शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर जिल्ह्याची लोकसंख्या ४२ लाख, पोलिस अवघे २७००; कामाचा प्रचंड ताण 

By उद्धव गोडसे | Updated: December 18, 2023 13:21 IST

उद्धव गोडसे कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्याची लोकसंख्या सुमारे ४२ लाख एवढी आहे. जिल्ह्यातील कायदा-सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी अवघ्या २७०० पोलिसांकडे ...

उद्धव गोडसेकोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्याची लोकसंख्या सुमारे ४२ लाख एवढी आहे. जिल्ह्यातील कायदा-सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी अवघ्या २७०० पोलिसांकडे आहे. वाढती गुन्हेगारी, मोर्चे, आंदोलने, अतिविशेष व्यक्तींचे दौरे आणि सततचे बंदोबस्त यामुळे पोलिसांवरील कामाचा ताण कमालीचा वाढला आहे. परिणामी, त्यांचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य धोक्यात आले आहे. गेल्या आठवड्यात दोन अधिकाऱ्यांना आलेले हृदयविकाराचे झटके हा त्याचाच परिणाम असल्याचे दिसत आहे.

पोलिसांचे काम आता पूर्वीसारखे निवांतपणाचे राहिले नाही. दहा ते बारा तासांची ड्युटी, पोलिस ठाण्यातील कामांचा वाढता ताण, प्रलंबित गुन्ह्यांचा निपटारा करणे, कोर्टातील वाऱ्या, वरिष्ठ अधिकाऱ्यांचा दबाव आणि नागरिकांच्या वाढत्या अपेक्षा यामुळे पोलिसांची मानसिक आणि शारीरिक कुचंबणा होत आहे. याचे परिणाम पोलिसांच्या आरोग्यावर होताना दिसत आहेत.गेल्या काही महिन्यांपासून कोल्हापूर जिल्ह्यात याची तीव्रता वाढली आहे. प्रलंबित गुन्ह्यांची निर्गत करण्याचे आदेश पोलिस अधीक्षकांनी दिले आहेत. यातच विविध प्रकारची आंदोलने, सण-समारंभ, मंत्र्यांचे दौरे, सोशल मीडियातील आक्षेपार्ह मेसेजमुळे उद्भवणारे धार्मिक तणावाचे प्रसंग पोलिसांच्या कामात भर घालत आहेत. ऐनवेळी लागणाऱ्या कामांमुळे हातचे काम सोडून पोलिसांना पळावे लागले. परिणामी, मूळ कामे रखडत असल्याने वरिष्ठांची बोलणी खावी लागतात. वरिष्ठांना योग्य उत्तर दिले नाही तर कारवाईची टांगती तलवार असते, त्यामुळे पोलिस दलात अस्वस्थता आहे.

निलंबनाची भीतीपोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी कार्यभार स्वीकारल्यापासून पोलिस दलातील कामचुकार कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. त्रुटी आढळल्यास संबंधित कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली जात आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्याही चौकशा लावल्या आहेत. स्थानिक गुन्हे अन्वेषण, आर्थिक गुन्हे अन्वेषण अशा महत्त्वाच्या शाखांमधील कर्मचाऱ्यांवर कारवाया केल्या आहेत. यामुळे वरिष्ठांच्या तावडीत सापडल्यास निलंबनाची कारवाई होऊ शकते, अशी भीती कर्मचाऱ्यांच्या मनात आहे.

तणावाचे व्यवस्थापन आवश्यकमानसिक ताणतणावांचा परिणाम आरोग्यावर होऊ नये, यासाठी तणावाचे व्यवस्थापन करता येणे गरजेचे आहे. कोणत्या कामांमुळे तणाव निर्माण होऊ शकतो किंवा वाढू शकतो याचा अंदाज घेऊन ती कामे प्राधान्याने आणि चोख पद्धतीने केली जावीत. वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संवाद आणि समन्वय ठेवून काम केल्यास तणाव कमी होतो, असा सल्ला मानसोपचार तज्ज्ञ कालिदास पाटील यांनी दिला.

बंदोबस्त वाढलेसण-समारंभ, मंत्र्यांचे दौरे, जातीय दंगली, ऊस दर आंदोलन, आरक्षण मागणीची आंदोलने यामुळे पोलिसांना बंदोबस्त तैनात करावा लागतो. त्यात बरेच मनुष्यबळ अडकून पडते. काहीवेळा बाहेरच्या जिल्ह्यातही बंदोबस्तासाठी जावे लागते. याच पोलिसांना त्यांच्याकडील अन्य कामांचाही निपटारा करावा लागतो मात्र, त्यासाठी पुरेसा वेळ मिळत नाही. यातच वरिष्ठांकडून दबाव वाढत राहतो, त्यामुळे पोलिसांची मानसिकता बिघडते.

असा करा ताण हलका

  • नियमित व्यायाम आणि आहाराकडे लक्ष द्या
  • वरिष्ठांचे आदेश आणि प्राधान्य क्रमानुसार कामांचे नियोजन करा
  • कामात चुका राहू नयेत, याची खबरदारी घ्यावी
  • अशक्य किंवा वेळ लागणाऱ्या कामांबद्दल स्पष्ट बोलावे
  • वरिष्ठ आणि सहकाऱ्यांसोबत संवाद असावा
  • कुटुंबातील वातावरण आनंदी ठेवावे
टॅग्स :kolhapurकोल्हापूरPoliceपोलिस