शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक झाली की लगेच निकाल, तिन्हींची एकत्र मतमोजणी अशक्य; ईव्हीएम सांभाळून ठेवणे जिकिरीचे
2
आजचे राशीभविष्य - २६ ऑक्टोबर २०२५; प्रत्येक कामात यश, अचानक धनलाभ होईल
3
'मॅडम फिट प्रमाणपत्र द्या', पोलिसांचा सर्वत्र दबाव, पाच महिने 'ती' मागत होती न्याय; खासदार व पीएचाही उल्लेख
4
महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी बलात्काराचा आरोप असलेला PSI गोपाळ बदने अखेर पोलिसांना शरण
5
पुढील आठवडा पुन्हा पावसाचा; कोकण किनारपट्टीसह मराठवाडा, विदर्भाला इशारा
6
पबमध्ये ओळख, कॉलवरून वाद; तरुणीला नेले फरफटत! बोरिवलीतील पबसमोरील थरारक घटना
7
१० ते १५ राज्यांमध्ये होणार मतदार याद्यांची पडताळणी; एसआयआरचा पहिला टप्पा पुढील आठवड्यात सुरू
8
धार्मिक द्वेषाचा अजेंडा राबवण्याचा डाव, सणातही समाजामध्ये द्वेष पसरविण्याचे काम : वर्षा गायकवाड
9
जर शांतता करार झाला नाही तर थेट युद्ध होईल; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांची अफगाणिस्तानला धमकी
10
ज्या सिरपनं घेतला २६ मुलांचा जीव, 'त्या' औषध कंपनीनं भाजपाला दिले ९४५ कोटी?; काँग्रेस नेत्याचा दावा
11
पूर्ववैमनस्यातून कराडच्या नांदलापूर येथे युवकाचा खून; ५ जणांनी केला तलवार, कोयत्याने वार
12
वादग्रस्त प्रतिभा टॉवरच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा; मुंबई उच्च न्यायालयाचा स्थगितीस नकार, निर्णयाने दिलासा
13
"रोहितसोबत फलंदाजी करणं सोपं गेलं, कारण..."; विराट कोहलीने सांगून टाकली 'मन की बात'
14
भारतासाठी धोका! 'चिकन नेक'जवळ चीन घुसण्याच्या तयारीत?; बांगलादेशी समर्थक रस्त्यावर उतरले
15
राज्यसभा निवडणुकीत भाजपा आमच्याकडे डील करायला आली होती, पण...; फारूख अब्दुल्लांचा गौप्यस्फोट
16
IND vs AUS: "आता घरचे लोक पण टोमणे मारतात..."; पत्रकाराच्या 'त्या' प्रश्नावर गिलचं उत्तर
17
Smartphones: १५ हजारांच्या बजेटमध्ये चांगला स्मार्टफोन शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन!
18
पोत्यातून निघाल्या नोटाच नोटा! भीक मागणाऱ्या महिलेकडे सापडला 'खजिना'; आतापर्यंत किती मोजल्या?
19
Viral Video: जुना, तुटलेल्या टीव्हीचा बनवला हेल्मेट; तरुणाचा जुगाड पाहून नेटकरी शॉक!
20
ICC Womens World Cup 2025 : ठरलं! नवी मुंबईत भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात रंगणार सेमीफायनल

महिलांना शहरांतर्गत मोफत बससेवेची मुख्यमंत्र्यांची घोषणा विरली हवेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2024 17:12 IST

प्रचारात मोफतच्या बोलबाल्यांमुळे आठवण..

कोल्हापूर : शहरांतर्गत बससेवा महिलांसाठी मोफत करण्याची घोषणा सहा महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापुरातील विविध कामांच्या उद्घाटनप्रसंगी केली होती; पण ही घोषणा हवेतच विरली आहे. प्रत्यक्षात याची अंमलबजावणी झालेली नाही. नवी मुंबई परिवहन उपक्रमाच्या सर्व बसना महिलांसाठी पन्नास टक्के भाड्यात सवलत दिली आहे; पण शहरात महिलांना मोफत बससेवा देणे राज्यात अजूनही कोठेही शक्य झालेले नाही. महापालिका परिवहन विभागांना त्यासाठी अनुदान द्यावे लागणार असल्याने ही घोषणाच सत्त्यात उतरली नाही.मुख्यमंत्री शिंदे यांनी एसटी महामंडळाने महिलांच्या प्रवास भाड्यात पन्नास टक्के सवलत दिली आहे. त्याप्रमाणे कोल्हापूरसह राज्यातील सर्व शहरांतर्गत महिलांसाठीचा बस प्रवास मोफत केला जाईल, अशी घोषणा केली होती; पण प्रत्यक्षात याची अंमलबजावणी झाली नाही. याची अंमलबजावणी झाली असती तर कोल्हापूर केएमटीसह इतर शहरातील बससेवा पुरवणारी यंत्रणा पुन्हा तोट्यात गेली असती.सध्या कोल्हापुरात केएमटीला रोज प्रवासी भाड्यातून सात लाख रुपये उत्पन्न मिळते. याउलट खर्च दहा लाख रुपये होतो. महिलांना मोफत प्रवासाचा लाभ दिला असता तर रोज तोट्यात पुन्हा तीन लाखांचा अतिरिक्त आर्थिक बोजा पडला असता, असे विदारक चित्र असतानाही केवळ व्होट बँकेसाठी लोकप्रिय घोषणांच्या सपाट्यात मुख्यमंत्री शिंदे यांनी शहरातर्गंत महिलांसाठी मोफत बस सेवा देण्याची घोषणा केली.ही घोषणा प्रत्यक्षात अमलात आणली असती तर राज्य सरकारला शहरांच्या स्थानिक स्वराज्य संस्थांना शासनाकडून अनुदान देण्याची आवश्यकता होती. ही वेळ येणार हे आणि राज्याच्या तिजोरीवर बोजा पडणार हे समोर आल्यानंतरच शहरातील महिलांना मोफत बस प्रवासाची घोषणा अंमलबजावणीविना गुुंडाळची नामुष्की ओढवल्याचा आरोप आता होत आहे.

प्रचारात मोफतच्या बोलबाल्यांमुळे आठवण..कर्नाटक सरकारने महिलांसाठी मोफत बससेवा सुरू केले. त्यानंतर महाराष्ट्रात महिलांसाठी बससेवेत पन्नास टक्क्यांची सवलत देण्यात आली. याचा पुढचा टप्पा म्हणून शहरांतर्गत महिलांना मोफत बस प्रवासाची घोषणा मुख्यमंत्री शिंदे यांनी केली. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात अनेक प्रमुख पक्षांनी आपल्या जाहीरनाम्यात मोफत योजनांचे आश्वासन दिले. म्हणूनच सहा महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री शिंदे यांनी महिलांसाठी बस प्रवास मोफत देण्याच्या केलेल्या घोषणांची आठवण अनेकांना होत आहे.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४kolhapur-north-acकोल्हापूर उत्तरEknath Shindeएकनाथ शिंदेWomenमहिलाwestern maharashtra regionपश्चिम महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024