शहरं
Join us  
Trending Stories
1
डेमोक्रेट्सच्या खासदारांनी जारी केले एपस्टीनचे ६८ नवीन फोटो; महिलेसोबत दिसले बिल गेट्स
2
'राहुल गांधींचं काम केलं, तुमचं नाही केलं तर लोक म्हणतील...'; नितीन गडकरींनी प्रियंका गांधींना खाऊ घातली स्पेशल डिश
3
देशातून फरार, पण लंडनमध्ये मात्र जोरदार सेलिब्रेशन; ललित मोदीच्या घरी झाली विजय माल्ल्याची जंगी बर्थ डे पार्टी
4
आज होणार धमाका! महिलेच्या शरीरावर कांदबरीतील ओळीचं लिखाण, १८ वर्षीय मुलीचा 'इतका' दर लावला
5
कोकाटेंचा राजीनामा स्वीकारला; सदनिका घोटाळ्यात अटक वॉरंट निघताच आधी खाती काढून घेतली अन् आता…
6
संपादकीय : सरकारच्या प्रतिमेचे काय? डागाळलेली प्रतिमा अन् सत्तेची अपरिहार्यता
7
बांगलादेशात मोठा गोंधळ! बंडखोरांचा नेता हादी यांचा मृत्यू; दंगली उसळल्या, लोकांनी तोडफोड आणि जाळपोळ केली सुरू
8
"छापा नाही, केवळ रुटीन व्हेरिफिकेशन...", शिल्पा शेट्टीच्या वकिलांनी छापेमारीचं वृत्त फेटाळलं
9
आजचे राशीभविष्य, १९ डिसेंबर २०२५: आर्थिक लाभ होईल, कार्यालयात संघर्ष किंवा मतभेदाचे प्रसंग येतील
10
कोणाशी युती, कोणाला उमेदवारी; काँग्रेसचा निर्णय २५ डिसेंबरला, आघाडीबरोबरच निधीची व्यवस्थाही स्थानिक पातळीवरच 
11
'व्हीबी-जी राम जी' विधेयक लोकसभेत मंजूर; विरोधकांनी विधेयकाचे कागद फाडून भिरकावले
12
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
13
भाडे थकविणाऱ्यांची विक्रीची घरे जप्त करू; हायकोर्टाची पुनर्वसन योजनेतील विकासकांना तंबी
14
पक्षश्रेष्ठींच्या आदेशामुळे १८ मंडल, प्रांत अध्यक्ष नाराज; शिंदेसेनेसोबत युती नको, स्वबळावर लढू द्या
15
किडनी विक्री प्रकरणी कंबोडियाच्या लिंकसह प्रत्येक व्यवहार तपासणार; तांत्रिक तपासातून उघड होणार 'इंटरनॅशनल लिंक'
16
ऐन निवडणुकीच्या तोंडावर मराठी शाळा मुद्दा ऐरणीवर, मराठी अभ्यास केंद्राचा मोर्चा; निवडणुकीनंतर चर्चा होणार
17
दगडातून इतिहास साकारणारे शिल्पकार राम सुतार कालवश; वयाच्या १०१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
18
खासगी विमान व्यवसाय महाराष्ट्रातून जाणार? पार्किंग, विमान उतरण्यासाठीचे स्लॉट मिळणे कठीण होत असल्याची भावना
19
१५ हजार एचआयव्ही रुग्णांनी अर्धवट सोडले उपचार; सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेसाठी गंभीर इशारा
20
विजयासाठी पैठणी, नथींचे देताहेत वाण : लकी ड्रॉमध्ये टीव्ही, फ्रिज अन् एसी सुद्धा...
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरात एड्सग्रस्तांची संख्या झपाट्याने घटली

By समीर देशपांडे | Updated: November 30, 2023 15:59 IST

कर्मचाऱ्यांची व्यथा कोणी नाही जाणली, आजच्या पुरस्कार वितरणावर बहिष्कार

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील एड्सग्रस्तांचा टक्का घटला. पण हा टक्का घटावा, यासाठी परिश्रम घेणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या अडचणी मात्र वाढतच आहेत. त्यामुळे आज होणाऱ्या जागतिक एड्स दिनानिमित्त आयोजित पुरस्कारांवरही कर्मचाऱ्यांनी बहिष्कार घातला आहे.दरवर्षी १ डिसेंबर हा जागतिक एड्स दिन म्हणून जगभर पाळला जातो. जिल्ह्यामध्येही १ डिसेंबर रोजी सीपीआर प्रांगणातून भव्य रॅली काढून पंधरवड्यात विविध उपक्रम होणार आहेत. यावर्षीच्या एड्स दिनाचे ‘आता नेतृत्व समुदायाचे’ हे ब्रीदवाक्य आहे. जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण पथक, सीपीआर यांच्यावतीने या विभागाचे कामकाज चालते.सरकारी दवाखान्यांमध्ये आयसीटीसी या केंद्रामध्ये मोफत एचआयव्ही समुपदेशन व चाचणी केली जाते. एआरटी केंद्रांमधून एचआयव्ही संसर्गित रुग्णांना दर महिन्याला मोफत औषध पुरवठा व उपचार केले जातात. नवीन एचआयव्ही संसर्गितांची आकडेवारी लक्षणीयरीत्या कमी झालेली आहे, हे आशादायक आहे. यासाठी समुपदेशन व चाचणी केंद्र, एआरटी केंद्र, एड्स नियंत्रण पथक रक्तपेढी, डीएसआरसी विभाग, स्वयंसेवी संस्थांचा महत्त्वाचा वाटा आहे.एड्सग्रस्तांचे हे प्रमाण लक्षणीयरीत्या कमी करणाऱ्या कर्मचाऱ्यांबाबत मात्र निराशाजनक चित्र आहे. गेली कित्येक वर्षे हे कर्मचारी कंत्राटी तत्त्वावर तोकड्या मानधनावर काम करत आहेत. बहुतांशी कर्मचारी ४० ते ५० वयोगटातील आहेत. पण शासनाने या कर्मचाऱ्यांकडे अक्षरशः दुर्लक्ष केले आहे. नोकरीची कोणतीही हमी नाही. २०३० पर्यंत नवीन एचआयव्ही संसर्गितांची आकडेवारी शून्यावर आणण्याचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी एचआयव्ही तपासण्या वाढविणे, वर्षाला किमान १२ संसर्गित रुग्ण आणण्याची सक्ती केली जात आहे. उलट आयसीटीसी केंद्रांची संख्या कमी केली जात असल्याने कर्मचाऱ्यांची कोंडी होत आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरHIV-AIDSएड्स