शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

चंद्रयान-३ मोहिमेत मराठी शास्त्रज्ञाचा डंका, सीमाभागातील केरबा लोहार यांच्यावर कौतुकाचा वर्षाव

By संदीप आडनाईक | Updated: July 15, 2023 11:52 IST

घरची परिस्थिती हलाखीची; जिद्द, चिकाटी अन् मेहनतीमुळे इस्रोत, केरबा लोहार यांच्यावर कौतुकाचा वर्षाव

संदीप आडनाईककोल्हापूर : घरची हलाखीची परिस्थिती असतानाही जिद्द, चिकाटी आणि मेहनतीमुळे भारतीय अवकाश संशोधन संस्थेमध्ये (इस्रो) वरिष्ठ शास्त्रज्ञ पदावर असणाऱ्या आडी (ता. निपाणी) या सीमाभागातील गावचे केरबा आनंदराव लोहार या मराठी तरुणाचा चंद्रयान-३ मोहिमेला हातभार लागला आहे. त्यांच्यावर सीमाभागासोबत संपूर्ण देशातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.सीमाभागातील आडी हे केरबा लोहार यांचे मूळ गाव. त्यांचे प्राथमिक शिक्षण आडी येथील सरकारी शाळेत आणि माध्यमिक शिक्षण सौंदलगा येथे झाले. बेळगावच्या शासकीय पॉलिटेक्निकमध्ये त्यांनी मेकॅनिकल डिप्लोमा पूर्ण केला. याचवेळी इस्रोच्या मुख्य कार्यालयातील तांत्रिक सल्लागार या पदासाठी त्यांनी परीक्षा दिली. त्यात उत्तीर्ण झाल्यानंतर ते १९९४ पासून या पदावर रुजू झाले.परंतु अवकाश संशोधनाची आवड निर्माण झालेल्या केरबा यांनी बंगळुरू येथील बीएमएस अभियांत्रिकी महाविद्यालयातून बीई आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समधून एमईचे शिक्षण पूर्ण केले. नोकरीत असूनही शिक्षणाची तसेच कामावरची श्रद्धा आणि मेहनत पाहून त्यांना वरिष्ठ शास्त्रज्ञ म्हणून पदोन्नती मिळत गेली. यापूर्वी २०१९ मध्ये चंद्रयान-२ या मोहिमेतही त्यांच्या कामाची प्रशंसा झाली. तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे प्रत्यक्ष अभिनंदन केले होते. यापूर्वीही त्यांनी चंद्रयान-१, मंगळयान, जीएसएलव्ही यासारख्या विविध मोहिमांसाठी काम केले आहे.ऑर्बिटर सेन्सर डिझाईनमध्ये सिंहाचा वाटाचंद्रयान मोहिमेतील उपग्रहामध्ये ऑर्बिटर, लँडर आणि रोव्हर यांची मुख्य भूमिका असते. या तिन्ही भागांसाठी लागणारे डिझाईन करणाऱ्या टीममध्ये केरबा लोहार यांचा सिंहाचा वाटा आहे. २०१९ मधील चंद्रयान-२ मोहिमेतील विक्रम लँडरचा संपर्क सुरळीत ठेवण्यासाठी ज्या शास्त्रज्ञांनी आटोकाट प्रयत्न केले, त्यामध्ये केरबा लोहार यांचाही सहभाग होता. दुर्दैवाने हा लँडरचा संपर्क न झाल्याने दुसरी मोहीम अयशस्वी झाली.

अवकाश संशोधनामध्ये संधीया मोहिमेच्या यशामुळे भारताकडे इतर देश आदराने पाहत आहेत. कठोर परिश्रम आणि सातत्य यामुळे २०१९ मध्ये आलेले अपयश मागे सारून यशाची झेप घेतल्याचा मोठा आनंद आहे. तरुणांना अवकाश संशोधनात मोठी संधी आहे. मेकॅनिकल, इलेक्ट्रिक तसेच संगणकशास्त्र या विषयाच्या विद्यार्थ्यांनी अवकाश संशोधन क्षेत्रात यावे. - केरबा लोहार, 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरChandrayaan-3चांद्रयान-3isroइस्रो