शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: ‘चंदगड’चा भावी आमदार कुपेकरांचे कार्यकर्तेच ठरवणार, संध्यादेवी कुपेकरांचा आमदार राजेश पाटलांना इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2023 17:46 IST

परंतु, विजयासाठी कष्ट घेतलेल्यांना अडचणीत आणण्याचे प्रयत्न

राम मगदूमगडहिंग्लज : राष्ट्रीय नेते शरद पवार यांचे नेतृत्व मानणाऱ्या कार्यकर्त्यांनी गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला गडहिंग्लज तालुक्यातून प्रचंड मताधिक्य दिले. परंतु, कुटुंबप्रमुख या नात्याने सर्वांना बरोबर घेवून काम करण्याऐवजी विजयासाठी कष्ट घेतलेल्यांना अडचणीत आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे ‘चंदगड’चा भावी आमदार स्व. कुपेकरांचे कार्यकर्तेच ठरवतील, असा सूचक इशारा माजी आमदार संध्यादेवी कुपेकर यांनी नामोल्लेख टाळून आमदार राजेश पाटील यांना दिला.मनवाड येथे नळपाणी पुरवठा योजना कामाच्या प्रारंभप्रसंगी त्या बोलत होत्या. हत्तरकीच्या कारिमठाचे मठाधिपती श्री गुरूसिद्धेश्वर महास्वामीजी, शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देवणे यांची प्रमुख उपस्थिती होती. आमदार अरूण लाड यांच्या सहकार्याने बांधलेल्या रंगमंच, स्वच्छतागृह व सौरऊर्जा प्रकल्पाचे लोकार्पणही मान्यवरांच्याहस्ते झाले.महास्वामीजी म्हणाले, स्व. कुपेकर यांनी गडहिंग्लजचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी विशेष परिश्रम घेतले. त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून वाटचाल करणाºया कार्यकर्त्यांमुळेच  मनवाडच्या विकासाला दिशा मिळाली आहे.यावेळी जिल्हा मजूर फेडरेशनचे माजी अध्यक्ष उदय जोशी, ‘मनसे’ जिल्हाध्यक्ष नागेश चौगुले, शिवसेना ठाकरे गटाचे रियाजभाई शमनजी, काँगे्रसचे सरचिटणीस विद्याधर गुरबे यांचीही भाषणे झाली.कार्यक्रमास उपसरपंच वैभवी लोखंडे, येणेचवंडीच्या सरपंच दीपाली कांबळे, हिडदुगीचे उपसरपंच विक्रांत नाईक, शंकर कांबळे, सतीश थोरात, तानाजी कुराडे, अजित पाटील, संभाजी पाटील आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते. तंटामुक्त समिती अध्यक्ष राकेश पाटील यांनी स्वागत केले. सरपंच ज्ञानप्रकाश रेडेकर यांनी प्रास्ताविक केले. रावसाहेब पाटील यांनी सूत्रसंचलन केले. ग्रामसेवक विजय जाधव यांनी आभार मानले. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरchandgad-acचंदगडPoliticsराजकारण