शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
3
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
4
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
5
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
6
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
7
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
8
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
9
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
10
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
11
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
12
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
13
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
14
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
15
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
16
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
17
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
18
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
19
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
20
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)

फो़डाफोडीच्या राजकारणामुळे महाराष्ट्राची प्रतिमा मलिन, कोल्हापुरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांची टीका

By विश्वास पाटील | Updated: April 29, 2024 19:33 IST

शाहू छत्रपती यांना विजयी करण्याचे आवाहन

कोल्हापूर : पैसा आणि पक्षफोडीच्या आधारे सत्ता काबीज करणारे विधीनिषेधशून्य नेते यामुळे महाराष्ट्राची प्रतिमा राजकीय नैतिकता गमावलेले राज्य अशी मलीन झाल्याची टीका ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ.जयसिंगराव पवार, माजी कुलगुरु डॉ. माणिकराव साळुंखे यांच्यासह कोल्हापुरातील चाळीस विविध क्षेत्रातील मान्यवरांनी सोमवारी प्रसिध्दी पत्रकाद्वारे केली आहे. या मान्यवरांनी लोकसभा निवडणूकीत कोल्हापुरातून शाहू छत्रपती यांना विजयी करण्याचे आवाहन केले आहे.पत्रकात म्हटले आहे, भारतातील क्रांतीकारक सामाजिक सुधारणांचा इतिहास असलेले प्रगत व सुसंस्कृत राज्य अशी महाराष्ट्राची ओळख होती. परंतू ती आज मलिन झाली आहे. भारतीय जनता पक्ष हा आज निवडणूक आयोगाला स्वत:च्या अंकित ठेवून लोकशाहीसाठी सर्वात महत्वाच्या असलेल्या निवडणूकांवर नियं६ण ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. देश हुकुमशाहीकडे वाटचाल करत आहे. त्याविरोधात आता निर्भय बनून खुलेपणाने बोलण्याची गरज आहे. एक विवेकी, लोकशाहीवादी व्यक्ती म्हणून देशातील लोकशाही टिकवण्याची जबाबदारी आता आपल्यावर आहे. लोकसभेची २०२४ ची निवडणूक ही देशाच्या भवितव्याच्या दृष्टीने अत्यंत निर्णायक घटना आहे. आता आपण जागे नाही झालो तर भावी पिढ्या आपल्याला माफ करणार नाहीत असे त्यात म्हटले आहे. पत्रकावर डॉ.यशवंत थोरात, डॉ. गणेश देवी, डॉ.अशोक चौसाळकर, सरोज पाटील, डॉ.उषा थोरात, डॉ. सुनिलकुमार लवटे, डॉ. राजन गवस, डॉ.मधुकर बाचूळकर, डॉ.टी.एस.पाटील, डॉ. भालबा विभुते, डॉ. विलास पोवार, सुरेश शिपूरकर, डॉ. शरद भुथाडिया, पवन खेबूडकर, डॉ.माया पंडित, डॉ.शरद नावरे डॉ.अरुण भोसले, दशरथ पारेकर, डॉ. भारती पाटील, डॉ..मेघा पानसरे, डॉ. मंजूश्री पवार, मीना सेशू, तनुजा शिपूरकर बाळ पाटणकर.डॉ.आय.एच.पठाण, व्यंकप्पा भोसले, हसन देसाई, गणी आजरेकर, एम.बी.शेख, प्रा.डी.यू.पवार, प्रसाद कुलकर्णी, हिंदकेसरी विनोद चौगले, माणिक मंडलिक, महाराष्ट्र केसरी विष्णू जोशीलकर, डॉ.उदय नारकर, अर्जुन देसाई, अनंत घोटगाळकर, भगवान चिले आदींच्या सह्याआहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरkolhapur-pcकोल्हापूरlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४