शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: पन्हाळा-पावनखिंडीत 'हर हर महादेव' घुमणार, शिवभक्तांना पदभ्रमंती मोहिमेचे वेध; नियोजित तारखा..जाणून घ्या

By संदीप आडनाईक | Updated: June 27, 2025 14:09 IST

हौतात्म्यास अभिवादन करण्यासाठी आणि या स्फूर्तिदायी घटनेला उजाळा देण्यासाठी हजारो शिवभक्त या मोहिमेत सहभागी होतात

संदीप आडनाईककोल्हापूर : जुलै महिन्याची चाहूल लागताच जशी पंढरीच्या वारीची ओढ भक्तांना लागते, तसेच वेध शिवभक्तांना पन्हाळगड ते पावनखिंड पदभ्रमंतीचे लागतात. या महिन्यात विविध संघटनांकडून पन्हाळगडापासून विशाळगडाच्या पायथ्यापर्यंत चालत जाण्यासाठी मोहिमा आयोजित करतात. देश-विदेशातून अनेक शिवभक्त मोठ्या संख्येने सहभागी होतात. गतवर्षात एक लाखाहून अधिक लोकांनी विविध मोहिमांशिवाय सहल म्हणून या परिसराला भेट दिल्याचा अंदाज आहे. यंदाही तितक्याच संख्येने लोक भेट देण्याची शक्यता आहे.पन्हाळगड ते विशाळगडचा रणसंग्राम १२ आणि १३ जुलै १६६० यादरम्यान घडला. पन्हाळगडावर सिद्दीच्या वेढ्यात छत्रपती शिवाजी महाराज अडकले होते. योजना आखून ते विशाळगडावर सुखरूप पोहोचले. परंतु, या रणसंग्रामात या मार्गावर अनेक ज्ञात-अज्ञात मावळ्यांनी हौतात्म्य पत्करले. पन्हाळगडावर नरवीर शिवा काशीद आणि पावनखिंडीत बाजीप्रभू, फुलाजी प्रभू धारातीर्थी पडले. त्यांच्या या हौतात्म्यास अभिवादन करण्यासाठी आणि या स्फूर्तिदायी घटनेला उजाळा देण्यासाठी हजारो शिवभक्त या मोहिमेत सहभागी होतात.या आहेत नियोजित तारखा

  • मैत्रेय प्रतिष्ठान : १० जुलै साहसरात्र मोहीम (४३ वी मोहीम)
  • सह्याद्री प्रतिष्ठान : १२-१३ जुलै (२९ वी मोहीम)-आनंदराव पोवार प्राचीन युद्धकला प्रशिक्षण संस्था : १२-१३ जुलै (४० वी मोहीम)
  • कोल्हापूर हायकर्स : १२-१३ जुलै व १६-१७ ऑगस्ट (१३ व १४ वी मोहीम)
  • शिवराष्ट्र परिवार महाराष्ट्र : १२-१३-१४ जुलै (३२ वी मोहीम)
  • काेल्हापूर मैदानी खेळ : १९-२० जुलै (२७ वी मोहीम)
  • निसर्गवेध परिवार : २०-२१ जुलै (२५ वी मोहीम)
  • हिल रायडर्स ॲडव्हेंचर फाउंडेशन : २०-२१ जुलै, २७-२८ जुलै (७२ व ७३ वी मोहीम)

पहिली मोहीम १९६७ मध्येदुर्गमहर्षी गो. नी. दांडेकर हे पन्हाळा-पावनखिंड-विशाळगड पदभ्रमंतीचे जनक आहेत. त्यांनी त्यांच्या ९१ व्या वर्षी पहिली पदभ्रमंती दिनांक १२ व १३ जुलै १९६७ रोजी पूर्ण केली. ज्या मार्गाने आणि ज्या तिथीस शिवछत्रपती गेले, त्याच मार्गाने व तिथीस, आषाढ वद्य प्रतिपदेस ४० मैल अंतर पार करत त्यांनी ही मोहीम पूर्ण केली. सोबत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे होते. त्यापूर्वी थोर इतिहास संशोधक मु. गो. गुळवणी यांनी हे अंतर पूर्ण केले होते.