शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूरच्या शासकीय रुग्णालयात वर्षभर पुरेल इतका औषधसाठा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2023 16:38 IST

जिल्हा नियोजनकडून अनुदान

कोल्हापूर : कोल्हापुरातील छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार शासकीय रुग्णालयात वर्षभर पुरेल इतका औषधसाठा असल्याचे शल्यचिकित्सक डॉ. सुप्रिया देशमुख यांनी सांगितले. दरम्यान, नांदेड येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात २४ तासांत २४ रुग्णांचा मृत्यू झाल्यानंतर सर्वच जिल्ह्यांतील औषधसाठ्याचा आढावा वैद्यकीय विभाग आणि आरोग्य विभागाकडून घेण्यात येत आहे.हाफकिन संस्था व वैद्यकीय शिक्षण संचालनालयाने गेल्या काही वर्षांपासून औषध पुरवठा होत नाही. अगदी हाताच्या बोटावर मोजता येतील इतक्याच प्रकारच्या औषधांचा पुरवठा ही संस्था करते. गेल्या वर्षभरात फक्त चारच प्रकारच्या औषधांचा पुरवठा हाफकिनने कोल्हापूरला केला आहे. सध्या वैद्यकीय शिक्षण संचालनालय (डीएमईआर) सर्वच रुग्णालयांना औषध पुरवठा करणार आहे. त्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू आहे.कोल्हापूरला वर्षभरात सुमारे चार ते पाच कोटी रुपयांच्या औषधांची आवश्यकता असते. यासाठी चार कोटी रुपयांचे अनुदान मिळते. सध्या पावणेदोन कोटी रुपयांच्या निधीतून औषधांची खरेदी झालेली आहे.कोल्हापूरच्या शासकीय रुग्णालयात काही औषधे तीन महिना, तर काही औषधे एक महिना पुरतील इतकी उपलब्ध आहेत. मात्र, तो सध्या पुरेशा प्रमाणात आहे. औषधांच्या साठ्यासंदर्भात दर महिन्याला बैठकीत आढावा घेण्यात येतो.

हृदयविकार, श्वानदंश, सर्पदंशावरील औषधांचा पुरेसा साठाकोल्हापूर जिल्ह्यात श्वानदंश आणि सर्पदंशाचे प्रमाण अधिक असल्याने यावर उपचार करण्यासाठी लागणाऱ्यो रेबीजसारख्या औषधांचा साठा फक्त ‘सीपीआर’मध्येच आहे. याशिवाय हृदयविकारावरील काही औषधे तत्काळ लागतात. त्याचाही पुरेसा साठा उपलब्ध असल्याचे संबंधित विभागाने सांगितले.

जिल्हा नियोजनकडून अनुदानकोल्हापुरातील रुग्णालयांसाठी लागणाऱ्या औषधांची खरेदी करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. जिल्हा नियोजन समितीमार्फत उपलब्ध हाेणाऱ्या अनुदानातून याची खरेदी होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरGovernmentसरकारhospitalहॉस्पिटलmedicineऔषधं