शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांच्या प्रोत्साहनपर अनुदानप्रश्नी 'स्वाभिमानी' आक्रमक; राजू शेट्टींचा मुख्यमंत्र्यांना इशारा, म्हणाले..

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2023 12:19 IST

शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान तातडीने द्या

जयसिंगपूर : ऊसदर नियंत्रण समितीच्या स्थापनेसह शेतकऱ्यांच्या प्रोत्साहनपर अनुदानप्रश्नी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. याबाबत राज्य सरकारने तातडीने निर्णय घेतला नाही तर कोल्हापूर जिल्ह्यातील हजारो शेतकरी जनता दरबारातच मुख्यमंत्र्यांना जाब विचारतील, असा इशारा माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला. याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांची भेट घेऊन देण्यात आले.यावेळी शेट्टी म्हणाले, राज्य सरकारने ऊसदर नियंत्रण समिती न नेमल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसलेला आहे. राज्य सरकारला आम्ही गेल्या वर्षभरापासून यासंदर्भात वेळोवेळी ऊसदर नियंत्रण समितीची स्थापना करण्यासाठी मागणी केलेली आहे.

ऊसदर समिती स्थापन न झाल्यामुळे राज्यातील बहुसंख्य साखर कारखान्यांनी अद्याप उसाचा दुसरा हप्ता शेतकऱ्यांना दिलेला नाही. शेतकऱ्यांचे हजारो कोटी रुपये साखर कारखानदार बिनव्याजी वापरत आहेत. तसेच राज्य सरकारने गेल्या १४ महिन्यांपासून शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रोत्साहनपर अनुदानाची रक्कम अद्यापही दिलेली नाही.याबाबत मुख्यमंत्र्यांकडे वेळोवेळी मागणी केली आहे. तातडीने प्रामाणिक कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान देणेबाबत आदेश व्हावेत, हीदेखील आमची आग्रही मागणी असल्याचे शेट्टी यांनी यावेळी सांगितले. याप्रसंगी स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष प्रा. जालंधर पाटील, जनार्दन पाटील, सागर संभूशेटे उपस्थित होते.

आमच्या मागण्या तातडीने पूर्ण न झाल्यास ११ जून रोजी मुख्यमंत्र्यांच्या जनता दरबारात हजारो शेतकऱ्यांच्या साक्षीने शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी आम्ही जाब विचारू. शेतकऱ्यांसाठी सरकारने काय केले आहे. याबाबत शासनाने तातडीने खुलासा करावा. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याअगोदर प्रश्न मिटला नाहीतर स्वाभिमानी स्टाइलने आंदोलन करू. - राजू शेट्टी, माजी खासदार

टॅग्स :kolhapurकोल्हापूरRaju Shettyराजू शेट्टीEknath Shindeएकनाथ शिंदे