शहरं
Join us  
Trending Stories
1
काश्मिरात अतिरेकी हल्ला, २८ ठार; 'टार्गेट किलिंग'मध्ये महाराष्ट्रातील पर्यटकांचाही समावेश
2
रुपचंदानी कुटुंबीय पहलगाममध्ये सुखरूप; काळजीनं नातेवाईकांचा जीव लागला होता टांगणीला
3
'यूपीएससी'त पुण्याचा अर्चित डोंगरे तिसरा; राज्यातील ९५ विद्यार्थ्यांनी घातली यशाला गवसणी
4
पोप फ्रान्सिस यांच्या निधनामुळे कर्मयोगी जवाहरलाल दर्डा यांच्या पुतळ्याचे अनावरण स्थगित
5
KL राहुलचं एकदम कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
6
मत्स्य व्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा, मंत्रिमंडळाचा निर्णय; मच्छीमारांना ६ हजाराचा लाभ मिळणार
7
भिसेंवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांची होणार चौकशी; महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचा निर्णय
8
एक मंदिर, एक विहीर, एक स्मशान...डॉ. भागवतांच्या संप्रदायाला ही एकता समजली तरी खूप बरे होईल
9
गुलफिशा फातिमाने तुरुंगात खितपत का पडावे?; २ वर्ष उलटली तरी जामीन नाही  
10
महानगरांमध्ये अघोषित पाणीबाणी लागू; तहान भागत नाही?, निमूट पैसे मोजा, टँकर मागवा!
11
अवघ्या ७७ चौरस फुटाच्या घरात राहते युवती; इवल्याशा खोलीनं संपवला जीवनातील संघर्ष
12
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
13
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
14
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
15
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
16
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
17
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
18
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
19
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
20
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल

आताचे राज्यकर्ते म्हणतात लुटा, पण आमचा वाटा टाका; राजू शेट्टींचे टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2023 12:24 IST

कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराज त्याकाळी रयतेच्या बांधावरील गवताच्या काडीलाही धक्का लागू नये, याची काळजी घेत असत. मात्र आता ...

कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराज त्याकाळी रयतेच्या बांधावरील गवताच्या काडीलाही धक्का लागू नये, याची काळजी घेत असत. मात्र आता महाराज यांचे नाव घेऊन कारभार करणारे राज्यकर्ते जनतेला लुटा; पण आमचा वाटा टाका असे म्हणत आहेत, अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचेे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी रविवारी केली.येथील मंगळवार पेठेतील लेटेस्ट तरुण मंडळाच्या मराठा साम्राज्याच्या आरमार प्रमुखांच्या कार्य आणि शौर्यावर प्रकाशझोत टाकणाऱ्या ‘सरखेल कान्होजी आंग्रे दर्यासागर’ या सजीव देखाव्याच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. शाहू छत्रपती, राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष उद्योजक व्ही. बी. पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

माजी खासदार शेट्टी म्हणाले, लेटेस्ट तरुण मंडळ डॉल्बीशिवाय गणेशोत्सव साजरा करते. मंडळाकडून विविध सामाजिक उपक्रम साजरे केले जातात. या मंडळाचा आदर्श इतर मंडळांनीही घेतला पाहिजे. मंडळात देखाव्याच्या माध्यमातून कल्पकता आणि कलेला वाव दिला जातो, हे कौतुकास्पद आहे.शाहू छत्रपती म्हणाले, लेटेस्ट तरुण मंडळ डॉल्बी न लावता गणेशोत्सव साजरा करते. विविध सामाजिक कामातही आघाडीवर आहे. उद्योजक पाटील म्हणाले, लेटेस्ट तरुण मंडळ सामाजिक भान ठेवून सातत्याने सामाजिक कार्यात आघाडीवर असते.मंडळाचे अध्यक्ष यादव यांनी मंडळाच्या विविध उपक्रमांचा आढावा घेतला. यावेळी उद्योजक नितीन दलवाई, कविता पोवार, सरदार पाटील यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार झाला. कार्यक्रमास उत्सव प्रमुख केदार सूर्यवंशी, अनिल ढवण, अजित पोवार आदी उपस्थित होते.

पुढील वर्षी शेट्टी, व्ही.बी. यांनी खासदार होऊन यावेराजू शेट्टी आणि व्ही.बी. पाटील यांनी पुढील वर्षी आमच्या मंडळाच्या कार्यक्रमास खासदार होऊन यावे, अशी अपेक्षा मंडळाचे अध्यक्ष गजानन यादव यांनी व्यक्त केली. याला उपस्थित श्रोते, प्रेक्षकांनी दाद दिली.

शेट्टी यांच्यामुळे उसाला चांगला दरशेतकरी नेते राजू शेट्टी यांच्यामुळे उसाला चांगला दर मिळतो, असे कौतुक शाहू छत्रपती यांनी केले. व्ही. बी. पाटील आता चांगलेच सक्रिय झाले आहेत. शेट्टी आणि व्ही. बी. चांगले काम करीत आहेत. पुढील काळातही दोघांकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे, अशी इच्छाही त्यांनी व्यक्त केली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरRaju Shettyराजू शेट्टी