शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरात 'द रॉयल हॉर्स शो'; घोडेस्वारांनी दाखवली शो जंप टॉप स्कोर, पोल बेंडिंगमधील कौशल्य, करवीरकरांची दाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2023 12:42 IST

कोल्हापूर इक्वेस्टिरयन असोसिएशनतर्फे पोलो मैदानावर द राॅयल हाॅर्स शो

कोल्हापूर : पोल बेंडिंग, इक्वेशन, शो जंप टाॅप स्कोर अशा घोडेस्वारीच्या कौशल्यपूर्ण प्रकारात घोडेस्वारांनी उत्कृष्ट प्रदर्शन करीत उपस्थितीत करवीरकरांची टाळ्याच्या गजरात दाद मिळवली. निमित्त होते कोल्हापूर इक्वेस्टिरयन असोसिएशनतर्फे पोलो मैदानावर शुक्रवारपासून आयोजित केलेल्या द राॅयल हाॅर्स शो चे. या अश्व शोचे शाहू महाराज यांच्या हस्ते शानदार उद्घाटन झाले.या प्रसंगी याज्ञसेनीराजे, मालोजीराजे, संयोगिताराजे, मधुरिमाराजे, यशस्विनीराजे, यशराजराजे यांच्यासह महापालिका प्रशासक डाॅ. कादंबरी बलकवडे, जिल्हा पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.या शोची सुरुवात उद्घाटनापूर्वीच सकाळी साडेआठ वाजता झाली. यामध्ये खुल्या गटातील घोडेस्वारांनी प्रथम शो जंप टाॅप स्कोर प्रकारातील कौशल्य दाखवले. त्यानंतर चौदा वर्षाखालील घोडेस्वारांनीही याच प्रकारात कौशल्य दाखवित उपस्थितांची वाहवा मिळवली. चौदा वर्षाखालील घोडेस्वारांनी पोल बेंडिंगमधील कौशल्य दाखविले. दुपारच्या सत्रात या शोचे उद्घाटन झाले. त्यानंतर श्री शिवाजी प्रिपरेटरी मिलिटरी स्कूल, जापलुप इक्वेस्टिरयन सेंटर, द ग्रीनफिंगर्ज स्कूल (अकलूज), आर्यनस वर्ल्ड स्कूल, संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल, नरकेज पन्हाळा पब्लिक स्कूल, वरदा रायडिंग क्लब, दक्षिण व्हॅली इक्वेस्टिरयन सेंटरच्या घोडेस्वारांनीही कसब दाखवित टाळ्यांची दाद मिळवली. यावेळी वीरेंद्र घाटगे, अच्युत करांडे, एबल फिलीप, जैद मुजावर, श्रेया घाटगे, कृतिका कारंडे उपस्थित होते. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूर