शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

Kolhapur: चांदीची चकाकी गगनाला; हुपरीतील व्यवसाय थंडावला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2024 12:44 IST

चांदीची प्रतिकिलो लाखाच्या दिशेने वाटचाल

तानाजी घोरपडेहुपरी : नेहमीच ५०-५५ हजारांच्या आसपास खेळत असणाऱ्या चांदीच्या दरामध्ये तब्बल ३८ हजारांची घसघशीत वाढ झाल्याने चांदीचा दर प्रतिकिलो लाखाच्या दिशेने वाटचाल करीत आहॆ. न भूतो न भविष्यती अशा प्रकारची चांदीदरात झालेली वाढ व्यावसायिकांची डोकेदुखी बनली असून, गेल्या काही महिन्यांपासून येथील चांदी उद्योगात मोठ्या प्रमाणात मंदी पसरली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील विविध प्रकारच्या घडामोडींमुळे चांदीदरात सातत्याने होत असलेल्या बेभरवशाच्या चढ-उतारामुळे चांदी खरेदी-विक्रीचे व्यवहार कसे करायचे? अशा समस्येने व्यावसायिकांना ग्रासले आहे.

चांदी खरेदी-विक्री करणाऱ्या (बुलियन) दुकानदारांनी सावध पवित्रा घेत परिस्थितीनुसार व्यवहार करण्यास सुरुवात केली आहे. कोरोनाकाळात चांदीच्या दरात घसरण झाल्याने मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका सहन करावा लागला होता. त्यानंतरच्या काळात देशातील सर्वच बाजारपेठांतील सराफ व्यवसाय पुन्हा जोमाने सुरू झाल्याने येथील व्यवसायाला काही प्रमाणात अच्छे दिन प्राप्त झाल्याचे पाहावयास मिळत होते. मात्र, गेल्या काही दिवसांमध्ये चांदी दरात झालेली ३८ हजारांची वाढ सर्वच चांदी व्यावसायिकांची डोकेदुखी बनली आहे.

हुपरी परिसरातील अर्थचक्र थांबलेहुपरी परिसरातील आठ-दहा गावांचा चांदीचे दागिने बनविणे हाच प्रमुख व्यवसाय असून, सध्या या व्यवसायात मोठ्या प्रमाणात मंदी आल्याने परिसरातील सर्व प्रकारचे अर्थचक्र थांबले आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जागोजागी उभारलेल्या तपासणी नाक्यांचीही भीती असल्याने व्यावसायिक व सराफांनी दागिन्यांची खरेदी-विक्रीच थांबविली होती. त्यामुळे पुढचे काही दिवस येथील चांदी व्यवसायात मंदीचेच वातावरण राहण्याची शक्यता आहे. परिणामी, चांदी उद्योगातील इतर पूरक व्यावसायिकांनाही त्याचा फटका बसणार आहे.

सध्या चांदी उद्योगाची अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहॆ. दरातील अस्थिरतेमुळे हा व्यवसाय मंदावलेला आहे. आचारसंहिता कालावधीत दागिने बनविण्यासाठी बाहेरून येणारे सोने, चांदी बंद झाल्याने देवीघेवीचे व्यवहारही ठप्प झाले आहेत. सातत्याने होत असलेल्या दरातील चढ-उतारामुळे खरेदी-विक्री पूर्णपणे बंद झाली आहे. तसेच तयार मालाला मागणीच नसल्याने उत्पादित तयार माल तसाच पडून आहे. सध्या परिस्थिती बिकट झाली आहे. - संजय माने, संचालक, कोल्हापूर जिल्हा सराफ संघ, हुपरी

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSilverचांदीbusinessव्यवसाय