शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

कोल्हापुरातील जयप्रभा स्टुडिओची फाईल बंदच; पुढे काय..? सगळ्याच यंत्रणांचे हात वर  

By इंदुमती सूर्यवंशी | Updated: March 1, 2025 13:04 IST

जयप्रभा स्टुडिओ कोरोना काळात विकला गेल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध केल्यानंतर राज्यात खळबळ उडाली होती

इंदुमती गणेशकोल्हापूर : कोल्हापूरला लाभलेल्या मराठी सिनेसृष्टीच्या गंगोत्रीमधील महत्त्वाची वास्तू असलेल्या जयप्रभा स्टुडिओचे पुढे काय झाले?, या प्रश्नाचे उत्तर ना महापालिकेकडे आहे, ना लोकप्रतिनिधींकडे. शासनाने कोल्हापूर महापालिकेला स्टुडिओ चालवायला स्वत: ताब्यात घ्या, त्या बदल्यात दुसरी जागा किंवा टीडीआर द्या, असा पर्याय सुचवला होता. त्यानंतर मागील दीड वर्षात जयप्रभाचे पुढे काहीही झाले नाही. कोल्हापूरच्या अस्मितेशी जोडलेल्या या वास्तूचे पुढे काय झाले? याची चौकशी ‘लोकमत’ने केल्यावर संबंधित सर्वच यंत्रणा हात वर करत असल्याचे दिसून आले.दिग्दर्शक भालजी पेंढारकर आणि त्यानंतर लता मंगेशकर यांच्या ताब्यात असलेला जयप्रभा स्टुडिओ कोरोना काळात विकला गेल्याचे वृत्त ‘लोकमत’ने फेब्रुवारी २०२१ मध्ये प्रसिद्ध केल्यानंतर राज्यात खळबळ उडाली. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाने आंदोलन सुरू केले. शिंदेसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांच्या दोन्ही मुलांची नावे खरेदीदारांमध्ये असल्याने त्यांनी तातडीने स्टुडिओ शासनाच्या ताब्यात जावा, यासाठी प्रयत्न सुरू केले.

त्यानुसार नगरविकास विभागाने कोल्हापूर महापालिकेलाच स्टुडिओ ताब्यात घेण्यास सांगितले. पण, महापालिकाच कंगाल असल्याने तत्कालीन आयुक्त कादंबरी बलकवडे यांनी स्टुडिओ ताब्यात घेऊ शकत नाही, असा वस्तुस्थितीदर्शक अहवाल शासनाला दिला. पण आता सर्वांनाच जयप्रभा स्टुडिओचा विसर पडला.अधिकाऱ्यांना काही आठवेना..जयप्रभाबाबत विचारण्यासाठी चार अधिकाऱ्यांना फोन केला. त्यापैकी एकालाही सद्य:स्थिती सांगता आली नाही. ज्यांच्याकडे वर्षभरापूर्वी प्रकरण होते त्यांची बदली झाली. नंतर आलेल्या दोन अधिकाऱ्यांकडे जबाबदारी येऊन वर्ष झाले, पण या काळात जयप्रभाचा विषयच पुढे न आल्याने त्यांना याची काहीच माहिती नाही.

शासनाने महापालिकेला जयप्रभा ताब्यात घेण्याचे आदेश दिले आहेत. ते पाळणे बंधनकारक आहे, अन्यथा आदेशाचा भंग होऊन कारवाई होऊ शकते. मी स्वत: याबाबत लवकरच बैठक घेईन. - राजेश क्षीरसागर, आमदार

टॅग्स :kolhapurकोल्हापूरLata Mangeshkarलता मंगेशकरRajesh Vinayakrao Kshirsagarराजेश विनायकराव क्षीरसागर