शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

वनविभागाकडे पुरेशी रोपेच नाहीत, १० कोटी झाडं लावणार तरी कशी?

By समीर देशपांडे | Updated: June 16, 2025 18:01 IST

लहान रोपे लावून नाही फायदा, कसा पूर्ण होणार वायदा

समीर देशपांडेकोल्हापूर : राज्यात १० कोटी झाडे लावण्याची घोषणा मुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. तसा शासन आदेशही महसूल आणि वन विभागाने ११ जून रोजी काढला आहे. परंतु, यावर्षी इतकी झाडे लावण्यासाठी वनविभागाकडे पुरेशी रोपेच उपलब्ध नसल्याचे वास्तव याच शासन आदेशात मांडण्यात आले आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवर मिळतील ती रोपे लावून उद्दिष्टपूर्ती झाली तरी अशी झाडे जगणार कशी, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

राष्ट्रीय वननीतीप्रमाणे एकूण भौगोलिक क्षेत्राच्या ३३ टक्के वनक्षेत्र आवश्यक असताना सध्या महाराष्ट्रात २१.२५ टक्के वनआच्छादन आहे. त्यामुळेच ४ जून रोजी मुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या निर्देशानुसार ही योजना जाहीर करण्यात आली आहे.याआधी तत्कालिन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनीही शतकोटी वृक्षलागवडीची घोषणा केली होती. परंतु, ती तितकशी यशस्वी झाली नसल्याचे नंतर स्पष्ट झाले. अनेक शासकीय कार्यालयांच्या दारात लावलेली झाडे केवळ दुर्लक्षामुळे मरून गेल्याचे नंतर दिसून आले. आता शासनाने राज्यातील २६ विभागांना १० टक्के जादा यानुसार ११ कोटी झाडे लावण्याचे उद्दिष्ट दिले आहे.परंतु, वनविभागाकडे पुरेशी रोपे नसल्याने आता खासगी नर्सरीमधून ही रोपे खरेदी करावी लागणार आहेत. इतक्या मोठ्या संख्येने रोपे लागणार असल्याने साहजिकच सरसकट रोप खरेदी केली जाणार असून, यामध्ये अधिक वयाची झाडे नसतील तर साहजिकच त्यांचे मरण्याचे प्रमाणही अधिक असते. त्यामुळे झाडे लावल्याची नोंद होईल, परंतू जगली किती, हा महत्त्वाचा प्रश्न उरणार आहे.

कर्नाटक पॅटर्न आवश्यककर्नाटक शासन याचे दरवर्षी नियोजन करून पाच, सहा फुटांच्याच रोपांची लागवड करते. त्यामुळे जनावरे खाण्यापासून त्यांचा बचाव होतो आणि रोपे जगण्याचे तेथील प्रमाण अधिक आहे. याचे अनुकरण महाराष्ट्रात होण्याची गरज आहे.

शासनाने मोठ्या घोषणा करण्यापेक्षा एकच कोटी झाडे दरवर्षी लावावीत. परंतु, ती मोठी लावावीत आणि ती जगवून दाखवावीत. नाही तर केवळ हे वृक्षारोपण कागदाेपत्री राहील. याआधीही असा प्रकार अनेक वेळा झाला आहे. शासनाची प्रामाणिक भूमिका असेल, तर गडबड न करता एक धोरण ठरवण्यात यावे. - डॉ. मधुकर बाचूळकर वनस्पीतज्ज्ञ, कोल्हापूर