शहरं
Join us  
Trending Stories
1
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
2
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
3
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
4
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
5
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
6
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
7
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
8
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे
9
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
10
"जे झालं ते अचानक अन् चुकून झालं"; BMW कार अपघातातील आरोपी मागतेय जामीन
11
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला
12
इस्राइल-गाझाचं उदाहरण देत शाहिद आफ्रिदीने भारताविरोधात ओकली गरळ, मोदींबाबत म्हणाला... 
13
धोक्याची घंटा! कच्ची केळी बादलीत टाकली अन् १ मिनिटात पिकली; लोकांच्या जीवाशी खेळ?
14
दबंग सून... मध्यरात्री गुंडांना घेऊन सासरी आली आणि केला धडाधड गोळीबार, त्यानंतर...  
15
IND vs PAK: पाकिस्तान जय शाहला घाबरला; आधी 'बड्या बाता' केल्या, आता गपचूप बसला, काय घडलं?
16
स्विगीने खास पुणेकरांसाठी लाँच केले 'Toing' ॲप; केवळ ५० रुपयांत मिळणार भरपेट जेवण, काय आहे वैशिष्ट्ये?
17
३ वर्षात १ लाखाचे झाले १५ लाखांपेक्षा अधिक, ६ महिन्यांत १८०% नं वधारला स्टॉक
18
"हे विजयाचं परिमाण असू शकत नाही, भारताने...!"; भारत-पाकिस्तान सामन्यासंदर्भात काय म्हणाले ओवेसी?
19
Royal Enfield ने जारी केली यादी; Hunter, Classic, Meteor..; पाहा सर्व गाड्यांची नवी किंमत

कोल्हापुरात पावसाचा जोर ओसरला, पुराचा विळखा कायम; दूध, भाजीपाला वाहतूक ठप्प

By राजाराम लोंढे | Updated: July 26, 2024 17:42 IST

‘राधानगरी’चे पाच दरवाजे खुले, पंचगंगा ४५.५ फुटांवर 

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात आज, शुक्रवारी सकाळपासून पावसाचा जोर कमी झाला असला तरी पुराचा विळखा अद्याप कायम आहे. ‘राधानगरी’चे पाच स्वयंचलित दरवाजे खुले झाल्याने पंचगंगा ४५.५ फुटांवरून वाहत आहे. तब्बल ८३ मार्गांवर पाणी आल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. निम्मा जिल्हा पुराच्या पाण्याने वेढल्याने दूध, भाजीपाला आवकेसह जनजीवन पुरते विस्कळीत झाले आहे. कोल्हापूर शहरातील पूरबाधित भागात पाणी घुसू लागले असून, नागरिकांचे स्थलांतर सुरूच आहे.गुरुवारी दिवसभर पावसाने अक्षरश: झोडपून काढले होते. धरण क्षेत्रातही जोरदार पाऊस कोसळत असल्याने जलसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. राधानगरीचे सातही दरवाजे खुले झाले होते. पण शुक्रवारी सकाळपासून पावसाचा जोर काहीसा कमी झाला आहे. सकाळी आठ वाजता तर ऊन पडल्याने नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला होता. पण दुपारनंतर पुन्हा रिपरिप सुरू झाली आहे.

राधानगरी धरणाचे दोन दरवाजे बंद झाल्याने आता विसर्ग प्रतिसेंकद ८६४० घनफुटांनी भोगावती नदीत येत आहे. त्यामुळे पंचगंगेची पातळी वाढत आहे. तब्बल ९२ बंधारे, ८३ मार्ग पाण्याखाली गेल्याने वाहतूक ठप्प झाली आहे.जिल्ह्यात २६५ मालमत्तांची पडझडजिल्ह्यात शुक्रवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासांत जिल्ह्यात एका सार्वजनिक, तर २६४ खासगी मालमत्तांची पडझड झाली होती. यामध्ये तब्बल ९८ लाख ३७ हजार रुपयांचे नुकसान झाल्याची माहीती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.एसटीचे ४६ मार्ग बंदमहापुराचे पाणी रस्त्यावर आल्याने बुधवारी एसटीचे तब्बल ४६ मार्ग बंद राहिले आहेत. गेली तीन दिवस एसटीची चाके थांबल्याने मोठे नुकसान सहन करावे लागत आहे.

दृष्टिक्षेपातशुक्रवारचा पाऊसदिवसभरातील सरासरी पाऊस : ६५ मिलिमीटरपंचगंगेच्या पातळीत वाढ : १ फुटानेसध्याची पातळी : ४५.५ फूटबंधारे पाण्याखाली : ९२मार्ग बंद : ८३नुकसान : २६५ मालमत्तानुकसानीची रक्कम : ९८ लाख ६२ हजार

टॅग्स :kolhapurकोल्हापूरRainपाऊसfloodपूरTrafficवाहतूक कोंडी