शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: कलमा पढायला सांगितलं, पँट काढली अन्...! पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा उन्माद; धर्म विचारून २७ जणांची हत्या
2
हा देशाच्या एकता व अखंडतेवर हल्ला, पहलगाम हल्ल्याचा संघाकडून निषेध
3
हॉस्टेलच्या रूममध्येच 'ती'ने संपविले जीवन; सोलापुरातील धक्कादायक घटना
4
लग्नानंतर सातव्या दिवशीच नौदलाच्या अधिकाऱ्याची दहशतवाद्यांकडून हत्या; हनिमूनसाठी गेले होते विनय नरवाल
5
अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; TRF च्या टेरर मॉड्यूलने चिंता वाढली
6
चोरीच्या आरोपातून दोन तरूणांना बैलबंडीला जुंपले; व्हीडिओ व्हायरल, १० जणांवर गुन्हा दाखल
7
IPL 2025 LSG vs DC : लखनौच्या संघासमोर केएल राहुलचा रुबाब; सिक्सर मारत संपवली मॅच
8
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
9
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
10
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
11
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
12
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
13
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
14
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
15
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
16
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
17
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
18
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल
19
बजाजच्या या शेअरनं दिला 22000% हून अधिकचा परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; आता...!
20
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना

कोल्हापुरात उद्धवसेनेच्या पदाधिकाऱ्यास शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांनी केली धक्काबुक्की, तणावाचे वातावरण

By उद्धव गोडसे | Updated: November 20, 2024 20:12 IST

कोल्हापूर : कसबा बावडा येथे उद्धवसेनेचे उप-शहरप्रमुख राहुल माळी याला बुधवारी दुपारी तीनच्या सुमारास शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांनी धक्काबुक्की केली. यानंतर दोन्ही गटाचे ...

कोल्हापूर : कसबा बावडा येथे उद्धवसेनेचे उप-शहरप्रमुख राहुल माळी याला बुधवारी दुपारी तीनच्या सुमारास शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांनी धक्काबुक्की केली. यानंतर दोन्ही गटाचे सुमारे एक हजार कार्यकर्ते आमने-सामने आल्याने प्रचंड तणाव निर्माण झाला. आमदार सतेज पाटील यांनी समजूत काढत जमावाला शांत केले.

तसेच शहर पोलिस उपअधीक्षक अजित टिके यांनी राज्य नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष राजेश क्षीरसागर यांना दुसरीकडे जाण्याचे आवाहन केल्याने परिस्थिती नियंत्रणात आली. दरम्यान, टाकाळा, लोणार वसाहत, सदर बाजार येथे झालेल्या किरकोळ घटना वगळता जिल्ह्यात शांततेत मतदान झाले.उद्धवसेनेचे राहुल माळी (रा. जयभवानी गल्ली, कसबा बावडा) यांनी रंकाळा तलावाच्या सुशोभीकरणासाठी माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी निधी दिल्याचा व्हिडिओ काही व्हॉट्सॲप ग्रुपवर व्हायरल केला होता. याबाबत बुधवारी पहाटे पाचच्या सुमारास त्याला एका तरुणाने फोन करून धमकावले. बुधवारी दुपारी तीनच्या सुमारास माळी हा भगवा चौकात आला असता, शिवसेनेचे कार्यकर्ते सुनील जाधव यांच्या कार्यालयासमोर पोहोचला. त्यावेळी जाधव आणि माळी यांनी एकमेकांना गद्दार, दुगल असे संबोधल्याने वादाला सुरुवात झाली. आदर्श सुनील जाधव याने माळी याची गळपट पकडून धक्काबुक्की केली. हा प्रकार समजताच कार्यकर्त्यांनी भगवा चौकात धाव घेऊन गर्दी केली. त्याचवेळी मतदान केंद्रांची पाहणी करण्यासाठी आलेले राजेश क्षीरसागर आणि सत्यजीत कदम हे भगवा चौकातील एका हॉटेलमध्ये थांबले होते. जमावाने हॉटेलच्या बाहेर गर्दी करताच आमदार सतेज पाटील भगवा चौकात पोहोचले. त्यांनी शहर पोलिस उपअधीक्षक अजित टिके यांच्याशी चर्चा करून क्षीरसागर आणि कदम यांना दुसरीकडे पाठवण्यास सांगितले. त्यानुसार टिके यांच्या विनंतीनुसार क्षीरसागर आणि कदम निघून गेले.त्यानंतर आमदार पाटील यांनी संतप्त जमावाची समजूत काढून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर १० मिनिटे ठिय्या मारला. काही वेळाने कार्यकर्ते निघून गेले. मात्र, या घटनेने सुमारे तासभर कसबा बावडा येथे प्रचंड तणाव निर्माण झाला होता.

अनर्थ टळलादत्त मंदिर कॉर्नर येथील बलभीम विद्यालयाजवळ तरुणांची गर्दी झाली. प्रसंगाचे गांभीर्य ओळखून क्षीरसागर आणि कदम हे सुनील जाधव आणि त्यांचा मुलगा आदर्श यांना आपल्या गाडीत घेऊन ते निघून गेले. काही तरुणांनी क्षीरसागर यांच्या गाडीचा पाठलाग केला. कवडे गल्लीच्या कोप-यावर गाडी थांबल्यानंतर जमावाने क्षीरसागर यांना जाब विचारण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी आमदार सतेज पाटील यांनी भगवा चौकात धाव घेऊन जमावाला छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याकडे वळविल्याने अनर्थ टळला. 

प्रत्येक गोष्टीचा हिशोब करूमी राहुलच्या पाठीशी भक्कम आहे. आपण प्रत्येक गोष्टीचा हिशोब करू, असे आमदार पाटील यांनी सांगताच तरुणांनी जल्लोष केला. संतप्त जमाव प्रचंड आक्रमक होता. वेळीच त्यांची समजूत घातली नसती तर अनर्थ विपरित घडले असते.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४kolhapur-north-acकोल्हापूर उत्तरUddhav Thackerayउद्धव ठाकरेEknath Shindeएकनाथ शिंदेShiv Senaशिवसेनाwestern maharashtra regionपश्चिम महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024