शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: तीन दरवाजा बंद का केला म्हणत गाईडने शिपायाला कानशिलात लगावली, पन्हाळा गडावरील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2025 13:04 IST

पोर्ले तर्फ ठाणे : पर्यटक आत असताना पन्हाळा गडावरील तीन दरवाजाचा दरवाजा शिपायाने लावला म्हणून एका गाईडने त्या शिपाईच्या ...

पोर्ले तर्फ ठाणे : पर्यटक आत असताना पन्हाळा गडावरील तीन दरवाजाचा दरवाजा शिपायाने लावला म्हणून एका गाईडने त्या शिपाईच्या चक्क कानशिलात लगावली. ही घटना मंगळवारी (दि. ६) सांयकाळी सहाच्या सुमारास तीन दरवाजा येथे घडली. स्थानिकांनी प्रकरणाची मिटवामिटवी केली असली, तरी पन्हाळा पोलिस ठाण्यात प्रतिबंधात्मक (एनसीआर) पद्धतीने गुन्हा नोंदवला आहे.सध्या सुट्टीमुळे पन्हाळा गडावर पर्यटकांची गर्दी वाढली आहे. गडावर येणाऱ्या पर्यटकांना ऐतिहासिक गडाची माहिती गाईडद्वारे दिली जाते. मंगळवारी सायंकाळी सहाच्या सुमारास तीन दरवाजा परिसरातील ऐतिहासिक आणि पौराणिक वास्तूची माहिती एक गाईड देत होते.दरम्यान, नेहमीप्रमाणे एका शिपायाने तीन दरवाजाचा दरवाजा बंद केला. पर्यटक आत असताना तू दरवाजा का बंद केलास? यावरून शिपाई आणि त्या गाईडमध्ये हमरीतुमरी झाली. याचे पर्यावसन भांडणात झाले. यावेळी रागाच्या भरात गाईडने शिपायाच्या श्रीमुखात लगावली. त्यानंतर गडावरील काही लोकांच्या मध्यस्थीने हे प्रकरण मिटवले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरFortगड