शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत अग्नितांडव; कफ परेड आगीत एका मुलाचा मृत्यू, तीन जण रुग्णालयात; एकाची प्रकृती चिंताजनक
2
कतरने मोठी चूक केली...! तालिबानने युद्धविरामातील एका शब्दावर तीव्र आक्षेप घेतला, निवेदन बदलण्याची वेळ आली...
3
विकली जाणार देशातील 'ही' दिग्गज खासगी बँक; ₹२६,८५० कोटींची डील, UAE च्या या कंपनीच्या हाती येणार सूत्रं
4
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्र्म्प आणि युक्रेनच्या झेलेन्स्कींचे पुन्हा जोरदार भांडण; नकाशा बाजुला फेकला... 
5
हाँगकाँगमध्ये UAE चे कार्गो प्लेन रनवेवरून समुद्रात घसरले; विमानातील कर्मचारी वाचले, पण दोन ग्राउंड स्टाफचा मृत्यू
6
दिवाळी सुरु नाही झाली तोच दिल्लीची हवा अतिविषारी बनली; आनंद विहारमध्ये गुणवत्ता ४१७ वर...
7
'त्या' तरूणाचा प्रायव्हेट पार्ट कुणी कापला? अखेर उलगडा झाला! समोर आलं धक्कादायक सत्य
8
ट्रम्पविरोधात अमेरिकन पेटून उठले, ‘नो किंग्ज’ म्हणत रस्त्यावर उतरले! सरकारी हुकुमशाहीचा विरोध
9
आजचे राशीभविष्य : सोमवार २० ऑक्टोबर २०२५; आजचा दिवस व्यापार-व्यवसायासाठी लाभदायी, जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठीही अनुकूल
10
महाराष्ट्राला केंद्राकडून १,५६६ कोटी मदत; अमित शाह यांची घोषणा, CM फडणवीसांनी मानले आभार
11
परकीयांनी आधी विध्वंस करून लुटले, तर नंतर आलेल्यांनी बुद्धीला लुटले: सरसंघचालक मोहन भागवत
12
राज्यात ९६ लाख खोटे मतदार; राज ठाकरेंचा आरोप, निवडणुका शांततेत हव्या तर मतदार याद्या स्वच्छ करा
13
नितीशकुमारच एनडीएचे सर्वसहमतीचे नेते असतील; अमित शाह यांच्या वक्तव्यानंतर जदयूचा दावा
14
काय सांगता! १८६ कार खरेदी, तब्बल २१ कोटींचा डिस्काऊंट दिला; ऑडी, BMW, मर्सिडिज घेतल्या
15
झामुमोने दिला ‘एकला चलो’चा नारा; महाआघाडी आता फुटीच्या उंबरठ्यावर, जागावाटपावरून मतभेद
16
बिहार निवडणूक २०२५: निवडणूक आयोगाची ‘आर्थिक गुप्तचर समिती’ ६ वर्षांनी पुन्हा सक्रिय
17
आरोपीच्या वकिलाने ५०० पानी अर्ज केला, न्यायालयाने जामीन फेटाळला; नेमके प्रकरण काय?
18
चांदी स्थिरावणार, सोने भाव खाणार; चांदीचा प्रीमियम उतरला २५ हजारांवरून शून्यावर
19
पॅरिसच्या लूव्र म्युझियममध्ये ४ मिनिटांत नेपोलियन तिसरा याच्या ९ मौल्यवान वस्तू लांबवल्या
20
पाकिस्तान-अफगाण शस्त्रसंधीसाठी राजी; संघर्ष थांबणार, दोहा येथे वाटाघाटी

कोल्हापुरातील अंबाबाईच्या चरणी आंध्रच्या भाविकांची सर्वाधिक वर्णी

By इंदुमती सूर्यवंशी | Updated: May 3, 2025 13:00 IST

राज्यात मुंबई-पुणे, मराठवाड्याचे प्रमाण अधिक

इंदुमती गणेश कोल्हापूर : करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांमध्ये सर्वाधिक संख्या आंध्रप्रदेशमधील आहे. तर कुलस्वामी म्हणून दक्षिण महाराष्ट्र, मराठवाड्यातील मराठमोळे कुटुंब वर्षातून किमान एक-दोन वेळा जोतिबाच्या दर्शनासाठी येतात. तर मुंबई-पुण्यासह विविध ठिकाणांहून गोवा, कोकण, बेंगलोरला पर्यटनासाठी जाता जाता कोल्हापुरात येऊन अंबाबाईचे दर्शन घेणाऱ्यांची संख्या ४० टक्के आहे.श्री अंबाबाईला येणाऱ्या भाविकांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून वर्षाला साधारण ५० लाखांवर भाविक मंदिराला भेट देतात. भारतातील ५१ शक्तिपीठे आणि महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठात अंबाबाई असल्याने देशभरातील भाविक देवीच्या चरणी लीन होतात. पण देवस्थान समितीच्या निरीक्षणानुसार यामध्ये सर्वाधिक संख्या ही आंध्र, तमिळनाडू, हैद्राबाद, बेंगलोर येथील भाविकांची आहे. कारण येथील कुटुंब देवीला कुलस्वामिनी मानतात. तुळजाभवानीप्रमाणे काही कुटुंब अंबाबाईचादेखील गोंधळ घालतात. अशा विविध कारणांमुळे अंबाबाईला उच्चभ्रू ते अठरा पगड जातीतील भाविकांची मांदियाळी असते.

गोवा, कोकण व्हाया कोल्हापूरसुट्टीत गोवा, काेकण, बेंगलोरला पर्यटनासाठी जाणारे कुटुंब मुंबई-पुण्यासारख्या ठिकाणाहून पुढे जाण्यासाठी मधला थांबा, किंवा एका रात्रीपुरत्या निवासासाठी कोल्हापुरात येतात. सकाळी देवीचे दर्शन घेऊन पुढच्या प्रवासाला निघतात.

आंध्रची संख्या जास्त का?तिरुपती बालाजीचे दर्शन घेतल्यावर आदिमाता असलेल्या अंबाबाईचे दर्शन घेण्याची पद्धत आहे. आंध्रचे भाविक देवीच्या लक्ष्मी या स्वरूपाला मानतात. तसेच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून बालाजीला गेलेले भाविक अंबाबाई दर्शनाला येतात. हरिप्रिया एक्स्प्रेसमुळे थेट कोल्हापूरला येता येते.

कुलस्वामीचे जोडीने दर्शनएप्रिल-मे मध्ये विवाह मुहूर्त असल्याने सध्या पर्यटकांबरोबरच नवविवाहित जोडपी मंदिर आवारात दिसत आहे. महाराष्ट्रातील बहुजन कुटुंबाचा कुलस्वामी जोतिबा आहे. जोतिबाचे दर्शन झाले की भाविक अंबाबाईला येतात. जेजुरीचा खंडोबा आणि तुळजापूरची तुळजाभवानी या देवतांना सर्वाधिक भाविक असतात.

सुट्टीत राेज ५० हजारावर भाविकउन्हाळ्यात शुक्रवार, शनिवार, रविवार या सुट्ट्यांच्या दिवशी अंबाबाईला येणाऱ्या भाविकांची संख्या रोज ५० ते ७० हजारांपर्यंत आहे. इतरदिवशी ही संख्या २० हजारांपर्यंत असते. नवरात्रोत्सवात दिवसाला १ ते २ लाख भाविकांची नोंद होते.

  • आंध्र, कर्नाटकमधील भाविक संख्या : ३० टक्के
  • कुलस्वामिनी अंबाबाई, जोतिबा म्हणून दर्शनासाठी येणाऱ्यांची संख्या : ३०
  • गोवा, काेकणसह विविध ठिकाणी जाणारे पर्यटक : ४० टक्के
टॅग्स :kolhapurकोल्हापूरMahalaxmi Temple Kolhapurमहालक्ष्मी मंदिर कोल्हापूरJyotiba Templeजोतिबा