शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

कोल्हापूर जिल्हा कारागृहातील खुनी, दरोडेखोर आहेत उच्चशिक्षित, तुरुंगातूनच शिकण्याचे अनेकांचे प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2023 15:33 IST

शिक्षण अर्ध्यावर सुटलेले काही कैदी कारागृहातून शिक्षण पूर्ण करण्याचा प्रयत्न करीत आहेत.

उद्धव गोडसेकोल्हापूर : गेल्या २५-३० वर्षांपूर्वी कारागृहात बहुतांश कैदी अशिक्षित, अल्पशिक्षित असत. काळाच्या ओघात गुन्ह्यांचे स्वरूप बदलत गेले, तसेच शिक्षित, उच्चशिक्षित कैद्यांचीही संख्या कारागृहांमध्ये वाढू लागली. कळंबा मध्यवर्ती कारागृहात सध्या २१११ कैदी शिक्षा भोगत आहेत. काही कैद्यांचा अपवाद वगळता बहुतांश कैदी शिक्षित आहेत. काही कैदी तर उच्च शिक्षितही आहेत. अनेक गंभीर गुन्ह्यांमध्येही शिक्षित कैद्यांचा समावेश होता. शिक्षण अर्ध्यावर सुटलेले काही कैदी कारागृहातून शिक्षण पूर्ण करण्याचा प्रयत्न करीत आहेत.क्षमता १६९९, प्रत्यक्ष कैदी २१११कळंबा कारागृहाची क्षमता १६९९ कैद्यांची आहे. प्रत्यक्षात मात्र या कारागृहात २१११ कैदी आहेत. यात कोल्हापूरसह सांगली, सातारा, सोलापूर, पुणे यासह उत्तर कर्नाटकातील काही कैद्यांचा समावेश आहे. क्षमतेपेक्षा जास्त कैदी असल्यामुळे कारागृह प्रशासनावर अतिरिक्त ताण पडत आहे.

महिला कैदी ६०कारागृहातील एकूण २१११ कैद्यांमध्ये ६० महिला कैद्यांचा समावेश आहे. न्यायालयीन कैद्यांसह शिक्षा लागू झालेल्या महिला कैद्यांचाही यात समावेश आहे. कौटुंबिक वाद, चोरी, आर्थिक फसवणूक अशा गुन्ह्यांमध्ये महिलांचा समावेश होता. एक परदेशी महिलाही कळंबा कारागृहात शिक्षा भोगत आहे.शिक्षणात महिला कैद्यांची आघाडीगुन्हा घडण्यापूर्वी आणि कारागृहात शिक्षा भोगतानाही शिक्षण घेण्याकडे महिला कैद्यांचा कल जास्त आहे. सध्या शिक्षा भोगत असलेल्या सर्व महिला कैदी शिक्षित आहेत. यातील दोन महिला कारागृहात व्यावसायिक प्रमाणपत्र शिक्षण घेत आहेत.कारागृहात शिक्षणाची सोयकारागृहात सध्या व्यावसायिक प्रमाणपत्र शिक्षण दिले जाते. पारंपरिक पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्याही परीक्षा कैद्यांना देता येतात. त्याशिवाय अर्ध्यावर शिक्षण सुटलेल्या कैद्यांना दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण करता यावे, यासाठी कारागृह प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत.कोणत्या गुन्ह्यातील किती दोषी?गुन्हा  -  कैदीगंभीर गुन्ह्यातील दोषसिद्ध कैदी - ९३०साध्या शिक्षेतील कैदी - १३८सक्तमजुरी -   ४७३मोक्का -  ३६८स्थानबद्ध - १५अमली पदार्थ तस्करी - ३६कैद्यांचे शिक्षण किती?निरक्षर कैदी : ०२पाचवीपेक्षा कमी शिकलेले : ९१पाचवी ते दहावीपर्यंत शिकलेले : १४७८बारावी पास : ३१०पदवीधारक : १६४पदवीपेक्षा जास्त : ६६

शिक्षा भोगणाऱ्या कैद्यांचे मनपरिवर्तन होऊन त्यांच्यात सुधारणा व्हावी, यासाठी कारागृह प्रशासन काम करते. उच्चशिक्षित कैदी पुन्हा गुन्ह्यांच्या वाटेवर जाऊ नयेत, यासाठीही त्यांचे प्रबोधन केले जाते. - पांडुरंग भुसारी, कारागृह अधीक्षक (प्रभारी)

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPrisonतुरुंग