले'; ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली; म्हणाले, "करार करा नाहीतर..."
14
Israel Iran Conflict: इस्रायलच्या हवाई हल्ल्यात मारले गेलेले इराणचे 'ते' सहा अणुशास्त्रज्ञ कोण?
15
इराणच्या अण्वस्त्र ठिकानांवर इस्रायलचा पुन्हा हल्ला, केली तुफान बॉम्बिंग; ट्रम्प यांच्या धमकीनंतर, अ‍ॅक्शन मोडवर नेतन्याहू!
16
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार
17
WTC Final : मिचेल स्टार्कनं अर्धशतकासह रचला इतिहास; हेजलवूडच्या साथीनं ५० वर्षांचा विक्रमही मोडला
18
"आदमी खिलौना है" शेवटचं स्टेटस; अहमदाबाद विमान दुर्घटनेत हरियाणातील अंजू शर्मा यांचा दुर्दैवी अंत!
19
जन्मदाताच बनला हैवान! पत्नीशी झालेल्या भांडणाच्या रागात लेकरांवर केला वार, मुलीचा जागीच मृत्यू 
20
ज्याची होती चर्चा, तेच कारण समोर आलं...! राजाला का मारलं? सोनमनं सगळंच सांगून टाकलं; खरा मास्टरमाइंड आला समोर

..अखेर देशातील दुसऱ्या क्रमांकाचा अन् महाराष्ट्रातील सर्वाधिक उंचीचा राष्ट्रध्वज फडकला

By समीर देशपांडे | Updated: August 13, 2022 17:00 IST

गेली चार वर्षे न फडकणारा राष्ट्रध्वज अखेर फडकला

समीर देशपांडे

कोल्हापूर : गेली चार वर्षे न फडकणारा कोल्हापूर पोलीस उद्यानातील देशातील दुसऱ्या क्रमांकाचा आणि महाराष्ट्रातील सर्वाधिक ३०३ फूट उंचीचा राष्ट्रध्वज आज, शनिवारी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये आसमंतात फडकला. जिल्ह्याच्या विकासासाठी हातात हात घालून काम करू या, असे आवाहन यावेळी मंत्री पाटील यांनी केले. ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी मीनाताई गुरव, स्वातंत्र्यसैनिक वसंतराव माने यांच्या प्रमुख उपस्थितीत पोलीस विभागाने यावेळी राष्ट्रध्वजाला सलामी दिली.यावेळी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, खासदार धनंजय महाडिक, आमदार प्रकाश आवाडे, आमदार पी. एन. पाटील, आमदार राजेश पाटील, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. मनोजकुमार लोहिया, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, अंजली पाटील, समरजितसिंह घाटगे, राहुल चिकोडे उपस्थित होते. यावेळी राष्ट्रध्वज उभारण्यासाठी मेहनत घेतलेले तंत्रज्ञ, अधिकारी, कर्मचाऱ्यांचा पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.मंत्री पाटील म्हणाले की, नरेंद्र मोदी एक संकल्पना मांडतात आणि नागरिक ती उचलून धरतात अशी अनेक उदाहरणे आहेत. हा राष्ट्रध्वज फडकावा यासाठी जिल्हाधिकारी राहुल रेखावार, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभाग व टीमने मेहनत घेतली.जिल्हा पोलीस प्रमुख शैलेश बलकवडे यांनी प्रास्ताविक केले. पोलीस उपअधीक्षक प्रिया पाटील यांनी आभार मानले. सूत्रसंचालन चारुदत्त जोशी यांनी केले. कार्यक्रमाला एनसीसीचे कॅडेट्स, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.ध्वज कायम फडकावा यासाठी नियोजनमंत्री पाटील म्हणाले की, केएसबीपीचे सुजय पित्रे यांनी हा झेंडा उभारण्यासाठी मेहनत घेतली. परंतु मोठ्या वाऱ्यामुळे तो सातत्याने फाटत असे. त्यामुळे आणि कोविडकाळात हा झेंडा फडकला नाही. परंतु आता तो कायमस्वरूपी फडकत राहील अशी व्यवस्था आम्ही करत आहोत. यासाठी परदेशातून साडे चार लाख रुपयांचा एक असे वेगळ्या मटेरियलचे दोन ध्वज मागवण्यात येणार आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरIndependence Dayस्वातंत्र्य दिन