शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

बिद्री कारखाना निवडणूक: निकालावर विरोधी आघाडीचे नेते प्रकाश आबिटकरांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले.. 

By विश्वास पाटील | Updated: December 5, 2023 18:04 IST

कोल्हापूर : बिद्री येथील श्री दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत आतापर्यंत हाती आलेल्या निकालात सत्ताधारी पॅनेलची आघाडी कायम ...

कोल्हापूर: बिद्री येथील श्री दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत आतापर्यंत हाती आलेल्या निकालात सत्ताधारी पॅनेलची आघाडी कायम आहे. निकालाच्या सुरुवातीपासूनच विरोधी आघाडीची मोठी पिछेहाट दिसून आली. निकालाचा कौल हाती येताच कारखान्याचे अध्यक्ष, आमदार के.पी.पाटील गटाच्या समर्थकांनी जल्लोष करायला सुरुवात केली. या निकालावर विरोधी आघाडीचे नेते आमदार प्रकाश आबिटकरांनी प्रतिक्रिया देताना सत्ताधाऱ्यांनी कारखान्याचा कारभार उत्तम करून दाखवावा. त्यास आमचे सर्व पातळीवर सहकार्य राहील असे सांगितले.कारखान्याच्या निवडणुकीत आम्ही सभासदांच्या हिताचा कारभार करून दाखवू म्हणून लोकांसमोर गेलो परंतू त्यांनी पुन्हा सत्तारुढ आघाडीलाच कौल दिला. हा कौल आम्ही नम्रपणे स्विकारतो व विजयी झालेल्या सर्वांचे अभिनंदन करतो. त्यांनी कारखान्याचा कारभार उत्तम करून दाखवावा.. त्यास आमचे सर्व पातळीवर सहकार्य राहील असे ते म्हणाले.आबिटकरांच्या जिव्हारी लागणारा पराभवगेल्या निवडणूकीत आमदार आबिटकर हे दिनकरराव जाधव व खासदार संजय मंडलिक यांना सोबत घेवून लढले आणि चांगली लढत दिली. यावेळेला मातब्बर नेते व गट त्यांच्यासोबत असतानाही त्यांना अपेक्षित यश न मिळाल्याने हा पराभव त्यांच्या जिव्हारी लागला. विधानसभेला जेवढे पायाला भिंगरी बांधून ते पळतात, त्याहून जास्त ताकद पणाला लावूनही सत्तांतर घडवून आणण्यात त्यांना अपयश आले. यामागील कारणांचा त्यांना शोध घ्यावा लागेल.मुस्कान लॉन येथे आज सकाळी आठ वाजता मतमोजणी सुरू झाली. १२० टेबलवरती ही मतमोजणी सुरू आहे. सुरवातीला केंद्रवाईज ५०-५० मतांचे  पॅनल टू पॅनेल झालेले मतदान अशी विभागणी करण्यात आली. मतमोजणीच्या सुरुवातीपासून सत्ताधारी पॅनेलच्या उमेदवारांनी घेतलेली आघाडी कायम आहे. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSugar factoryसाखर कारखानेElectionनिवडणूकPrakash abitkarप्रकाश आबिटकर