शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

दस्त नोंदणी वाढली, पण कार्यालये कमी होणार: कर्मचाऱ्यांवरील ताण वाढणार

By विश्वास पाटील | Updated: September 21, 2024 13:40 IST

स्वइमारतच नाही

विश्वास पाटीलकोल्हापूर : राज्यभरातील दुय्यम निबंधक कार्यालयातील दस्तांची संख्या वाढत असल्याचे मान्य करणाऱ्या राज्य सरकारने त्यासाठी नवीन कार्यालये सुरू करण्याऐवजी प्रत्येक कार्यालयाने दस्त नोंदणी करण्याच्या मानक संख्येत शुक्रवारी वाढ केली. शहरी भागातील जिथे ८ हजार वार्षिक दस्त होत होते त्यांनी आता १२ हजार दस्त नोंदणी करावी लागणार आहे. दस्ताची संख्या वाढल्यास काही कार्यालये बंद करावी लागतील अशी भीती कर्मचाऱ्यांतून व्यक्त होत आहे. ग्रामीण भागात किमान ८ हजार दस्तनोंदणीची संख्या शासन आदेशाने निश्चित केली. महसूल व वनविभागाने हा आदेश काढला आहे.वाढते नागरीकरण तसेच औद्योगिकीकरणामुळे स्थावर मिळकतीच्या हस्तांतरणाच्या व्यवहारामध्ये मोठ्या प्रमाणात वाढल्याने राज्यातील विविध दुय्यम निबंधक कार्यालयात नोंदणीसाठी दाखल होणाऱ्या दस्त संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे हे राज्य सरकारनेच या आदेशात मान्य केले आहे. कोणत्याही दुय्यम निबंधक कार्यालयात वर्षाला सरासरी ८ हजारांहून जास्त दस्त नोंदणी झाल्यास त्या कार्यक्षेत्रात नवीन दुय्यम निबंधक कार्यालय सुरू करण्याची आवश्यकता असल्याने नवीन कार्यालयाची निर्मिती व त्यासाठीची आवश्यक पदनिर्मिती करण्यात आली आहे. गेल्या काही वर्षांत राज्याच्या विकासाचे चक्र मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर या शहरांपुरतेच मर्यादित न राहता सगळीकडेच गतिमान झाले आहे. त्यामुळे दस्त संख्या वाढल्याने नागरिक, लोकप्रतिनिधींकडून नवीन कार्यालये सुरू करण्याची मागणी होत आहे. सरकारने त्या मागणीला फाट्यावर मारून पुन्हा आहे त्याच कार्यालयातील दस्त नोंदणीची संख्या मात्र वाढवली आहे. बहुतांशी कार्यालयात लिपिक संख्या कमी आहे. संगणक ऑपरेटरचे काम खासगी कंपनीकडे दिले आहे.

कोणते व्यवहार वाढले..?

  • खरेदी-विक्री
  • तारण गहाण खत
  • बक्षीस व मृत्युपत्र
  • वटमुखत्यारपत्र
  • विक्रीचा करार

स्वइमारतच नाहीराज्यातील बहुतांशी दुय्यम निबंधक कार्यालये खासगी जागेत आहेत. तिथे चांगल्या सुविधा नाहीत. एक व्यवहार असला तरी किमान आठ ते दहा लोक कार्यालयात येतात. त्यांना बसायला जागा नसते. एक व्यवहार होण्यासाठी सरासरी तासाचा वेळ लागतो. या सोयीसुविधांकडे लक्ष द्यायला शासन तयार नाही.

  • राज्यातील दुय्यम निबंधक कार्यालये : ५२०
  • वर्षाला सरासरी दस्त नोंदणी : प्रत्येकी ८०००
  • शहरी व ग्रामीण भागातही प्रत्यक्ष दस्त नोंदणी सोबतच्या ई-रजिस्ट्रेशन प्रणालीवर लिव्ह ॲण्ड लायसन्स व नोटीस इंटिमेशन फायलिंगच्या प्रमाणात वाढ. 
  • कोल्हापूर जिल्ह्यातील कार्यालये : एकूण १८
  • कोल्हापूर शहर : ०४
  • इचलकरंजी,कागल तालुका : प्रत्येकी : ०२
  • तालुक्याच्या ठिकाणी प्रत्येकी : ०१
  • कोल्हापूर शहरातील चार, शिरोळ व हातकणंगलेमधील प्रत्येकी एक अशा सहा कार्यालयांतच सरासरी ८ हजार दस्त नोंदणी
  • इतर कार्यालयांत दस्त नोंदणी कमी.
टॅग्स :kolhapurकोल्हापूरGovernmentसरकार