शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

पुन्हा सुरु होणार फुटबॉलचा थरार, महापौर चषकचे सामने शुक्रवारपासून; मात्र..

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2022 13:14 IST

सामन्याचे युट्यूबवर थेट प्रसारण होणार

कोल्हापूर : कोरोना संसर्गामुळे तब्बल दोन वर्षे स्थगित केलेले महापौर चषक फुटबॉल स्पर्धेतील उर्वरित दोन सामने शुक्रवार ते रविवार अशा तीन दिवसात खेळविण्यात येणार आहेत. जरी दोन वर्षानंतर शाहू स्टेडियमवर सामने होत असले तरी सामान्य फुटबॉल शैाकिनांना मात्र मैदानावर प्रवेश असणार नाही. कोल्हापूरच्या फुटबॉल इतिहातील हाही पहिलाच प्रसंग असेल.कोल्हापूर महानगरपालिका प्रशासनाने मार्च २०२० मध्ये शाहू स्टेडियमवर महापौर चषक फुटबॉल स्पर्धेचे आयोजन केले होते. परंतु कोरोना संसर्ग सुरु झाल्यामुळे कोल्हापूर स्पोर्टस् असोसिएशनने स्पर्धेतील एक उपांत्य व अंतिम सामना स्थगित ठेवण्यास भाग पाडले. गेल्या दोन वर्षापासून सामने कधी होणार याची उत्सुकता लागून राहिली होती.कोरोना संसर्ग कमी झाल्यामुळे कोल्हापूर स्पोर्टस् असोसिएशन व जिल्हा प्रशासन यांनी घालून दिलेल्या नियमात शुक्रवार, शनिवार व रविवार असे तीन दिवस सामने घेतले जाणार आहेत. सामने पाहण्यास फुटबॉल शौकिनांना मैदानावर प्रवेश दिला जाणार नाही. सामन्याचे युट्यूबवर थेट प्रसारण होणार आहे. महापालिकेत बैठक सामन्यांच्या आयोजनासंदर्भात प्रशासक कादंबरी बलकवडे यांच्या उपस्थितीत मंगळवारी बैठक झाली. यावेळी अतिरीक्त आयुक्त नितीन देसाई, उपायुक्त रविकांत आडसुळ, सचिन जाधव, सचिन पांडवयांच्यासहनिलोफर आजरेकर, संजय मोहिते, सचिन पाटील आदी माजी पदाधिकारी उपस्थित होते.असे होतील सामने -शुक्रवारी - दिलबहार तालीम विरुध्द फुलेवाडी क्रीडा मंडळ (उपांत्य सामना)शनिवारी - जनप्रतिनिधी विरुध्द प्रशासकिय अधिकारी-कर्मचारीरविवारी दुपारी ३.३० वाजता - प्रॅक्टीस क्लव विरुध्द शुक्रवारच्या सामन्यातील विजेता (अंतिम सामना)अशी असतील बक्षिसे-विजेत्या संघास - एक लाख ५० हजार रुपये व चषकउपविजेत्या संघास- ७५ हजार रुपये व चषकतृतिय क्रमांक - ३५ हजार रुपयेचतुर्थ क्रमांक - २० हजार रुपयेयाशिवाय अन्य बक्षिसे

टॅग्स :kolhapurकोल्हापूरFootballफुटबॉल