शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर महापालिकेच्या नूतन आयुक्तांना करावा लागेल आव्हानांचा सामना, रखडलेले प्रकल्प मार्गी लावावे लागणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2023 12:52 IST

कोल्हापूर : गेल्या पावणेतीन महिन्यांपासून प्रशासनाची विसकटलेली घडी पूर्वपदावर आणण्यासह महापालिकेच्या नूतन आयुक्त तथा प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांना अनेक ...

कोल्हापूर : गेल्या पावणेतीन महिन्यांपासून प्रशासनाची विसकटलेली घडी पूर्वपदावर आणण्यासह महापालिकेच्या नूतन आयुक्त तथा प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांना अनेक आव्हानांचा सामना करावा लागणार आहे. प्रशासनातील सर्वच वरिष्ठ अधिकाऱ्यांना प्रोत्साहन देऊन रखडलेले प्रकल्प पूर्ण करण्याबरोबरच घनकचरा व्यवस्थापनावर अधिक लक्ष केंद्रीत करावे लागणार आहे.यापूर्वीच्या प्रशासक कादंबरी बलकवडे यांची बदली झाल्यानंतर गेल्या ८० दिवसांहून अधिक काळ महापालिकेला आयुक्त तथा प्रशासक नव्हते. त्यामुळे प्रशासनाची सगळी शिस्त बिघडली, अनेक कामे प्रलंबित राहिली. नागरिकांच्या सेवा- सुविधांवर त्याचा परिणाम झाला. कमी- अधिक महत्त्वाच्या अनेक फाइलवर निर्णय रखडले आहेत. शहरातील सार्वजनिक ठिकाणचा कचरा उठाव यंत्रणा विस्कळीत झाली आहे.शहरात दैनंदिन साचणाऱ्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्याचा प्रश्नही दिवसे दिवस गंभीर होत आहे. कचरा साठवायचा कोठे, असा प्रश्न आरोग्य विभागाला सतावत आहे. थेट पाइपलाइन योजनेचा एक भाग असलेल्या अमृत योजनेअंतर्गत शहरात टाकल्या जाणाऱ्या जलवाहिनींची कामे रखडली आहेत. बारा जलकुंभांच्या उभारणीची कामेही रखडली आहेत. ती पूर्णत्वाकडे नेणे हेही एक आव्हान आहे.प्रशासनाची आर्थिक घडी विस्कटलेली आहे. कर्मचाऱ्यांचे पगार १५ तारखेपर्यंत करताना प्रशासनाची दमछाक होत आहे. त्यामुळे उत्पन्नाचे नवीन स्राेत निर्माण करण्याचेही एक आव्हान आहे. शहरातील उद्यानांची अवस्थाही अतिशय दयनीय झाली आहे. शहराच्या अनेक भागात रस्ते खराब झाले आहेत. त्याची दुरुस्ती करण्यासह नवीन रस्त्यांची कामे दर्जेदार करून घेण्यावर जोर द्यावा लागणार आहे.महापालिकेचा आकृतीबंद अद्याप मंत्रालय पातळीवर रखडलेला आहे. तो मंजूर झाल्यानंतर नवीन भरती होणे आवश्यक असले तरी नवीन भरती आणि पगारावर होणारा खर्च याची तोंडमिळवणी करता करता नाकीनऊ येणार आहे. अशा असंख्य अडचणीतून मंजुलक्ष्मी यांना काम करावे लागणार आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरcommissionerआयुक्त