शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

पितृ पंधरवड्याच्या धास्तीने राजकीय घडामोडी थंडावल्या, गुरुवारनंतर वेगावणार

By राजाराम लोंढे | Updated: September 30, 2024 16:55 IST

राजाराम लोंढे  कोल्हापूर : विधानसभेची निवडणूक ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात जाहीर होणार असल्याने सर्वच राजकीय पक्षांच्या अंतर्गत हालचालींना वेग आला ...

राजाराम लोंढे कोल्हापूर : विधानसभेची निवडणूक ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात जाहीर होणार असल्याने सर्वच राजकीय पक्षांच्या अंतर्गत हालचालींना वेग आला आहे. मात्र, निवडणुकीच्या तोंडावर ज्या गतीने पक्ष प्रवेश, उमेदवारांची घोषणा हाेणे अपेक्षित हाेते, ते होताना दिसत नाही. सगळ्या राजकीय पक्षांनी पितृपंधरवड्याची धास्ती घेतल्याने राजकीय घडामाेडी थंडावल्या आहेत.

गुरुवार (दि. ३) नंतर राज्यात उमेदवारांच्या घोषणा सुरू होतील आणि पक्षप्रवेशांचे पेवही फुटणार आहे. हिंदू संस्कृतीमध्ये राजकीय व सामाजिक जीवनाची सुरुवात शुभमुहूर्तावरच केली जाते. काहीजण मानतात तर काहीजण मानतही नाहीत; पण राजकारणात या गोष्टीला फार महत्त्व दिले जाते. विधानसभा निवडणुकीचा बिगुल आठ-दहा दिवसांत वाजणारच आहे. महायुती व महाविकास आघाडीच्या जागावाटपाचे सूत्र बऱ्यापैकी पूर्णही झालेले आहे. पण, ते जाहीर करण्याबराेबरच ज्यांची उमेदवारी निश्चित आहे, त्यांची घोषणा करण्यास पितृपंधरवड्याचा अडथळा निर्माण झाला आहे.महायुती व महाविकास आघाडीमध्ये जागांचे बऱ्यापैकी वाटप झाल्याने कोणाला उमेदवार मिळणार आणि कोणाला थांबावे लागणार हे निश्चित झाले आहे. त्यामुळे अनेकांचे पक्षप्रवेश निश्चितही झालेले आहेत. 

पितृ पंधरवडा म्हणजे काय?भाद्रपद पौर्णिमेच्या नंतर अमावास्येपर्यंत जो पंधरवडा असतो, त्याला पितृ पंधरवडा म्हटले जाते. पित्र म्हणजे या कालावधीत आपल्या पूर्वजांना मोक्ष मिळवण्यासाठी प्रार्थना केली जाते. असे केल्याने त्यांच्या वंशजाच्या अडचणी कमी होतात, असे म्हटले जाते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPoliticsराजकारण