शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

Kolhapur: खासबाग कुस्त्यांच्या मैदानाची तटबंदी ढासळू लागली, झाडे तोडण्याबाबत झाडांवर चिकटविल्या नोटीसा

By सचिन भोसले | Updated: November 30, 2023 19:16 IST

कोल्हापूर : राजर्षी शाहू खासबाग कुस्त्यांच्या मैदानातील तटबंदीस लागून उलटा अशाेकाच्या १०० हून अधिक झाडे आहेत. या झाडांमुळे तटबंदी ...

कोल्हापूर : राजर्षी शाहू खासबाग कुस्त्यांच्या मैदानातील तटबंदीस लागून उलटा अशाेकाच्या १०० हून अधिक झाडे आहेत. या झाडांमुळे तटबंदी ढासळू लागली आहे. त्यामुळे ही झाडे तोडण्याबाबत महापालिका वृक्षप्राधिकरणने सात दिवसांच्या आत हरकत नोंदविण्याच्या नोटीसा झाडांवर चिकटविल्या आहेत. याची दखल घेवून पर्यावरणप्रेमी व कुस्तीप्रेमींनी ही झाडे न तोडता त्यांची पुनर्लागवड करावी. अशी मागणी केली आहे.कुस्ती सम्राट युवराज पाटील व उत्तरेचा प्रसिद्ध मल्ल सतपाल यांच्यात ११ फेब्रुवारी १९८४ ला याच खासबागेत कुस्ती झाली. या दरम्यान महापालिका प्रशासनाने मैदानाचे नुतनीकरण केले. त्यामध्ये तटबंदीलगत सव्वाशेहून अधिक उलटा अशोक जातीची झाडे लावली. त्यातील १०० हून अधिक झाडे आजही दिमाखात उभी आहेत.मात्र, या झाडांच्या मुळांमुळे तटबंदीला धोका निर्माण झाला आहे. ऐतिहासिक वारसा लाभलेल्या या खासबाग कुस्ती मैदानाच्या तटंबंदीचे नुतनीकरण करणे गरजेचे बनले आहे. झाडे तोडीसंदर्भात २२ नोव्हेंबर २०२३ ला महापालिका प्रशासक के. मुंजुलक्ष्मी, अतिरिक्त आयुक्त केशव जाधव, प्रभारी वृक्षाधिकारी हर्षजित घाटगे,उद्यानाधिकारी समीर व्याघ्रंबरे, पर्यावरण तज्ज्ञ डाॅ. मधुकर बाचूळकर, उदय गायकवाड आदींच्या उपस्थितीत बैठक झाली.या बैठकीत सात दिवसांच्या आत हरकती नोंदवण्याची सुचना प्रशासकांनी दिल्या. त्यानूसार उद्यान विभागाने येथील प्रत्येक झाडांवर हरकती नोंदविण्यबाबत नोटीसा चिकटविल्या आहेत. त्यामुळे या झाडांची पुनर्लागवड करावी. अशी मागणी कुस्ती प्रेमीं व पर्यावरणप्रेमींतर्फे केली जात आहे.

ऐतिहासिक वारसा लाभलेल्या या मैदानातील तटबंदीलगतची अशोकाची झाडे तशीच ठेवून नूतनीकरण करावे किंवा पुनर्लागवडीची हमी घेवून ती तेथून अन्यत्र लावावीत. - अशोक पोवार, कुस्तीप्रेमी 

अशोकाच्या झाडांची पुनर्लागवड करावी. पाणी निचरा होण्यासाठी सोय करून भिंतींचे नूतनीकरण करावे. गोल्फ कोर्ससाठी लागणाऱ्या गवताची लागवड रचना आवश्यक आहे. - उदय गायकवाड, पर्यावरण तज्ज्ञ

टॅग्स :kolhapurकोल्हापूरWrestlingकुस्ती