शहरं
Join us  
Trending Stories
1
आंबटशौकिन अडचणीत...! केंद्राची उल्लू, ALTT सारख्या सॉफ्ट पॉर्न अ‍ॅपवर बंदी, पहा पूर्ण लिस्ट...
2
Mumbai Rain Alert: 'काम नसेल तर घरीच थांबा!' मुंबईत पावसाचा धुमाकूळ, लोकल रेल्वे सेवेला फटका
3
Crime News : इन्स्टाग्रामवरील कमेंटमुळे जीवाला मुकला! आधी छोले-भटुरे खायला दिले, नंतर २७ वेळा चाकूने वार केले
4
महाराष्ट्रातील नोकऱ्यांसाठी यूपी-बिहारच्या विद्यार्थ्यांची जोरात तयारी, शिकतायेत मराठी
5
Bajaj Finance Share: नफा वाढला, तरी बजाज फायनान्सचा शेअर आपटला; ब्रोकरेजनं का बदललं रेटिंग?
6
PM मोदी यांनी इंदिरा गांधींनाही टाकलं मागे, ठरले सर्वाधिक काळ पंतप्रधान राहणारे दुसरे व्यक्ती; त्यांचे हे महाविक्रम जाणून तुम्हीही थक्क व्हाल
7
आधी भारताविरोधात गरळ ओकली; आता PM मोदींच्या स्वागतासाठी मंत्रिमंडळासह मुइझ्झू हजर
8
Mumbai: भाडेकरूने घरमालकालाच कार खाली चिरडण्याचा केला प्रयत्न, मुंबईतील घटना
9
'तो' अखेरचा व्हिडिओ कॉल, त्यानंतर मृत्यूची बातमी आली; महिला इंजिनिअरचा संशयास्पद मृत्यू
10
श्रावण शनिवार: प्रल्हादासाठी घेतलेल्या अवताराचे स्मरण, ‘असे’ करा नृसिंह पूजन; पाहा, मान्यता
11
बिहारनंतर आता संपूर्ण देशात मतदार याद्यांची तपासणी होणार; SIR बाबत आदेश निघाले...
12
अनिल अंबानींच्या कंपन्यांचे शेअर्स विकण्यासाठी रांगा; सर्वांनाच लागलं लोअर सर्किट, गुंतवणूकदारांत भीती
13
"मी आज पुण्याचा खासदार असतो, काँग्रेसचं तिकिट मला फायनल झालं होते, पण..."; वसंत मोरेंचा दावा
14
पहिला श्रावण शुक्रवार: वसुमान योगात 'या' राशींवर होणार लक्ष्मीकृपेची बरसात!
15
महापालिका निवडणुकीसाठी महायुतीचा करेक्ट कार्यक्रम; लाडकी बहीण योजनेतील पडताळणीला स्थगिती?
16
मनसेशी युती करण्याचा शिंदेसेनेचा आग्रह; राज ठाकरेंच्या टाळीसाठी एवढा आटापिटा कशासाठी? चर्चांना उधाण
17
मुस्लीम धर्मगुरुंसोबत RSS प्रमुख मोहन भागवतांनी केली चर्चा; ३ तासांच्या बैठकीत काय ठरले?
18
Raju Shetti :'५०० एकराची कागदपत्रे त्यांनी द्यावीत, २५ तारखेपर्यंत आरोप सिद्ध करावा'; राजू शेट्टींचे एकनाथ शिंदेंच्या आमदाराला ओपन चॅलेंज
19
'सैयारा' चित्रपट पाहिला अन् एका गर्लफ्रेंडसाठी दोन तरुण भिडले; तुंबळ हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल
20
ऑगस्टमध्ये बँका 'इतके' दिवस बंद राहणार! महत्त्वाचे काम असेल तर लगेच करा, अन्यथा अडचण होईल!

परीक्षा उत्तीर्ण होऊनही सीमा भागातील विद्यार्थी अपात्र, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून अन्याय

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2023 12:51 IST

बेळगावचा मराठी भाषक प्रदेश आमचाच आहे आणि येथील नागरिकांना सर्व सुविधा देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, अशा घोषणा महाराष्ट्रातील नेते वारंवार करत असतात; पण येथील विद्यार्थ्यांवर मात्र महाराष्ट्राकडून नेहमीच अन्याय

निपाणी : बेळगाव सीमा भागातील ८६५ गावांवर महाराष्ट्र शासनाने दावा दाखल करून या संपूर्ण गावांचे पालकत्व घेण्याची घोषणा केली होती. बेळगावचा मराठी भाषक प्रदेश आमचाच आहे आणि येथील नागरिकांना सर्व सुविधा देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, अशा घोषणा महाराष्ट्रातील नेते वारंवार करत असतात; पण येथील विद्यार्थ्यांवर मात्र महाराष्ट्राकडून नेहमीच अन्याय होत असल्याचे दिसत आले आहे. याची पुन्हा प्रचीती गुरुवारी आली. कोडणी तालुका निपाणी येथील विद्यार्थी सनमकुमार पंडित माने यांंना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पूर्व, मुख्य व शारीरिक चाचणी या तिन्ही परीक्षा उत्तीर्ण होऊनही मुलाखतीसाठी अपात्र ठरविण्यात आले. या निर्णयाने सीमा भागातील मराठी भाषकांत नाराजी पसरली आहे.२०२० साली वृत्तपत्रात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची जाहिरात प्रसिद्ध झाली होती. जाहिरातीमध्ये कारवार, बीदर व बेळगाव या जिल्ह्यांतील परीक्षार्थी जात प्रवर्गासहित अर्ज दाखल करू शकत होते. यानुसार सनमकुमार माने यांनी मागास प्रवर्गातून अर्ज केला. आयोगाची पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा व शारीरिक परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर गुरुवार दिनांक ९ मार्च रोजी त्यांना यशदा पुणे येथे मुलाखतीसाठी बोलवण्यात आले होते; पण याठिकाणी कागदपत्रांची तपासणी केली असता महाराष्ट्र राज्याचा जातीचा दाखला नसल्याचे कारण सांगत सनमकुमार माने यांना मुलाखतीसाठी अपात्र ठरविण्यात आले.

पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा व शारीरिक परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतरही अशा पद्धतीने सीमा भागातील विद्यार्थ्याला अपात्र ठरवणे हा सीमा भागातील विद्यार्थ्यांवर एक प्रकारचा अन्याय असल्याची भावना मराठी भाषकांमधून व्यक्त होत आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMPSC examएमपीएससी परीक्षाinterviewमुलाखत