शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: पन्हाळा वारसा स्थळास गती, लोकवस्ती उठण्याची धास्ती

By संदीप आडनाईक | Updated: April 26, 2025 15:05 IST

संदीप आडनाईक कोल्हापूर : युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत पन्हाळ गडाचा समावेश झाल्यास गडावरील लोकवस्ती उठवली जाईल, या भीतीतूनच ...

संदीप आडनाईककोल्हापूर : युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत पन्हाळगडाचा समावेश झाल्यास गडावरील लोकवस्ती उठवली जाईल, या भीतीतूनच या यादीत समावेश होण्यास पन्हाळकरांनी कडाडून विरोध सुरू केला आहे. जिल्हा प्रशासनाने स्थानिक रहिवाशांसोबत नीट सुसंवाद न केल्याने संभ्रम वाढला आहे. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी रहिवाशांचे गैरसमज दूर करू, असे सांगून वारसा स्थळासाठी नवे कोणतेही नियम लागू होणार नाहीत असे स्पष्ट केले आहे.छत्रपती शिवाजी महाराजांच्या वारसाशी जोडलेल्या १२ निवडक किल्ल्यांपैकी महत्त्वाचा असलेला पन्हाळा किल्ला जागतिक वारसास्थळात समाविष्ट करण्यात येत आहे. यासाठी भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण (एएसआय), महाराष्ट्र राज्य पुरातत्त्व विभाग, वन विभाग आणि स्थानिक प्रशासनाने अधिकाऱ्यांसह युनेस्कोच्या पथकाने पन्हाळा किल्ल्याची पाहणी केली. गेल्या महिन्यात पन्हाळगडावरील १३ डी स्टुडिओच्या लोकार्पण सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आले होते. त्यानंतर पन्हाळगडावरील लोकवस्ती उठवण्यात येणार आहे, असा समज नागरिकांमध्ये निर्माण झाला आहे. दरम्यान, तीन दरवाजा परिसरातील काही स्थानिक व्यावसायिकांना खाद्यपदार्थ आणि मनोरंजनासाठी स्वतंत्र जागा देण्याचा प्रयत्न झाला. त्यामुळे त्यांनी पन्हाळगडाचा समावेश जागतिक वारसा स्थळाच्या यादीत समाविष्ट करू नये अशी भूमिका घेत विरोध केला आहे. पन्हाळगडाला दोन वेळा भेटी दिल्या आहेत. एक बैठकही बोलावली होती; परंतु रहिवाशांनी समजून घेतलेले नाही. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पन्हाळगडावर बैठकीत गैरसमज दूर करू, असे जिल्हाधिकारी येडगे यांनी सांगितले.

हे आहेत आक्षेप

  • जागतिक वारसा स्थळांच्या यादीत पन्हाळ्याचे नाव निश्चित झाले, तरी ग्रामस्थांना कसलीही माहिती दिली नाही.
  • तटबंदीपासून १०० मीटर अंतरावरील घरांची मालकी, माहिती जागतिक वारसा स्थळाचे अभियंता गोळा करत आहेत.
  • दूरध्वनी तसेच आकाशवाणीचे मनोरे (टाॅवर) उंची जास्त होत असल्याने हलवण्यात येणार आहेत.
  • जोतिबा डोंगरावर यासाठी प्रत्येकी दहा गुंठे जागा दिल्यामुळे या संशय बळावला आहे.
  • पन्हाळा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या उंच पाण्याची टाकी पाडण्यास सांगितले जात आहे.
  • पन्हाळ्यावरील सर्व शासकीय कार्यालये वाघबीळ येथे स्थलांतरित करण्यात येणार आहेत.

पन्हाळ्याच्या रहिवाशांना कोणता फायदा होणार आणि काय नुकसान होणार याची माहिती जिल्हा प्रशासनाने लिखित स्वरूपात द्यावी आणि पन्हाळगडावर येऊन प्रत्याक्ष भेटीत खुलासा करावा.- असिफ मोकाशी, माजी नगराध्यक्ष, पन्हाळाजिल्हाधिकाऱ्यांनी दोन वेळा पन्हाळगडाला भेट दिली. यावेळी बोलावलेल्या बैठकीत पन्हाळ्याच्या रहिवाशांना आमंत्रण नव्हते. नागरिकांच्या रहिवासाला धोका पोहोचत असेल तर पन्हाळगड युनोस्कोच्या यादीत घेऊ नये, यासाठी न्यायालयात प्रसंगी धाव घेतली जाईल. - ॲड. रवींद्र तोरसे, पन्हाळा. 

पन्हाळगडावरील मूळ रहिवाशांची कोणतीही ठिकाणे ताब्यात घेतली जाणार नाहीत. उलट पर्यटनवाढीसाठी प्रोत्साहन दिले जाणार आहे. ज्यांचे अतिक्रमण आहे, ते मात्र काढले जाईल. व्यवसायाला शिस्त लावली जाईल. - अमोल येडगे, जिल्हाधिकारी, कोल्हापूर.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरFortगड