शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
2
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
3
फक्त ७ वर्ष...! चीन आणि अमेरिकेलाही मागे टाकणार भारताची ऑटो इंडस्ट्री, नितीन गडकरींनी सांगितला 'मास्टर प्लान'
4
Latest Marathi News LIVE: कल्याण- अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ८ जण ठार झाल्याची माहिती
5
Middle East War: खर्ग बेट, बंदर अब्बासवर अमेरिकेचा डोळा; इराणची कोंडी करण्यासाठी ट्रम्प यांचा मास्टरप्लॅन
6
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
7
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
8
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
9
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
10
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
11
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
12
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
13
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
14
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
15
गोकूळमध्ये गैरप्रकार? शिवाजीराव पाटलांच्या आरोपांवर हसन मुश्रीफ यांचं स्पष्टीकरण
16
ABMCM: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या बचावासाठी सरसावले चित्रपट व्यावसायिक
17
Asha Bhosle: सूरसम्राज्ञी आशा भोसलेंचा पहिला नमस्कार अंबाबाईला.. दुसरा सरस्वतीला
18
Kolhapur: 'केडीसीसी'ची खुर्ची एवढी वजनदार, की कर्मचाऱ्यांना दहा वर्षे सोडवेना
19
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
20
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: 'केडीसीसी'ची खुर्ची एवढी वजनदार, की कर्मचाऱ्यांना दहा वर्षे सोडवेना

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2026 10:46 IST

३८० कर्मचारी एकाच ठिकाणी तळ ठोकून : नाबार्डकडून ताशेरे तरीही अंमलबजावणी होईना

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर: कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बैंकेत ३८० कर्मचारी दहा वर्षांपेक्षा अधिक तर ४६७ कर्मचारी पाच वर्षांपेक्षा अधिक काळ एकाच शाखेत तळ ठोकून आहेत. तीन वर्षांनी बदली करण्याचे धोरण नाबार्डचे आहे, याबाबत नाबार्डने अनेक वेळा ताशेरे ओढले तरी बँकेकडून त्याची अंमलबजावणी होत नाही. एखादा कर्मचारी जास्त काळ एकाच ठिकाणी राहिला तर अपहाराला संधी मिळते, त्यातूनच वारणानगरसह इतर शाखांत अपहार झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

जिल्ह्याची अर्थवाहिनी असलेल्या जिल्हा बँकेत सध्या ११०० कर्मचारी कार्यरत आहेत. नाबार्डच्या धोरणानुसार तीन वर्षांनी कर्मचाऱ्यांच्या बदल्या करणे गरजेचे आहे. मात्र, गेल्या अनेक वर्षांपासून कर्मचारी एकाच ठिकाणी तळ ठोकून आहेत. याबाबत, नाबार्डने अनेकवेळा ताशेरे ओढले असले तरी लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषदेसह प्रत्येक निवडणुकीचे कारण पुढे करत संचालक मंडळ बदलीची प्रक्रिया पुढे पुढे ढकलत आहे. एकाच ठिकाणी अनेक वर्षे काम केल्याने तेथील खात्यांचा अंदाज येतो, त्यातून अपहाराचे प्रकार घडतात. त्यामुळे तीन वर्षांनी बदल्या करण्याचे धोरण आहे.

आता अडचणी काय?

लोकसभा, विधानसभा निवडणुकांचे कारण सांगून काही संचालकांनी बदल्या करू नये, असे सांगितले होते. या निवडणुका संपून दीड-पावणे दोन वर्षे झाली.त्यानंतर महापालिका, नगरपालिका, 3 जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुकाही झाल्या आहेत. मग, आता बदल्या का होत नाहीत? असा प्रश्न काही कर्मचा-यांमधूनच होत आहे.

शहरातील शाखेत एक कर्मचारी १८ वर्षे 

कोल्हापूर शहरात एका स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आवारात असलेल्या जिल्हा बँकेच्या शाखेत एक कर्मचारी तब्बल १८ वर्षे कार्यरत आहे. असे कमी अधिक प्रमाणात अनेक शाखांमध्ये पहावयास मिळते.

कर्मचारी कमी काम कसे करायचे?

बदल्या करण्यामध्ये कर्मचाऱ्यांची कमी असलेली संख्याही अडचण ठरत असल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात येते. बहुतांशी शाखा दोन-तीन कर्मचाऱ्यांवर चालवायला लागतात. त्यामुळे कर्मचाऱ्यांना रजाही मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. "कर्मचाऱ्यांच्या बदल्यांबाबत नाबार्डने आम्हाला सूचना केलेल्या आहेत. याबाबत लवकरच प्रक्रिया राबवली जाईल", जी. एम. शिंदे, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा बँक

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur Bank Employees Stuck in Branches for Years, Violating Norms

Web Summary : Kolhapur District Bank fails to transfer employees, some for over a decade, despite NABARD's three-year policy. Extended tenures raise embezzlement risks, evidenced by past incidents. Staff shortages complicate transfers, but action is expected soon, according to officials.
टॅग्स :kolhapurकोल्हापूरMaharashtraमहाराष्ट्रbankबँक