शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

kolhapur- मुरगूडमधील अश्लील चित्रफीत प्रकरणात पोलिसांची बघ्याची भूमिका, अनेक कुटुंबे तणावाखाली

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2023 12:59 IST

एका बोगस डॉक्टराच्या कृत्यामुळे गावाची नाहक बदनामी

कोल्हापूर : मुरगूड (ता. कागल) येथील अश्लील चित्रफितीच्या प्रकरणात पोलिसांची बघ्याची भूमिका गावच्या बदनामीला हातभार लावणारी ठरत आहे. गावाने मोर्चा काढून चौकशीची मागणी केली तरी पोलिस कुणीतरी तक्रार केल्याशिवाय चौकशी करणार नाही, असे म्हणत असून, याचेच ग्रामस्थांना आश्चर्य वाटत आहे. हे प्रकरण एका घातपाताच्या प्रकरणाशी निगडित असल्याची चर्चा गावांत जोर धरू लागली आहे.अश्लील चित्रफितीचे प्रकरण डिसेंबरपासून गावात दबक्या आवाजात चर्चेत आहे; परंतु ती नुसतीच चर्चा होती. त्याबद्दल ठोस माहिती कुणाकडेच नव्हती; परंतु गेल्या आठवड्यात या चित्रफितीचे पेनड्राइव्ह व असहाय महिलांची तक्रार असल्याचे दाखवून निनावी पत्रे ग्रामस्थांना पाठविण्यात आली. त्यामुळे गावांत खळबळ उडाली. या चित्रफिती नेमक्या किती आहेत, हे कुणालाच माहिती नाही; परंतु पंधरा-सोळा व्हिडीओ व किमान साठहून जास्त अश्लील फोटो त्यामध्ये असल्याचे समजते.

चित्रफित केलेल्या काही रुग्ण, काही अशाच जोडलेल्या व काही व्यक्तिगत संबंधित असल्याची चर्चा आहे. त्याने त्यांचा गैरफायदा घेऊन या चित्रफिती तयार केल्या. त्यातील काही लॉजमध्येही केल्याची माहिती आहे. त्या गावातीलच एका तरुणाच्या लॅपटॉपमध्ये ठेवल्याचे समजते. परंतु त्या व्हायरल झाल्यावर चित्रफितीचा गवगवा झाला. त्यात दोन दिवसांपूर्वी त्या चित्रफितीचे स्क्रीनशॉट काढून त्याचे ब्लॅक अँड व्हाईट फोटो काढून त्याचा गठ्ठाच बसस्थानकाजवळ कुणीतरी टाकून दिला. त्यातून गावात पुन्हा खळबळ उडाली. एवढे सगळे होऊनही पोलिस त्या प्रकरणाकडे पाहायला तयार नाहीत. पोलिसांनी या चित्रफिती कुणी व्हायरल केल्या किंवा निनावी पत्रे कुणी पाठवली..? त्यांचा त्यामागे काय उद्देश आहे, याचा शोध घेण्याची गरज आहे. एका बोगस डॉक्टराच्या कृत्यामुळे गावाची नाहक बदनामी होत असून, रोज एका नव्या चर्चेला तोंड फुटत आहे. अनेक कुटुंबे त्यामुळे वेगळ्याच तणावाखाली आहेत.

मातब्बरांचे गाव..मुरगूडमध्ये एकाहून एक मातब्बर राजकीय नेते आहेत. परंतु गावाच्या बदनामीशी संबंधित या प्रकरणात कोणीच दखल घ्यायला तयार नाही.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर