शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

आर्ट्स, सायन्स"ला उतरती कळा, ‘पॅकेज’वाल्यांना अधिक पसंती!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2025 14:36 IST

‘वाणिज्य, ए.आय., कॉम्प्युटर सायन्स, मेकॅट्रॉनिक्स’चा तोरा वाढला

राम मगदूमगडहिंग्लज : गडहिंग्लज तालुक्यात कला आणि विज्ञान या पारंपरिक विद्या शाखांना उतरती कळा लागली असून, ‘वाणिज्य’ची मागणी अद्याप टिकून आहे. अभियांत्रिकी शिक्षणातदेखील ‘मेकॅनिकल’ व ‘सिव्हिल’चा तोरा उतरला असून, आर्टिफिशिअल इंटेलिजिअन्स, कॉम्प्युटर सायन्स, इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड टेलिकम्युनिकेशन, मेकॅट्रॉनिक्स या चांगल्या ''पॅकेज''च्या अभ्यासक्रमांची मागणी वाढली आहे. औषधनिर्माणमध्ये डी. फार्म., वैद्यकीय शिक्षणात फिजीओथेरपी, बी.एससी ऑप्टोमेट्री व नर्सिंग या नव्या अभ्यासक्रमांची भर पडली आहे.

स्वातंत्र्यापूर्वी दिवंगत काळू मास्तर व त्यांचे शिष्य दिनकर मास्तर यांनी खाजगी शाळा काढून शिक्षणाचा प्रसार केला. त्यामुळे सुरुवातीपासूनच गडहिंग्लज तालुका शिक्षणात आघाडीवर राहिला. दरम्यान, व्ही. टी. पाटील, डॉ. एस. एस. घाळी यांच्यामुळे ग्रामीण विद्यार्थ्यांच्या पदवी शिक्षणाची सोय झाली.गेल्या दशकापासून ''कला, वाणिज्य आणि विज्ञान''च्या पदव्युत्तर पदवीबरोबरच प्राचार्य जे. बी. बारदेस्कर, ॲड. अण्णासाहेब चव्हाण, अंजना रेडेकर, ॲड. श्रीपतराव शिंदे, किसनराव कुराडे, रियाज शमनजी, डॉ. सदानंद पाटणे, डॉ. नागेश पट्टणशेट्टी, सतीश पाटील यांच्यामुळे आयुर्वेदिक, होमिओपॅथिक वैद्यकीय शिक्षण, नर्सिंग, औषधनिर्माण आणि अभियांत्रिकीची पदविका व पदवी शिक्षणाची सोय झाली आहे. त्याचा फायदा गडहिंग्लज, चंदगड, आजरा, भुदरगड, कागलसह सीमा भागातील विद्यार्थ्यांना होत आहे. त्यामुळे एक विकसनशील शैक्षणिक केंद्र म्हणून तालुका नावारूपाला आला आहे.

तथापि, अनुदानित वरिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापकांच्या निम्म्याहून अधिक जागा अनेक वर्षे रिक्त आहेत. त्याच्या परिणामाला सामोरे जात असतानाच नव्या शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीला सुरुवात झाली आहे. त्यातदेखील काही जुने अभ्यासक्रम नव्या स्वरूपात पुढे आणले जात आहेत. परंतु, दुरावलेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा वर्गात आणण्याबरोबरच त्यांना उद्योग, व्यवसाय आणि नोकरीच्या लायकीचे घडविण्याचे खरे आव्हान शिक्षकांबरोबरच संस्थाचालकांसमोर उभे ठाकले आहे.

दृष्टिक्षेपात शैक्षणिक सोयवरिष्ठ महाविद्यालये : ८ (एकूण विद्यार्थी ८९३७)शिक्षणशास्त्र महाविद्यालये : ३अध्यापक महाविद्यालये : ४आयुर्वेदिक वैद्यकीय महाविद्यालये : २होमिओपॅथीक वैद्यकीय महाविद्यालय : १फिजीओथेरपी वैद्यकीय महाविद्यालय : २अभियांत्रिकी महाविद्यालये : २औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालये : ४नर्सिंग कॉलेज : ५आॅप्ट्रोमेट्री कॉलेज : १चित्रकला महाविद्यालय : १उच्च माध्यमिक शाळा : २२व्होकेशनल कॉलेज : ४आय.टी.आय. : शासकीय १, खाजगी - १कौशल्य विकास शिक्षण संस्था : ३माध्यमिक शाळा : ६५प्राथमिक शाळा : १५०इंग्रजी माध्यम शाळा : २२उर्दू शाळा : ५सीबीएसई शाळा : ३१ ली ते १२ वी विद्यार्थी संख्या : ३८१३१

''शैक्षणिक केंद्र'' तरीही बेरोजगारी हटेना!गडहिंग्लजसह सीमाभागातील एक शैक्षणिक केंद्र म्हणून ''गडहिंग्लज''चे नाव सर्वदूर पोहोचले आहे. परंतु, तालुक्यातील बेरोजगारी काही अद्याप हटलेली नाही, याबाबतही संस्थाचालक, शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांनीही आत्मचिंतन करण्याची गरज आहे.

नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी कुशल मनुष्यबळाची गरज वाढत आहे. त्यासाठी ए.आय., एमएल, संगणक, इलेक्ट्रॉनिक्स, जैवतंत्रज्ञान यासारख्या प्रगत शिक्षणाची गरज आहे. पारंपरिक शिक्षणातून ही गरज पूर्ण करता येत नाही. त्यामुळे बदलत्या काळानुसार त्यात बदल न झाल्यास ते निरूपयोगी ठरणार आहे. नव्या शैक्षणिक धोरणामुळे विद्यार्थ्यांना आपल्या आवडीचे शिक्षण घेता येणार आहे. तसेच कला, वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांनाही प्रगत तंत्रज्ञानाचे शिक्षण घेता येणार आहे, असे बंधनमुक्त शिक्षणच पुढील काळात विद्यार्थ्यांना त्यांचे भविष्य घडवण्यास उपयोगी ठरेल. - डॉ. दिनकर घेवडे प्राचार्य, डॉ. ए. डी. शिंदे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, भडगाव - गडहिंग्लज

टॅग्स :kolhapurकोल्हापूरEducation Sectorशिक्षण क्षेत्रStudentविद्यार्थीcollegeमहाविद्यालय