शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

बाकीचे आता आलेले, त्यामुळे मंत्रिपद मलाच मिळणार; राजेश क्षीरसागर यांचा विश्वास

By विश्वास पाटील | Updated: November 28, 2024 23:37 IST

क्षीरसागर म्हणाले, विधानसभा निवडणुकीत काॅमन मॅन मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांचा चेहरा चालला, त्यामुळे महायुतीचा विजय झाला आहे...

कोल्हापूर : शिवसेना स्थापन झाल्यापासूनचा मी केडरमधील कार्यकर्ता आहे, बाकीचे आता आलेले आहेत. त्यामुळेच मलाच मंत्रिपद मिळेल असा विश्वास शिंदेसेनेचे नेते आमदार राजेश क्षीरसागर यांनी गुरुवारी कार्यकर्त्यांशी बोलताना व्यक्त केला. त्यामुळे या पक्षात मंत्रिपदावरून रस्सीखेच सुरु असल्याचे चित्र स्पष्ट झाले. पालकमंत्रीपद आपल्यालाच मिळायला हवे असा दावा करून त्यांनी खळबळ उडवून दिली.क्षीरसागर म्हणाले, विधानसभा निवडणुकीत काॅमन मॅन मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांचा चेहरा चालला, त्यामुळे महायुतीचा विजय झाला आहे.

एकनाथ शिंदे यांनी मोदी शहा यांनी घेतलेला निर्णय मान्य असेल सांगितल्याने सत्ता स्थापनेचा मार्ग सुखकर झाला आहे. शिंदेसेनेला दुसऱ्या क्रमांकाची मंत्रिपद मिळतील अशी खात्री आहे. १० पैकी १० जागा महायुतीच्या येणार हे मी आधी पासून म्हणत होतो. लोकसभेनंतर हिंदू देखील एकवटले आणि त्यांनी दाखवून दिले एकत्र आल्यावर हिंदू काय करू शकतो. जिल्ह्यात शिंदेसेनेचा १ खासदार ३ आमदार आणि २ पाठिंबा असलेले आमदार आहेत.ज्याचे जास्त आमदार त्याला पालकमंत्री पद फॉर्मुला आहे. मी ही तिसऱ्या टर्मचा आमदार आहे.. गेली पाच वर्ष नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष या मंत्री पदाच्या दर्जाचा कार्यभार व्यवस्थित सांभाळला आहे. मित्रा संस्थेच्या उपाध्यक्ष पदाच्या माध्यमातून शाश्वत परिषदेसारख्या संकल्पनांद्वारे कोल्हापूर जिल्ह्यात विकासाची वाटचाल सुरू केली आहे. यामुळे पालकमंत्रीपद मिळावे यासाठी आम्ही आग्रही आहोत असा दावा आमदार क्षीरसागर यांनी केला आहे.

वास्तव काय..? शिंदेसेनेचे क्षीरसागर, प्रकाश आबिटकर आणि चंद्रदिप नरके हे आमदार झाले आहेत. त्यातील क्षीरसागर व नरके हे एकदा पराभूत होवून आता तिसऱ्यांदा आमदार झाले आहेत. आबिटकर यांनी हॅट्रटिक केली आहे. गेल्या निवडणूकीनंतरही त्यांचे नांव राज्यमंत्रीपदासाठी चर्चेत आले होते. पण ऐनवेळेला राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी मध्येच मुसंडी मारल्याने आबिटकर राज्यमंत्रिपदापासून वंचित राहिले. यड्रावकर हे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी जवळीक साधून आहेत. त्यामुळे त्यांचेही नांव राज्यमंत्रीपदासाठी चर्चेत आहे. पद एक आणि स्पर्धक चार अशी सध्या स्थिती आहे. त्यात कोण बाजी मारतो याची उत्सुकता आहे. कोल्हापूर शहराचे राजकारण, महापालिका निवडणूक आणि माजी मुख्यमंत्री शिंदे यांच्याशी अत्यंत जवळचे संबंध यामुळे क्षीरसागर या स्पर्धेत पुढे असल्याचे दिसत आहे. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरShiv Senaशिवसेना