शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर हद्दवाढ: कृती समितीची भूमिका अडथळा ठरणारी, राजकीय इच्छाशक्तीशिवाय प्रश्न सुटणे अशक्य

By विश्वास पाटील | Updated: September 13, 2022 14:45 IST

हद्दवाढीस विरोध करतात म्हणून केएमटी बंद करणे किंवा ग्रामीण जनतेने भाजीपाला, दूध बंद करण्याची धमकी देणे या दोन्ही गोष्टी अत्यंत चुकीच्या आहेत. त्यातून प्रश्न सुटणार तर नाहीच परंतु कटूता मात्र वाढेल असेच चित्र सध्या दिसत आहे.

विश्वास पाटीलकोल्हापूर : हद्दवाढ व्हायलाच हवी, त्यासाठी पाठपुरावा करण्यात, आंदोलन करण्यात काहीच गैर नाही परंतु आंदोलने करताना त्यातून मूळ प्रश्न अधिक जटिल होणार नाही याचे भान बाळगण्याची गरज आहे. सध्या हद्दवाढप्रश्नी कृती समितीची भूमिका हद्दवाढीच्या निर्णयात अडथळा ठरणारी आहे. हद्दवाढीस विरोध करतात म्हणून केएमटी बंद करणे किंवा ग्रामीण जनतेने भाजीपाला, दूध बंद करण्याची धमकी देणे या दोन्ही गोष्टी अत्यंत चुकीच्या आहेत. त्यातून प्रश्न सुटणार तर नाहीच परंतु कटूता मात्र वाढेल असेच चित्र सध्या दिसत आहे.कोल्हापूरच्या हद्दवाढीचा प्रश्न नगरपालिकेची महापालिका झाल्यापासून लोंबकळत पडला आहे. ठोस राजकीय इच्छाशक्ती नाही हेच त्याचे मुख्य कारण आहे. जोपर्यंत राजकीय नेतृत्वाला हद्दवाढ व्हावी असे वाटत नाही तोपर्यंत हद्दवाढ होण्याची शक्यता नाही. हद्दवाढीमध्ये समावेश होणाऱ्या मुख्यत: कोल्हापूर दक्षिणमधील गावांना शहरात यायचे नाही. त्यामुळे सध्याचे नेते उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील असोत की यापूर्वीचे नेते माजी पालकमंत्री सतेज पाटील असोत यांनी हद्दवाढीबाबत ठोस भूमिका घेतलेली नाही. तिन्ही खासदारांच्या अजेंड्यावर हद्दवाढ हा विषयच नाही. हे सर्व नेते त्यांच्याकडे क्षमता असूनही ग्रामीण जनतेचे हद्दवाढीसाठी कृती समितीने एकमत करावे असे सांगत आहेत. जे कधीच घडणारे नाही. हा सारा प्रकार मतांच्या राजकारणासाठी एकमेकांकडे बोट दाखवण्याचा आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नगरविकास मंत्री असताना जानेवारी २०२१ मध्ये १८ गावे व दोन औद्योगिक वसाहतींसह हद्दवाढीचा सुधारित प्रस्ताव पाठवण्यात आला. त्या प्रस्तावाचे पुढे काय झाले हे शासनालाच माहीत नाही. सध्या त्यावेळचे नगरविकास मंत्री हेच मुख्यमंत्री आहेत; परंतु त्यांचे आसनच मुळात स्थिर नाही. मंत्रिमंडळाचा विस्तार रखडला आहे. पालकमंत्री नियुक्त झालेले नाहीत. सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीमध्ये काय होते अशीही संदिग्धता आहे. राज्य सरकार व राजकीय नेतृत्व कोणतीच भूमिका घेत नसताना कोल्हापुरात मात्र कोल्हापूरचीच माणसे एकमेकांशी भांडत बसल्याचे चित्र आहे.जेव्हा केव्हा हद्दवाढ होईल तेव्हा याच ग्रामीण जनतेला सोबत घेऊनच ती होणार आहे असे असताना आताच त्यांच्याशी किरकोळ बाबींवरून वैर निर्माण करण्यात पुरुषार्थ नाही. नुकसानीत आहे म्हणून त्या गावांतील केएमटी बंद करण्याचा निर्णय चुकीचा आहे. केएमटी ही सार्वजनिक वाहतूक सेवा आहे. एकदा केएमटी सुरू झाल्यावर एसटी बंद होते आणि आता तुम्ही केएमटीही बंद केल्यावर गावांतील गोरगरीब जनतेचे मोठे हाल होतात हे लक्षात घेण्याची गरज आहे. ती बंद करायची होती तर यापूर्वीच करायला हवी होती.

  • कोल्हापूर सर्किट बेंचच्या मागणीसाठी वकिलांचा किती वर्षे लढा सुरू आहे. उच्च न्यायालयाचे तत्कालीन न्यायमूर्ती कोल्हापूरच्या सर्किट बेंचबाबत सकारात्मक होते. निवृत्तीदिवशी ते काहीतरी निर्णय घेतील असे बार असोसिएशनला वाटले.
  • सगळ्यांचे डोळे मुंबईकडे लागले होते परंतु सायंकाळी निरोप आला की काहीच घडलेले नाही म्हणून. त्या रागातून कोल्हापूर स्टाईलने तिरडी मोर्चा काढण्यात आला. त्यातून चुकीचा मेसेज गेला व त्याचा फटका या मागणीला बसला, हा अनुभव कोल्हापूरला आला आहे. त्यामुळे हद्दवाढीसाठी आंदोलन करतानाही प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न असावा, तो बिघडवण्याचा नको.
  • कोल्हापूर महापालिकेच्या कारभाराबद्दल ग्रामीण जनतेच्या मनात कमालीचे नकारात्मक चित्र तयार झाले आहे. ते अगोदर दुरुस्त करण्याची गरज आहे. शहरात आलो म्हणजे सगळेच चुकीचे घडेल हा हटवादही चुकीचाच आहे. आताही कोणतेही नियोजन नसताना शहराशेजारच्या गावांचा अनियंत्रित विकास होत आहे त्यालाही वळण लागेल याचाही विचार होण्याची गरज आहे.
टॅग्स :kolhapurकोल्हापूर