शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
4
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
5
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
6
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
7
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
8
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
9
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
10
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
11
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
12
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
13
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
14
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
15
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
16
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
17
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
18
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
19
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
20
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या

Kolhapur Politics: महायुतीचे किती ताणणार, त्यावर आघाडीचे फावणार; सत्तेसाठी मित्रपक्षांची गोळाबेरीज महत्त्वाची

By समीर देशपांडे | Updated: July 9, 2025 16:57 IST

कागदावर महायुती भक्कम, सतेज पाटील निवडक जागांवर लक्ष केंद्रित करणार

समीर देशपांडे कोल्हापूर : जरी राज्यात महायुती म्हणून भाजप, राष्ट्रवादी, शिंदेसेना आणि जनसुराज्य एकत्र असले तरी जिल्हा परिषदेच्या रणांगणात काही तालुक्यांमध्ये यातीलच काही नेते एकमेकांच्याविरोधात शड्डू ठोकून उभे राहणार आहेत. त्यामुळे महायुतीचे किती फाटणार आहे तेवढे महाविकास आघाडीचे फावणार आहे. परंतु ‘निवडणुकीआधी लढाईनंतर पदासाठी एकत्रित चढाई’ हे सूत्र गेली अनेक वर्षे जिल्ह्यातील नेत्यांना अंगवळणी पडले आहे. अशा वातावरणात महाविकास आघाडीला मित्रपक्षांची गोळाबेरीज अधिक ताकतीने करावी लागणार आहे.प्रत्येक पक्षाची आणि नेत्याची बलस्थाने ठरलेली आहेत. गेल्या निवडणुकीचा विचार करता हातकणंगलेमध्ये भाजपने निम्म्या जागा जिंकल्या होत्या. करवीर, शिरोळ आणि गडहिंग्लजनेही भाजपला साथ दिली. करवीरमध्ये काँग्रेस वरचढ राहिली. गगनबावड्यात काँग्रेसने १०० टक्के यश मिळवले तर चंदगड, राधानगरीनेही त्यांना मदत केली. राष्ट्रवादीचे सर्वाधिक तीन सदस्य कागल तालुक्यातून तर राधानगरीतून दोन सदस्य निवडून आले. ११ पैकी ७ जागा हसन मुश्रीफ आणि के. पी. पाटील यांच्या मतदारसंघातून निवडून आल्या आहेत. करवीर आणि हातकणंगले तालुक्यात वाढलेल्या जागा हाही मुद्दा लक्षात घेण्याजोगा आहे.

वाचा- कोल्हापूर जि.प.चे २१ पैकी २० अध्यक्ष काँग्रेस-राष्ट्रवादीचे; भाजपला एकदा लॉटरी, शिवसेनेची अद्याप पाटी कोरी

प्रकाश आबिटकर, संजय घाटगे, चंद्रदीप नरके, सत्यजित पाटील यांच्या मतदारसंघातून शिवसेनेला चांगले यश मिळाले. यातून आता सत्यजित पाटील हे उद्धवसेनेकडे आहेत. तर संजयबाबांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. पन्हाळा, हातकणंगले आणि शाहूवाडी अशा तीन तालुक्यांतून ६ जागा मिळवत जनसुराज्यने आपला प्रभाव ठेवला होता. महादेवराव महाडिक यांची ताराराणी आघाडी, प्रकाश आवाडे यांची ताराराणी आघाडी, प्रकाश आबिटकर यांची शाहू आघाडी यांनी सात जागा मिळवल्या होत्या. स्वाभिमानीने दोन आणि कुपकेरांच्या आघाडीने दोन जागा पटकावल्या होत्या. 

कागदावर महायुती भक्कमराज्याच्या राजकारणात एकत्र असलेली महायुती कागदावर भक्कम आहे. तीन पैकी दोन खासदार आणि निवडून आलेल्या १० पैकी १० आमदार महायुतीचे आहेत. परंतु परस्परविरोधी गट एकत्र आल्याने त्या त्या तालुक्यात सर्वांच्यातच समझोता होणे अशक्य आहे. कार्यकर्ते फुटू नयेत यासाठी काही ठिकाणी मैत्रीपूर्ण पण शत्रू समजून लढाया होणार आहेत. महायुतीतील दोघांच्या भांडणाचा लाभ ‘महाविकास’ किती उठवू शकते यावर अनेक गणिते अवलंबून आहेत.

सतेज पाटील निवडक जागांवर लक्ष केंद्रित करणारसतेज पाटील हे सध्या महाविकास आघाडीचे जिल्ह्यातील प्रमुख नेते आहेत. त्यांनी लोकसभेनंतर विधानसभेच्या निकालाच्या झटक्यानंतरही उद्धवसेना, शरदचंद्र पवार राष्ट्रवादी पक्ष, जनता दल, स्वाभिमानी शेतकरी संघटना, शेकाप, भाकप, माकप या सर्वांना एकत्रित ठेवले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील निवडक जागांवर लक्ष केंद्रित करून बाजी मारण्याची पाटील यांची रणनीती आहे. सगळीकडे ताकद लावून चालणार नाही, याची त्यांनाही जाणीव आहे.

तीन मंत्री, कोरेंवर जबाबदारीजिल्हा परिषदेची महायुतीची जबाबदारी पालकमंत्री प्रकाश आबिटकर, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आणि आमदार विनय कोरे यांच्यावर देण्यात आली आहे. आमदार सतेज पाटील हे महाविकास आघाडीचे नेतृत्व करतील.

तालुका - गट आणि गण

  • करवीर - १२/२४
  • हातकणंगले - ११/२२
  • शिरोळ - ७/१४
  • पन्हाळा - ६/१२
  • कागल - ६/१२
  • राधानगरी - ५/१०
  • गडहिंग्लज - ५/१०
  • चंदगड - ४/८
  • भुदरगड - ४/८
  • शाहूवाडी - ४/८
  • आजरा - २/४
  • गगनबावडा - २/४
  • एकूण - ६८/१३६