शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

महायुतीच्या विजयाचा ट्रेंड कायम राहील, मंत्री हसन मुश्रीफांनी व्यक्त केला विश्वास

By इंदुमती सूर्यवंशी | Updated: November 6, 2023 18:42 IST

चिंचवाडमध्ये महाडीक गट व पाटील गटाच्या कार्यकर्त्यांनी अपक्ष म्हणून एकत्रित निवडणूक लढवली पण त्यांचा धुव्वा उडाला

कोल्हापूर : ग्रामपंचायत निवडणुकीत महाविकास आघाडीच्या तिप्पट जागा महायुतीने जिंकल्या आहेत. विजयाचा हा ट्रेंड असाच राहील. महायुती सरकारने अनेक जनाभिमुख निर्णय घेतले आहेत. गोरगरीब, सामान्यांच्या विकासासाठी काम करणारे हे सरकार आहे. विधानसभा लोकसभेला जे उमेदवार ठरतील त्यांना निवडून आणण्यासाठी जीवाची बाजी लाऊ अशी माहिती पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.

ग्रामपंचायत निवडणुकीतील यशाबद्दल ते म्हणाले, कागल, चंदगड, राधानगरी, भुदरगडसह कोल्हापूर हा पूर्वीपासूनच राष्ट्रवादी काँग्रेसचा मतदार संघ राहीला आहे. अनेक वर्षे सत्तेवर असलेला हा पक्ष आहे. आमदार, कार्यकर्त्यांनी घेतलेल्या मेहनतीला मिळालेले हे यश आहे. शरद पवार गट निवडणुकीत अपयशी ठरला आहे यावर ते म्हणाले, राष्ट्रवादी पक्षाची धुरा व नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे आल्याने तशी परिस्थिती झाली असेल.

धुव्वा उडाला तरी चांगलेच..चिंचवाडमध्ये खासदार धनंजय महाडीक गट व आमदार सतेज पाटील गटाच्या कार्यकर्त्यांनी अपक्ष म्हणून एकत्रित निवडणूक लढवली पण त्यांचा धुव्वा उडाला यावर मुश्रीफ म्हणाले, या दोन्ही गटांनी पॅनेल केले हे शुभचिंतन आहे. भलेही त्यांचा धुव्वा उडाला असला तरी एकत्र आले ही चांगली गोष्ट आहे.

अजित पवार मुख्यमंत्री हाेण्यासाठी प्रयत्न करू..अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे यावर मुश्रीफ म्हणाले, आपला नेता मुख्यमंत्री व्हावा अशी प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्याची इच्छा असते. आमचीही अशीच भावना आहे. पण त्यासाठी १४४ आमदार निवडून येणे गरजेचे आहे त्यासाठी आम्ही प्रयत्न करू. नरेंद्र मोदी हेच तिसऱ्यांचा पंतप्रधान होणार हे सांगायला ज्योतिषाची गरज नाही असेही ते म्हणाले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरgram panchayatग्राम पंचायतResult Dayपरिणाम दिवसHasan Mushrifहसन मुश्रीफ