शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

Kolhapur: गारगोटीतील शासकीय विश्रामगृहाच्या जागेची विक्री, सार्वजनिक बांधकाम विभाग मात्र अनभिज्ञ

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2025 13:05 IST

सातबारा उताऱ्यावर खरेदीदाराचे नाव 

शिवाजी सावंतगारगोटी (जि. कोल्हापूर) : येथील महाराष्ट्र शासनाच्या शासकीय विश्रामगृहाच्या जागेची विक्री करण्यात आली आहे. या जागेची खरेदी-विक्रीचा व्यवहार पूर्ण होऊन सातबारा उताऱ्यावर खरेदीदार व्यक्तीच्या नावाची नोंद झाली आहे. सगळ्या विकासकामांची टक्केवारी तपासणाऱ्या अधिकाऱ्यांनी या जागेच्या मालकीसंदर्भात एक टक्काही लक्ष न दिल्याने शासकीय जागा विक्रीची नामुष्की ओढवली आहे.१९८०च्या सुमारास हरिभाऊ कडव हे आमदार असताना गारगोटी बसस्थानकाच्या शेजारी असलेल्या गट क्रमांक ५२६/अ मधील जागेवर एक लाख दहा हजार रुपये खर्चून शासकीय विश्रामगृहाची वास्तू बांधली. ही इमारत बांधून तब्बल ४१ वर्षे झाली. सुमारे चाळीस वर्षे या जागेवर हक्काने वावरणाऱ्या या विभागाने आपल्या मालकी हक्कासंदर्भात कोणताही हक्क सांगण्याची कागदोपत्री तसदी घेतलेली नाही.ही इमारत बांधताना निधी खर्च टाकताना कोणता ना कोणता मालकी हक्काचा दस्तऐवज जोडलेला असू शकतो. त्याशिवाय त्या काळात एवढी मोठी रक्कम खर्ची पडली कशी? ही इमारत उभारण्यासाठी तत्कालीन ग्रामपंचायतीतील सरपंच, सदस्य, ग्रामसेवक यांच्या परवानगीविना इमारत उभारली. ज्या मालकाची ही जागा आहे त्यांनी या जागेवर बांधकाम करताना कोणतीही आडकाठी का आणली नाही, हा संशोधनाचा विषय आहे.ग्रामपंचायतीकडेही याची नोंद नाही. केवळ महावितरणकडे या इमारतीतील वीज जोडणीची नोंद आढळते.

कागदाने गळा कापला !सार्वजनिक बांधकाम विभागातील विकासकामांचा दर्जा ‘किती टक्क्यांनी’ घसरला आहे हे जगजाहीर आहे. पण कागदावर शंभर टक्के उत्तम काम झाल्याचा कागदोपत्री दस्तऐवज तयार असतो. आपल्याच कार्यालयाच्या जागेच्या मालकी हक्काचा कागद वर्षानुवर्षे न पाहणाऱ्या या विभागाचा कागदानेच गळा कापला, असे म्हणण्याची वेळ आली आहे.

विश्रामधामगृहाच्या कागदपत्रात इतर अधिकारांत आमचे नाव असल्याने आम्हाला खरेदी होण्यापूर्वी नोटीस येणे आवश्यक होते; पण महसूल विभागाने आम्हाला कोणतीही पूर्वकल्पना दिलेली नाही. खरेदीपत्र झाल्यावर जागा रिकामी करा, अशी नोटीस आल्यावर आम्हाला समजले. - एस. बी. इंगवले, प्रभारी उपअभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, गारगोटी

टॅग्स :kolhapurकोल्हापूरGovernmentसरकार