कोल्हापूर : गणेशोत्सवात मंडळांची संख्या वाढत असली, तरी अनेक ठिकाणी ‘एक गाव, एक गणपती’ ही संकल्पना राबवली जात आहे. यंदा जिल्ह्यातील ५४ गावांमध्ये एक गाव एक गणपती संकल्पना राबवली जात आहे. गेल्या काही वर्षांत ही संकल्पना बाजूला पडत असल्याने सहभागी गावांची संख्या कमी होत आहे. गावांचा एकोपा वाढविण्यासाठी पुन्हा या संकल्पनेला बळ देण्याची गरज निर्माण झाली आहे.यंदा ५४ ठिकाणी एक गाव एक गणपतीयंदा जिल्ह्यात ५४ गावांनी एक गाव एक गणपतीची परंपरा जपली आहे. यात पन्हाळा तालुक्यातील सर्वाधिक २४ गावांचा समावेश आहे. गडहिंग्लज तालुक्यातील ११, तर करवीर तालुक्यातील सहा गावांचा समावेश आहे.
वाद अन् अनावश्यक खर्चाला आळाएक गाव एक गणपती ही संकल्पना गावाचा एकोपा टिकून राहावा, वाद टाळता यावेत आणि अनावश्यक खर्चाला आळा घालण्यासाठी सुरू झाली. यातून लाखो रुपयांची बचत होत असल्याने ते पैसे गावातील विधायक उपक्रमांना वापरता येतात.गावात विविध कार्यक्रमांचे आयोजनगावात सर्वजण एकत्र उत्सव साजरा करीत असल्याने सामूहिक समारंभ, कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. भजन, कीर्तन यासह सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी मिळते. गावातील तरुणांच्या कलागुणांना वाव मिळतो.
जिल्ह्यात आठ हजार सार्वजनिक गणेश मंडळेजिल्ह्यात सुमारे आठ हजार मंडळे आहेत. यातील ८६० मंडळे कोल्हापूर शहरातील आहे. इचलकरंजी, जयसिंगपूर, कागल, गडहिंग्लज, गारगोटी, पेठ वडगाव या शहरांमध्येही मंडळांची संख्या लक्षणीय आहे.
प्रोत्साहन देण्याची गरज
गावांमधील एकोपा वाढविण्यासाठी सरकार आणि प्रशासनाने पुन्हा या संकल्पनेला प्रोत्साहन आणि बळ देण्याची गरज निर्माण झाली आहे. शासकीय योजनांमधून विकास निधी देणे, शाळांसाठी सुविधा देण्याचा उपक्रम राबविल्यास गावांचा सहभाग वाढू शकतो.
तालुका - गावेपन्हाळा - २४गडहिंग्लज - ११करवीर - ६शाहूवाडी - ५कागल - ५राधानगरी - ३
सर्व पोलिस ठाण्यांनी त्यांच्या हद्दीतील गावांमध्ये बैठका घेऊन एक गाव गणपती संकल्पना राबविण्याच्या सूचना गावातील प्रमुखांना दिल्या आहेत. त्यानुसार यंदा ५४ गावांमधून प्रतिसाद मिळाला. - रवींद्र कळमकर - पोलिस निरीक्षक, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा