शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी संघाची जागा ताब्यात घेण्यामागे पालकमंत्रीच; कोल्हापुरात उद्या सभासद, कर्मचाऱ्यांचा मोर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2023 13:59 IST

आमदार, खासदारांनी डबल ढोलकी बंद करावी

कोल्हापूर : शेतकरी सहकारी संघाची जागा ताब्यात घेतली नाहीतर त्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी दरोडा टाकला असून जिल्ह्यात आता कोणती आपत्ती आली म्हणून एवढ्या तातडीने जागा ताब्यात घेतली? असा सवाल करत जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या आडून पालकमंत्री दीपक केसरकर यांना ही जागा बळकावयाची आहे. असा आरोप शेतकरी संघाने आयोजित केलेल्या बैठकीत करण्यात आला. जिल्ह्यातील ४० हजार सभासदांच्या अस्तित्वाचा प्रश्न असून आमदार, खासदारांनी भूमिका जाहीर करावी, अन्यथा त्यांना किंमत मोजावी लागेल. असा इशाराही देण्यात आला.शेतकरी संघाच्या भवानी मंडप येथील इमारतीमधील तीन मजले देवस्थान समितीने ताब्यात घेतल्याने वाद उफाळून आला आहे. त्या पार्श्वभूमीवर सोमवारी झालेल्या बैठकीत सभासदांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या भूमिकेबद्दल संताप व्यक्त केला. उद्या, बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्णयही घेण्यात आला.शिवसेनेचे शहरप्रमुख सुनील मोदी म्हणाले, जिल्हाधिकाऱ्यांनी आपत्ती व्यवस्थापन कायद्याचा गैरवापर करून हे कृत्य केले आहे. जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या ताबा आदेशाची प्रत पालकमंत्री दीपक केसरकर यांचे स्वीय सहायक अमित कामत हे कसे सोशल मीडियावर टाकतात. पालकमंत्र्यांचा या जागेत रस काय? हे कोल्हापूरच्या जनतेला माहिती असून नवरात्रौत्सव अजून लांब असताना एवढ्या घाई गडबडीने कारवाई कशासाठी? जिल्हाधिकाऱ्यांनी उच्च न्यायालयाचा अपमान केला असून अशासकीय मंडळाने आपल्या नेत्यांच्या तोंडावर राजीनामे फेकून लढ्यात उतरावे.

दिलीप पोवार म्हणाले, इतके वर्ष नवरात्रौत्सव शांततेत होत असताना आताच दंगल होईल, अशी भीती जिल्हाधिकाऱ्यांना का वाटते? उत्सवातील गर्दी नियंत्रणात ठेवण्यात अपयश येत असेल तर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा. मनमानीपणे कारवाई करणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करा.शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख विजय देवणे म्हणाले, रात्री दहाच्या पुढे कार्यालयात बसून पालकमंत्र्यांची हुजरेगिरी करणाऱ्यांनी संघाच्या सभासदांशी खेळू नये, अन्यथा महागात पडेल. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार म्हणाले, संघाच्या ‘बैला’ने अनेकांचे संसार उभे केले, पण तो अशक्त असताना त्याला मारण्याची कोणी भूमिका घेत असेल तर ते खपवून घेणार नाही. दर्शनमंडपाच्या आडून पालकमंत्र्यांना येथे आलिशान हॉटेल करायचे आहे.अशासकीय मंडळाचे अध्यक्ष सुरेश देसाई म्हणाले, या लढाईत आम्ही सभासदांसोबत असून कोणाच्याही दबावाला भीक घालणार नाही. उद्या, बुधवारी सकाळी दहा वाजता भवानी मंडपातून मोर्चा काढला जाणार असून यामध्ये लोकप्रतिनिधींसह सभासद, कर्मचाऱ्यांनी कुटुंबासह सहभागी व्हावे.मंडलिकसाहेब उघड भूमिका घ्या....

स्वर्गीय सदाशिवराव मंडलिक संघावर प्रशासक असताना भवानी मंडपातील इमारत खरेदी केली. आता ही इमारत गिळंकृत होत असताना खासदार संजय मंडलिक तुम्ही बघत बसणार का? उघड भूमिका घ्या, असे आवाहन अनिल घाटगे यांनी केले.‘लोकमत’चे अभिनंदन..भवानी मंडपातील प्रत्येक वास्तूशी राजर्षी शाहू महाराज यांचे नाते आहे. इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांनी ‘लोकमत’च्या माध्यमातून वस्तुस्थिती मांडली असून ‘लोकमत’सह सावंत यांचेही अभिनंदनाचा ठराव विजय देवणे यांनी मांडला.

आमदार, खासदारांनी डबल ढोलकी बंद करावी

संघाच्या जिवावर ज्यांनी जिल्ह्याचे राजकारण केले. आमदार, खासदार पदे उपभोगली ते कोठे आहेत? त्यांनी डबल ढोलकी वाजवणे बंद करून ४० हजार सभासदांच्या बाजूने उभे राहावे, अन्यथा हेच सभासद त्यांना पायाखाली घेतील, असा इशारा संजय पवार यांनी दिला.शिंदेसाहेब हेच तुमचं ‘गतिमान सरकार का?एकाच दिवशी आदेश काढून तत्काळ ताबा घेतला, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब हेच तुमचं गतिमान सरकार का? असा सवाल करत पालकमंत्र्यांना खुश करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी हे पाऊल उचलले. आता खालचे मजले घेतले उद्या सगळी इमारत ताब्यात घेतल्यानंतर हातात काहीच राहणार नाही, रस्त्यावरील लढाईसह कायदेशीर लढाईला तयार राहा, असे आवाहन ॲड. बाबा इंदुलकर यांनी केले.

जिल्हाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करा शेतकरी संघ व ‘मॅग्नेट’ बझार यांच्यात भाड्याचा वाद उच्च न्यायालयात असून, न्यायालयाने लवाद नेमला आहे. लवादाने बझारची सील केलेली जागा जिल्हाधिकाऱ्यांनी कुलुपे तोडून ताब्यात घेतली आहे. जिल्हाधिकारी राहुल रेखावार, करवीर तहसीलदार स्वप्नील रावडे, देवस्थान समितीचे सचिव सुशांत बनसोडे व मंडळ अधिकारी संतोष पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करा, आशी मागणी संघ व्यवस्थापनाने सोमवारी जुना राजवाडा पोलिसाकडे केली.जिल्हाधिकाऱ्यांच्या कारवाईविरोधात संघाने सोमवारी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. मॅग्नेटही न्यायालयात जाणार असल्याचे समजते. यावेळी संघाचे अशासकीय मंडळाचे सदस्य जयवंत पाटील, ॲड. अशोकराव साळोखे, व्यंकाप्पा भोसले, संभाजीराव जगदाळे, रवींद्र जाधव, विजयराव पोळ, आकाराम पाटील, संभाजी पोवार संघाचे कार्यकारी संचालक सचिन सरनोबत, कर्मचारी संघटनेचे दीपक निंबाळकर, अनंत देसाई आदी उपस्थित होते. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूर